पैसा गरजेचा पण त्यावरच सगळे आनंद अवलंबून नाहीत ना!!
सोनाली जे
M tonic psychology :
M for Money … आपण आज money टॉनिक psychology cha vichar करूयात.
प्रत्येकजण विचार करत असतो M tonic असेल तर सगळे असते. आनंद मिळतो. सुख असते. पाहिजे ते करता येते. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते विचार करतात माझ्याकडे पैसे असते तर मी ही आनंदी , सुखी असतो. मी भरपूर गोष्टी केल्या असत्या.
ज्यांच्याकडे हे M tonic आहे. तो ते खर्च करण्यापेक्षा त्याची गुंतवणूक करण्यात जास्त आनंद घेतो. पण पुढच्या भवितव्य आणि अचानक उद्भवणारी परिस्थिती , आजारपणे , म्हातारपण याचा विचार करून पुढच्या investment करत असतात. पण अनेकदा त्यांच्या हे लक्षात येत नाही कराव्या investment परंतु त्याकरिता आजचे आनंद , सुख याकडे तेवढे लक्ष देत नाहीत.
खरेच सांगा. जे गरीब आहेत त्यांची परिस्थिती नाही तरी ते आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टीत शोधत असतात. पावसात , चिखलात खेळताना निसर्गच्या सानिध्यात आनंद द्विगुणित करत असतात. चारचाकी नसेल तरी त्याची काढलेली जुनी चाकंवर गाडी गाडी खेळणारी आहेत .. मनमुराद आनंद घेणारी आहेत.
असेच आहे आपण नेहमी money .. आपले आनंद पैशावर ढकलत असतो. पैसा आल्यावर आपण इकडे जावू तिकडे जावू. पैसा असल्यावर या वस्तू घेवू. पण एक बघितले का आजच्या युगात आपण पैसा यावर खूप काही सोपविल आहे. आपण आनंद हा निर्जीव वस्तू मग मोबाईल असेल , गाडी असेल त्या घेण्यात शोधतो.. तर कधी कपडे .. इतर वस्तू रुपी गोष्टी. आणि त्यामागे लागून आपल्याला पैशाविना मिळणारे आनंद आपण विचारात घेतच नाही.
आपल्या लोकंशी मोकळेपणाने मनमुराद गप्पा मारा. गाडी नसेल. तर नसू द्या की जवळपास चालत , सायकल , किंवा बस ने कमी खर्चात खूप चांगल्या सहली करू शकता. मित्र मैत्रिणी मिळून कोणाच्या तरी घरी जिथे मोकळे आवार असेल तिथे रात्री जमून मस्त शेकोटी करा, गप्पागोष्टी , गाणी , वाद्य यांचा आस्वाद घ्या.
कधी तरी लहानपणी जे खेळ खेळत होता ते खेळून बघा. लगोरी , आंधळी कोशिंबीर , शिवाजी म्हणतो ..हा हा हा आणि मग बघा. कशी गंमत जंमत , आपण कायम आपल्या मनासारखे इतरांनी वागावे म्हणून प्रयत्न करत असतो तेव्हा दुसरे कोणी आपल्याला हेच करायचे असे आदेश देते तेव्हा सगळेच करत असतात आपल्याला ही ते करताना मजा येते.
लहान असताना आपण ही psychology नकळत शिकले असतो की नेहमी स्वतः ला वाटेल तसे वागत असताच पण कधी इतरांच्या ही मनाप्रमाणे वागा. पण आपण हे विसरून च जातो ना.. मग हा खेळ खेळताना नव्याने त्याची जाणीव होवून आपलाच आत्मशोध लागतो ना !!
पैसा नाही ..किंवा पुढची चिंता म्हणून खर्च करायचा नाही असे करू नका. कधी कमी खर्चात ट्रेकिंग करा. फिटनेस ठेवा मनाचा आणि शरीराचा. तर कधी जवळपास ची टेकडी भ्रमंती करा. संगीत ऐका , आवडते छंद जपा. घरच्या घरी योगा करा , प्राणायाम करा. आजकाल सोशल मीडिया सगळ्यांकडे आहे भरपूर प्रेरणा देणाऱ्या गोष्टी यावर सहज उपलब्ध असतात.
आणि एक लक्षात घ्या आज तुम्ही वस्तू , मग जो दिखावा माझ्याकडे ब्रँडेड घड्याळ , मोबाईल आहे , ब्रँडेड लॅपटॉप आहे . गाडी ब्रँड नेम मर्सिडीज बेंझ आहे. हे सगळे दिखावा म्हणजे सेल्फ esteem जपता. मी इतरांच्या पेक्षा कसा वरचढ आहे . हे दाखविण्या करिता.
पण जेव्हा सगळे मिळते. पैसा , नाव , प्रसिध्दी , स्थिरता , वस्तू त्यानंतर मात्र व्यक्ती काही तरी अजून पाहिजे ..काही तरी अजून करायचे राहिले यामागे लागतो. याची जाणीव होते आणि ती म्हणजे सेल्फ actualization .
कितीही गोष्टी असल्या तरी माणूस मग स्वतः चा आत्मशोध घेतो. स्वतः चे छंद जपतो. इतरांच्या करिता काही तरी करण्याची इच्छा असते ती पूर्ण करतो. समाज, सोसायटी, गरजू लोकांकरता काहीतरी करत असतो. मग कधी पैशाने, तर कधी कष्टाने, त्यांच्या गरजा असतील त्याप्रमाणे मदत करत असतो. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये रममाण होतो. कधी निसर्गाच्या सान्निध्यात, तर कधी काही अडवेंचर adventire राहिले असतील ते करण्यात, कधी गड चढण्यात . तरी कधी वृक्षारोपण असेल तर कधी वयस्क लोकांच्या बरोबर मोकळेपणाने बोलून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कधी कधी शांत एकांत राहून आत्मपरीक्षण करा. एकांतात पक्षांच्या आवाजातली विविधता . पैसे न खर्च करता ही अनेक गोष्टी करता येतात. पण आपण रडत बसतो किंवा अडकून बसतो M tonic नाही. Money नाही. पैसा असेल तरी ही तो खर्च करण्याची मानसिकता हवी. आणि कधी मित्र पैशा अभावी टाळत असेल तर बिनधास्त बाहेर भेटून भरा की हॉटेल चे बिल.
व.पु. काळे यांची एक गोष्ट आहे. दर रविवारी एक संगीत मैफिल मित्राकडे बसत असे. पण काही कारणाने मित्राला तो खर्च परवडणार नसतो. तेव्हा हे त्या मित्राची बायको आपल्या मैत्रिणीला सांगत असते. तेव्हा तिथून पुढे ती जेव्हा तिथे पार्सल घ्यायला हॉटेल मध्ये जात असे तेव्हा तुमचे बिल भरले आहे असे म्हणून ती ते पार्सल तसेच घेवून जात असे. कोणी ना कोणी असाच रसिक त्याकरिता स्पॉन्सर करतो त्याची अपुरी इच्छा असते.
थोडक्यात काय आनंद गमावू नका. सुख गमावू नका. पैसे सर्वस्व नाही . आणि निदान मित्र आपले यांच्याशी मोकळेपणाने बोला , अडचणी सांगा, पैशाने मदत नाही मिळाली तरी योग्य सल्ला , मदतीचा प्रयत्न अनेक मार्ग सूचवत असतात. किती ही कमावले तर आज अचानक काही ही होवू शकते. Corona मध्ये खूप जणांना प्रत्यय आलाच आहे. अचानक मृत्यू .accident , आजारपणं असेल काही ही होवू शकते. त्यामुळे आपले जगणे राहिले असे कुठे वाटू देवू नका.
आनंद आणि सुख याकरिता M tonic काही प्रमाणात गरजेचे पण त्यावरच सगळे आनंद नक्कीच अवलंबून नाहीत ना ??? जे नाही त्यात अडकून आहे त्याचा आनंद गमावू नका ना !!
आयुष्य सुंदर आहे. M tonic असेल तर त्याचा वापर ही आपण असताना आपल्यकरिता ही करण्यास शिका. आणि नसेल M tonic तरीही त्या परिस्थिती मध्ये ही आनंद कसा मिळविता येईल त्या छोट्या गोष्टी करून आनंदी आणि सुखी रहा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Chan