Skip to content

प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होवू शकत नाही….

प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होवू शकत नाही.


सोनाली जे.

हा खूप मोठा विषय आहे.. बाळ लहान असते तेव्हा ते रडले की त्याला दुध किंवा काही तरी खायला प्यायला मिळणार ही बाळाची psychology का बरे पक्की होते? कारण त्याला हे त्याच्या बाबतीत दोन तीन वेळा घडले की लक्षात येते किंवा अनुभव येतो की आपण रडलो की आपल्याला खायला प्यायला मिळते म्हणून प्रत्येकवेळी बाळ रडते कारण आपण रडलो की आता आपल्याकडे कोणी तरी लक्ष देणार आणि खायला प्यायला देणार याची खात्री असते .अशी मानसिकता तयार झालेली असते.

बाळ थोडे मोठे होते , एखादी गोष्ट मिळविण्याकरिता ते हट्टीपणा करायला लागते. हात – पाय आपटणे, जमिनीवर स्वतः ला झोकून देणे अशा गोष्टी करायला लागते.कधी तरी बाळाला असे वाटते की आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही तर ते इतरांनी attention द्यावे म्हणून रडेल ..आरडा ओरडा करेल. आणि असे केले की सगळे आपल्याकडे लक्ष केंद्रित करतात हा अनुभव पूर्वी आलेला असतो म्हणून तिचं क्रिया परत केली जाते.

बाळाचे पालक एखादे वेळी हट्ट पूर्ण करतात पण प्रत्येकवेळी त्याचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणून त्याला पाहिजे ती गोष्ट त्याला देत नाहीत..तो जे म्हणेल ती गोष्ट त्याला द्यायची सवय लावत नाहीत .

बाळ त्याहून थोडे मोठे झाले की त्याला चांगले – वाईट याची जाणीव होवू लागते..त्यातून त्याला इतरांकडे एखादी असलेली गोष्ट आपल्याकडे नाही याची जाणीव होते..त्याकरिता त्याचा हट्ट सुरू होतो.पण त्या गोष्टी किंवा त्याचा हट्ट एखादे वेळेस आई – वडिल पुरवू शकतात . पण प्रत्येकवेळी त्याचा हट्ट आई वडिलांना पूर्ण करणे जमणार आहे का?? नाही ना !!

म्हणजेच प्रत्येकवेळी आपल्या मनासारखं होत असते का ? मुले जेव्हा खेळ खेळतात तेव्हा खेळताना प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तोच खेळ आपले मित्र प्रत्येकवेळी खेळतात का? नाही ना!! कधी तरी आपल्या मनासारखे कधी त्यांच्या मनासारखे खेळ आपण खेळतो च ना!!
आपण आयुष्यात एक ध्येय ठरवितो पण ते पूर्ण करू शकतो का ?? बरेचदा आपल्याला काही तरी वेगळे करायचे असते आणि काही तरी वेगळे होत असते.

आता सध्याच्या परिस्थिती मधलेच उदाहरण बघुयात की.. Corona सारख्या या pandemic परिस्थिती मध्ये मुलांना शाळेत जायचे आहे,भरपूर अभ्यास करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणी , teacher यांच्या बरोबरची धमाल मस्ती अनुभवायची आहे.नवीन गोष्टी शिकायच्या आहेत..पण मुले त्यांच्या या इच्छा शंभर टक्के सध्या पूर्ण करू शकतात का?? नाही ना!! या गोष्टी ते परत काही काळाने ..एखाद्या वर्षाने जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा नक्कीच करू शकतात पण आता ते करणे शक्य आहे का.? नाही ना !!आता प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होवू शकत नाही..कारण तशी परिस्थिती नाही.

आज मी आणि माझी जुनी मैत्रीण आम्ही दोघी मैत्रिणी नी ठरविले की भेटायचे ठरविले आणि मी भेटण्याच्या ठिकाणी पोहचले पण अचानक तिचा फोन आला की अगं मी तुला भेटायला च येत होते पण गाडी अचानक बंद पडली आणि दुचाकी वाटेत कुठे लावून येणार आणि कसे येणार आणि तरी तुला मी जी वेळ दिली आहे त्या वेळेत मी कशी पोहचू शकणार ..मला तिथे वेळेतच नाही तर पोहचणे शक्यच नाही म्हणून मी फोन केला की

आपण परत कधी तरी ठरवून भेटुयात. यात म्हणजे आपण ठरविले एक होते आणि झाले वेगळे. किंवा असेही होवू शकते की मैत्रिणी ला surprise द्यायचे म्हणून आपण तिच्या घरी गेलो आणि ती कुलूप लावून बाहेर गेली असेल.

म्हणजे आपण जे ठविले ते ठरवून ही आपल्या मनासारखे झाले का?? तर नाही ना!!! परिक्षेकरीता खूप अभ्यास केला पण जो अभ्यास केला होता त्याच्या बाहेरचे प्रश्न आले तर ? आपण उत्तरे लिहू शकतो का??

इंटरव्ह्यू दिला आणि आपल्याला वाटते की मला सगळे आले त्यांनी जे विचारले ते म्हणजे आपली नक्कीच निवड होईल याची खात्री ही वाटते पण समजते की आपली निवड झाली नाही..कारणे अनेक असू शकतात.जसे आपल्यापेक्षा जास्त अनुभवी , जास्त शिक्षण असलेला किंवा आपल्यापेक्षा अजून जास्त योग्य उमेदवार interview commitee ने निवडला तर आपण काय करू शकतो का?? नाही ना !!

लग्न म्हणले की मुलगा मुलगी यांची स्थळे बघणे आले त्यातून मुलगा मुलगी भेटणे आले..मुलीला मुलगा खूप आवडला ,पसंत ही पडला पण मुलाला मुलगी नाही पसंत पडली तर ? असे नाही होत ना की तुम्हाला पसंत म्हणजे त्याची पसंत पण तीच असली पाहिजे ?? ही गोष्ट तुमच्या मनासारखी नाही पण समोरच्या ची पसंत ही महत्वाची ना कारण दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा..

निवडणुकी मध्ये समजा मला खात्री आहे की मी निवडून येणार .पूर्वी मी लोकांना खूप प्रकारची मदत केली होती , ते लोक अजून काही समस्या निर्माण झाल्या तरी मला कायम विचारतात.कधी ही काही गरज पडली की फोन करतात त्यांच्या करिता अनेक सेवा , सुविधा उपलब्ध करून देते मी ..मी स्त्री असूनही बहुमतांनी निवडणूक जिंकणारच अशी खात्री असेल तरी मी हरले .

विचार करा की मी का हरले? का माझ्या मनासारखं झाले नाही? कारण मतदार नक्की मते देणार याची खात्री मी बाळगली त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण आयत्या वेळी मतदारांनी मला मत दिले नाही म्हणून हरले ना !! . मत देणे ही त्यांची जबाबदारी होती जशी त्यांच्या समस्या होत्या , गरज होती तेव्हा माझी जबाबदारी त्यांना मदत करणे ही होती. पण म्हणजे मी ठरवून ही किंवा इतरांना मदत करूनही निवडणूक जिंकणे हे माझ्या मनासारखे झालेच नाही ..

माझ्या मित्राने गाडी घेतली, बंगला बांधला ..मला ही वाटले की आपण ही त्याच्या सारखा बंगला बांधावा , गाडी घ्यावी आणि मी मनात ठरविले की मी पण अशीच गाडी घेणार आणि बंगला ही बांधणार …पण ही इच्छा पूर्ण कधी होवू शकेल जेव्हा मी त्याकरिता प्रयत्न करणं सुरू करेन.त्याकरिता आर्थिक गोष्टींचे नियोजन करेन तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण करू शकेन.. पण मी जर काहीच आर्थिक नियोजन केले नाही तर माझी ही इच्छा पूर्ण होणार नाही..म्हणजे माझ्या मनासारखे होणार नाही..

याही पुढे जावून माझी इच्छा गाडी घेण्याची आणि मोठा बंगला बांधण्याची असेल आणि जर माझी तेवढी कुवत किंवा क्षमता नाही तर मी ते स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही..

आपण ज्या समाजात राहतो तिथले ही काही नियम आणि कायदे आहेत..त्याचे प्रत्येकाला पालन करावे लागते .इतरांची मते ही विचारात घेणे जरुरी चे असते. समजा एखादा लग्न झालेला पुरुष एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीला खूप आवडतो किंवा एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाला एक लग्न झालेली स्त्री आवडते .

म्हणजे दोघांचेही लग्न झाले असताना ही दोघे एकत्र आले आणि दोघांनी लग्न करायचे ठरविले किंवा दोघांनी तसेच समाजात राहायचे ठरविले आणि समाज म्हणजे त्यात आजूबाजूचे आणि नातेवाईक ही आले . तर यात कायदा आणि समाज , नातलग या गोष्टींना मान्यता देवू शकतील का ?? नाही ना !!!!

या उलट माझ्याकडे सगळे आहे , पैसा आहे , बंगला आहे दागदागिने आहेत , घरी सगळी चांगली जपणारी माणसे आहेत .. खूप आनंदात आयुष्य सुरु आहे ..आणि अचानक मला दुर्धर आजाराने पछाडले आणि मी कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त आहे समजा शेवटची स्टेज आहे , आता यावर डॉक्टर आणि औषधे ही काही करू शकणार नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले.

कोणतेच उपचार होवू शकणार नाहीत असे जर सांगितले आणि काही दिवसाचा सोबती आहे असे जर सांगितलं ..मृत्यू हा फार काळ लांब नाही असे म्हंटले आणि मी म्हणले नाही नाही मला जगायचे आहे..जगण्याकरिता मी डॉक्टरांना खूप विनंती केली..काही तरी प्रयत्न करा अशी request केली तरी ते शक्य आहे का?? नाही ना!! म्हणजेच काय मला अजून जगायचे आहे पण हा कॅन्सर सारखा दुर्धर रोग मला जगू देणार नाही ..माझी जगण्याची इच्छा पूर्ण करू देणार नाही..

म्हणजेच काय ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या करिता आपण नेहमी प्रयत्न करावे .किंवा काही ध्येय गाठण्याकरिता मेहनत करावी..पण ते आपल्या मनासारखे होईल हे गृहीत किंवा त्याची खात्री धरू नये..

अगदी ” मिशन मंगल movie ” मध्ये सुरुवातीला खात्रीने आपली मोहीम यशस्वी होणार च म्हणून उपग्रह सोडला जातो..पण त्यात मध्येच झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मिशन abort करावे लागले..म्हणजे एव्हढे सगळे शास्त्रज्ञ आणि त्यांनी घेतलेली मेहनत आणि आता पाठविलेले यान मोहीम यशस्वी पार पडणार असे वाटत असताना पुढच्या काही क्षणात मिशन abort करावे लागले..

तसेच दुसऱ्यांदा तयारी पूर्ण असताना पावसाळी हवे मुळे वेळेत पाठवू शकले नाहीत पण वेळ आली तेव्हा यशस्वी रित्या पाठविले ना…तसेच चांद्रयान २ मधले विक्रम आता पोहचणार आणि आपली मोहीम फत्ते करणार असे दिसत असतानाच काही अंतर बाकी असताना विक्रम चा पूर्णपणे संपर्क तुटला..म्हणजे अगदी पूर्ण होत आलेली मोहीम किंवा मिशन ही अचानक अयशस्वी झाले…शास्त्रज्ञ त्यांनी केलेली तयारी..घेतली गेलेली मेहनत आणि अगदी पहिले छायाचित्र ही आले असताना आता मिशन फत्ते झाले असे दिसत असतांना अचानक संपर्क तुटून मिशन अयशस्वी झाले..म्हणजे सर्वांनी प्रयत्न करून ही कोणाच्या च मनासारखे झाले नाही.

म्हणजे अनेक वेळा आपण ठरवितो त्यापेक्षा आयुष्यात खूप काही वेगळे होते..

३ idiots मध्ये फरहान ही फोटो ग्राफी करायची ठरवितो पण आई वडील म्हणतात म्हणून engineering ला प्रवेश घेतो आणि रांचो सारखा खूप चांगला मित्र भेटतो मदत करतो म्हणून त्याची इच्छा पूर्ण होवू शकली..पण प्रत्येकाची पूर्ण होते च असे नाही ना..!!

आपण प्रयत्न करायचे , इच्छा ठेवायची आणि त्यातून जर आयुष्य आपल्या मनासारखे नाही जगू शकलो किंवा गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तरी हार मानायची नाही. आहे ती गोष्ट मनाने accept करायची…खंबीर आणि तटस्थ राहायचे आणि हार ही किंवा आपल्या मना विरुद्ध झालेल्या गोष्टी ही स्वीकार करायच्या. जसे ” मिशन मंगल मूव्ही ” मध्ये मिशन abort झाले , करावे लागले तरी राकेश सर , अक्षय खन्ना .लाडू खातो ..तेव्हा उपस्थित पत्रकार हे बघून त्याला विचारतात की या प्रसंगात ही तुम्ही लाडू कसे काय खात आहात ? . तेव्हा तो म्हणतो की लड्डू पे कहा लिखा है की failure पे नहीं खातें.. म्हणजेच की जी परिस्थिती असेल ती accept करण्याची तयारी पाहिजे.

आयुष्यातल्या ज्या गोष्टी मनासारख्या घडल्या आहेत त्या गोष्टींचा आनंद तर माना च किंवा ज्या आपल्या मनसारख्या नाही घडत त्या accept करा.त्यामुळे आपली मानसिकता आपल्या कंट्रोल मध्ये बकिंवा नियंत्रणात राहील , नाही तर राग , चिंता , भीती ,आणि डिप्रेशन सारख्या मानसिक अवस्थ्याना आपण स्वतः च आमंत्रण दिल्यासारखे च होईल ना!!

आपल्या मनाची तयारी किंवा मानसिकता अशी तयार करा की प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होवू शकत नाही. वेळ, परिस्थिती, आजू बाजूचे वातावरण , व्यक्ती , किंवा स्थल या सगळ्या गोष्टी आणि इतर ही काही कारणे असतील त्यावर ठरते की ती गोष्ट कशी घडणार ..त्यामुळे आपल्या कडून जेवढे बेस्ट करता येईल ते करायचे त्यातून नाही झाले मनासारखे तर जे आहे ते स्वीकारून पुढे जात राहायचे.

जीवन गाणे गात च रहावे झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे. सुनील गावस्कर यांनी म्हणले आहे च या दूनिये मध्ये थांबायला वेळ कोणाला…हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला..त्यामुळे पुढे जो कोणता चेंडू येईल त्याला bat ने टोला मारत जा..कधी बॉल किंवा चेंडू जवळच्या अंतरावर मारला जाईल तर कधी टोला एव्हढा जोराचा असेल की हवेत उंच उडून ग्राउंड पार करून एकदम सिक्सर च जाईल.

प्रत्येकवेळी मनासारखे होणे आपल्या हातात नाही ..आपल्या हातात आहेत ते म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्न करत रहा.. आयुष्यात जे आहे त्याकडे सकारात्मकतेने बघा ..जे नाही त्याची खंत किंवा दुःख करू नका..आयुष्य एकदा च मिळते.. फुलपाखरसारखे मुक्तपणे जगा..आनंदी जगा आणि दुसऱ्याला ही जगू द्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होवू शकत नाही….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!