Skip to content

प्रत्येकवेळी आपल्याला जाणवणारी मानसिक समस्या म्हणजे डिप्रेशन नव्हे..

प्रत्येकवेळी आपल्याला जाणवणारी मानसिक समस्या म्हणजे डिप्रेशन नव्हे..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


समस्या…!! शारीरिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या जीवनाचाच एक भाग आहेत. समस्या नाही असा कोणताच मनुष्य नाही. प्रत्येकजण इथे कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला असतो.कोणाची समस्या शारीरिक असते तर कोणाची मानसिक…!! आता शारीरिक समस्या म्हंटल तर आपण मधुमेह , किंवा सांधेदुखी वगैरे वगैरे अशा विविध गोष्टींची पटकन नावं घेतो.

पण मग जेव्हा एखादी समस्या ही आपल्या मानसिकतेशी निगडित असते तेव्हा ती केवळ आणि केवळ ‘डिप्रेशन’ च असते असं गृहीत धरणारे अनेकजण आहेत. पण प्रत्येक वेळी आपल्याला जी मानसिक समस्या जाणवते ती केवळ डिप्रेशनच असु शकत नाही.कारण शारीरिक समस्यांसारख्याच ‘डिप्रेशन’ व्यतिरिक्तही अनेक वेगवेगळ्या मानसिक समस्या सुद्धा आहेत.

काही जणं काही झालं की फक्त नैराश्य आलय,खूप डिप्रेशनमध्ये आहे ती , किती ते डिप्रेशन , डिप्रेशनमुळे नको नको झालय…हे आपण ऐकतो , पाहतो , अनुभवतो.मान्य आहे की हे असं असतं , होतं.पण ते नेहमीच डिप्रेशन असेल असं होत नाही.जे जाणवतय ते केवळ डिप्रेशनच आहे असं आपण किती ठामपणे सांगतो.पण हे काहीतरी वेगळं असु शकतं याचा आपल्या मनात विचार येत नाही का..??

नैराश्याव्यतिरिक्त निद्रानाश , अस्वस्थता , ताण , वेगवेगळ्या प्रकारच्या ‘anxieties’, एकाग्रहीनता , चिंता ,उदासीनता ,व्यसन यांसारख्या अनेक मानसिक समस्या आहेत. निद्रानाश—तर निद्रानाश ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची समस्या आहे. जगात कितीतरी लोक जी निद्रानाशाने ग्रासलेली आहेत. यामध्ये आपल्या झोपेच प्रमाण खूप कमी किंमत जवळजवळ ते नसतेच.

मनावर झालेल्या आघातामुळे , मेंदूवर ताण येऊन आपल्याला कित्येकदा झोपच लागत नाही.मनाशी निगडित ही निद्रानाशाची समस्या आहे जी आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. चिंता—आपण छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खूप काळजी करतो. अतिप्रमाणात आपल्याला चिंता वाटत असते. चिंता वाटणं स्वाभाविक आणि सहज असलं तरी अतिचिंता मात्र घातकच..!! या मुळे कधी कधी ‘Panic attacks’ सुद्धा येतात.कितीही साधी वाटत असेल तरीही ही अतिचिंता एक मानसिक समस्याच आहे.

ताण—शरिरावर जसा ताण येतो तसाच ताण मनावरही येतो.ताण हा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा असतो. खूप स्ट्रेस आलाय…!!हे आपण कितीदा ऐकतो…?? कधी कधी या ताणाचं स्वरूप हे खूप तीव्र असतं.मित्रांनो नैराश्याप्रमाणे ताणसुद्धा एक प्रकारे मानसिक समस्याच आहे. एकाग्रहीनता—खूप दिवस झाले कशात लक्षच लागत नाही. ना खाण्यात लक्ष आहे ना की काही करण्यात लक्ष आहे.मन एकाग्रच होत नाहीये. मन सारखं divert होतय. असं आपल्या बाबतीत अनेकदा होतही असतं.पण सारख सारख मन एकाग्रच होत नसेल तर ती एक मानसिक समस्या नक्कीच असु शकते. त्याला एकाग्रहीनता असं म्हंटल जातं.

अस्वस्थता—-सतत कोणत्या ना कोणत्या विचारात आपण गढून गेलेलो असतो.करिअर ,पैसे , नोकरी , नाती यांच्या चिंतेमध्ये सतत हरवलेलो असतो.कसं आणि काय होईल या चिंतेमुळे नी विचारामुळे सतत अस्वस्थ वाटत असतं.उदासीनता, चिडचिडेपणा या समस्या सुद्धा वाढत जातात.

एकलकोंडेपणा—अशा गोष्टी घडलेल्या असतात ,किंवा घडत असतात ज्यामुळे वेगवेगळे परिणाम आपल्यावर होत असतात. अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे एकटं एकटं रहावसं वाटतं.इतरांच्या सानिध्यात क्षणभरही नकोसं होतं.खरतरं आपण अतिविचार करतो आणि ताणतणाव ,चिंता , मूड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्यांना आमंत्रण देतो.आपण इतकं खोलवर जात़ की कालांतराने या समस्या मोठ्या होत जातात. म्हणजे अशा प्रकारच्या कितीतरी मानसिक समस्या असतात.

पण आपण मात्र आपल्याला जाणवतय ते केवळ डिप्रेशन आहे असच ठरवून मोकळे होते.इतकच नाही तर अरे हा तु डिप्रेशन मध्येच गेला आहेस वगैरे वगैरे आपण सहज बोलतो.अगदी नैराश्य आहे की निद्रानाश आपण कोणती समस्या आहे त्याच निदान करून मोकळे होते. पण…जाणवणारी गोष्ट तिच असेल असं आपण गृहीत धरण्यापेक्षा त्या गोष्टीच चिकीत्सक पद्धतीने विश्लेषण करूनच निदान करावं.आणि आपण माणूस असलो तरी प्रत्येकाचा पेशा हा वेगवेगळा असतो.

त्यामुळे आपण सगळेच मानसोपचारतज्ज्ञ तज्ञ आहोत असं ठरवून स्वतःच स्वतःच्या अशा समस्यांच निदान करू नका.आणि इतरांनाही सल्ला देताना ‘तु एकदा मानसोपचारतज्ज्ञांना जाऊन भेट’ असा सल्ला द्या. हो हो तु डिप्रेशन मध्येच गेलास असं एखाद्याला सांगून कोणत्याही अजून वेगळ्या समस्या निर्माण करू नका.

कारण ते डिप्रेशन आहे की डिप्रेशनपेक्षा काही कमी किंवा जास्त आहे हे मानसोपचारतज्ज्ञांना भेट दिल्यावर समजु शकतं.त्यामुळे हेही लक्षात ठेवा की आपल्याला जाणवणारी प्रत्येक मानसिक समस्या ही डिप्रेशन नसते……!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!