Skip to content

पेनकिलर खाऊन शरीराचं दुःख कमी होतं, मनाचं नाही

पेनकिलर खाऊन शरीराचं दुःख कमी होतं, मनाचं नाही


सोनाली जे


शरीराचे दुःख म्हणजे काय तर वेदना म्हणजे एखाद्या हानिकारक किंवा तीव्र कारकामुळे उद्भवणारी दुःखदायक जाणीव होय. वेदना हे न सहन होणारी संवेदना बहुतेक वेळा तीव्र किंवा हानिकारक उद्दीपनामुळे झालेली असते.

शरीराची जखम दिसते..हात दुखतो , पाय दुखतो , पाठ दुखी, आपल्याला हे समजते की कुठे दुखते आहे कुठे वेदना आहेत त्या वेदनेवर आपण औषध घेवून पेन किलर घेवून त्यावर मात करू शकतो.

पण मनाचे काय ? मनाची जखम इतर कोणाला दिसत नाही..वेदना इतर कोणाला जाणवत ही नाही..त्यावर कोणी मलम ही लावू शकत नाही. किंवा मनाची वेदना , दुःख कमी होण्यासाठी कोणती पेन किलर नाही.

मनाचे दुःख , त्रास हे प्रत्येक व्यक्तीचे अनुभव , समाज आणि आपल्याच लोकांकडून आलेले अनुभव असतात, काही सुप्त चिंता असतात जसे भविष्याची चिंता , करीयर ची चिंता, आर्थिक चिंता , अगदी एखाद्याला लग्नाची ही चिंता, त्याचे panic attack ही येतात, कधी आरोग्याची चिंता.

डिप्रेशन नैराश्य किंवा उदासीनता आज कल 10 ते 25 टक्के लोक या मानसिक आजाराने त्रस्त आहेत. कारणे अनेक आहेत .जसे जीवघेणी स्पर्धा ,आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध ,त्यामुळे आलेला दुरावा स्वतःला कमी लेखणे ,नापास होणे , असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नीचे न पटणे, घटस्फोट मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे नैराश्य येण्याकरीता ही कारणीभूत आहेत.

अवास्तव अपेक्षा आपल्याकडे जे नाही ते मिळावे याकरिता सतत अपेक्षा पण ती अपेक्षा ठेवताना आपल्या क्षमता , कौशल्य किंवा उणिवा यांचा विचारच केला जात नाही..

प्रत्येकाला टाटा , बिर्ला ,अंबानी व्हावे वाटते पण त्याच्या करिता तुम्ही काय प्रयत्न करता? पण अवास्तव अपेक्षा मात्र आपण करतो. आणि या अवास्तव अपेक्षा मनाला त्रास देत असतात..

एखादा दुर्धर आजार असेल accident असेल त्यातून अपंगत्व असेल किंवा अंथरुणाला खिळून राहावे लागत असेल , त्यात होणारे शारीरिक त्रास , वेदना त्यावर औषधे सुरू असतील तर शारीरिक वेदना , दुःख कमी करतात , परंतु या दुर्धर रोगात मानसिक दृष्ट्या आलेले अपंगत्व , आपण दुसऱ्या कोणावर अवलंबून आहोत, आपण स्वतः काहीच करू शकत नाही..आणि आज एक दिवस नाही तर पुढे आयुष्यभर आपल्याला असेच दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे ही मानसिक परावलंबनाची भावना तुमचे रोजचे जगणे अवघड करीत असते, तुम्हाला तुमचा बोजा दुसऱ्यावर मग शारीरिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या ही आपण कमवू शकत नाही , आपण काही व्यवसाय किंवा earnings करण्यास असमर्थ आहोत ही भावना किंवा हे मानसिक अपंगत्व दूर करण्यास कोणतेच पेन किलर नाही . बरं ही मनाची अवस्था कोणी समजू ही शकत नाही. अगदी सांगायचे तर मराठी मध्ये म्हण आहे ” ज्याचं जळतं त्याला कळतं “.

मन ही अशी गोष्ट आहे की समोरच्या माणसाच्या डोक्यात नक्की काय विचार , काय चिंता आहेत किंवा समोरच्या व्यक्तीच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे समोर असणाऱ्या व्यक्तीला किंवा सोबत असणाऱ्या व्यक्तीला कधीचं दिसू शकत नाही , समजू शकत नाही..उलट जर दोंघांच्या मध्ये तेवढी मोकळीक , सुसंवाद असेल तरच एकमेकांना मानसिक बोच किंवा त्रास समजू शकेल.

विचार ..thoughts, कृती..action, संकल्पना, स्वप्ने, कल्पना imaginations, अपेक्षा ..expectations , acceptance.. स्वीकार, आणि अनुभव experience या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो . आपण कोणत्या परिस्थिती मध्ये कसा विचार करतो यावर ते अवलंबून असते. जसे की आपण कधी समस्या आली तर मुळात ती accept करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न काय करतो, विचार काय करतो,imaginations काय करतो, मार्ग काय काढतो,ते महत्वाचे असते. जसे एखाद्या स्त्रीच्या पती चे अकाली निधन झाले, दोन लहान मुले पदरात आहेत तर पती निधनाचे दुःख होणे स्वाभाविक आहे परंतु त्या दुःखाला च कवटाळून बसले ..पती नाही हे accept च केले गेले नाही तर ती अजून त्यातच अडकून बसेल..निराशा आणि नकारात्मकता वाढेल.

याउलट ती जर पुढचे विचार करू लागली, मुलांचे भवतिव्य , या गोष्टी सकारात्मक रित्या पुढे जाण्यास मदत करतात..पण स्त्रीची आपली प्रेमाची व्यक्ती , आपला आधार कायमचा हरविल्याची जी खंत आहे, दुःख आहे ते तिलाच सहन करावे लागते..ते कोणतेही पेन किलर खावून कमी होणार नाही..त्याकरिता तिला स्वतः गोष्टी accept करून खंबीर राहावे लागेल.तसेच तिच्या मनाला सकारात्मक उभारणी देता येईल याकरिता इतरांनी ही मदत किंवा साथ दिली पाहिजे.

अश्वत्थामा सगळ्यांनाच परिचित आहे..त्याच्या कपाळा वरची जखम कायम वाहत असते , ..तसेच काही लोकांचे आयुष्यभर असते..एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आपल्याकडे नाही याची ठसठस सतत असते.किंवा सतत आपल्याकडे हे नाही ते नाही याची जाणीव. आपल्याकडे जे खूप काही आहे त्या कडे लक्ष च देत नाहीत..त्याचा आनंद , समाधान आपल्याला राहतच नाही. अगदी बायकांचे उदाहरण म्हणले तर अरे तिच्याकडे अशी साडी आहे माझ्याकडे नाही.तशी मला ही घ्यायची याचीच च स्पर्धा असते..

एक दुचाकी असेल तर दुसरी घेवू ..ते कमी म्हणून चारचाकी घेवू..थोडे दिवसांनी ती चार चाकी लहान पडते , जुनी झाली म्हणून लेटेस्ट मोठी घेवू ही चढाओढ कायम सुरू राहते..अर्थात गरज असेल तर नक्की घ्यावे पण दुसऱ्याने असे घेतले म्हणून तसे घ्यावी स्पर्धा किंवा जेलसी ही त्रासदायक ठरते..आणि ही मनाची जखम हिन अश्र्वाथाम्या च्या जखमेसारखी कायम वाहत असते.. ठसठसत असते.

पेनकिलर खाऊन शरीराचं दुःख कमी होतं, तसे मनाचं नाही, मनावर सकारात्मक विचार, वास्तवाचा स्वीकार, आशावाद , समाधान , आहे त्या गोष्टीत आनंद घेण्याची वृत्ती , आणि जीवनाकडे , व्यक्तींकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हेच मनाचे पेनकिलर.

जीवन सुंदर आहे , बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा.मनावर बाह्य गोष्टींपेक्षा आपले स्वतः चे नियंत्रण ठेवा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!