Skip to content

पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेतात, तितकी घरातल्या स्त्रियांची घेतली तर…

पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेतात, तितकी घरातल्या स्त्रियांची घेतली तर…


टीम आपलं मानसशास्त्र


सोशल मीडिया …खूप मोठी जादूच केली आहे. एक तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सोशल मीडिया वर पडीक असतात लोक. Addiction म्हणतात ना तसेच . थोड्या थोड्या वेळाने काही नवीन आले की ते बघण्याची उत्सुकता , एखादी खास मैत्रीण असेल तर तिला सतत मेसेज करून काय करते , कुठे आहे , ती जेवली का .. अगदी library books मिळाली का? याकरिता असेल किंवा ऑफिस मधली असेल तर काम संपले का ? या करिता असेल , नाही तर चहा करिता कंपनी म्हणून येणार का ? याकरिता असेल. पण सोशल मीडिया वरून सतत पिंग करत राहणे आणि सतत touch मध्ये राहणे. अर्थात touch हे दोन्ही अर्थाने म्हणावे लागेल की संपर्कात आणि दुसरे keypad touch मध्ये .हा हा हा.

एखाद्या मैत्रिणीचा , ऑफिस मधल्या collegue चा dp , profile pic , cover photo , status , Instagram pic , story आवडली की लगेच मेसेज किंवा फोन करून सांगणार की खरंच खूप सुंदर आहे..lovely ,. Beautiful , goregous , amazing , yummy , awesome ..जेवढे काही कौतुकाचे शब्द आठवत राहतील ते सगळे सगळे तेव्हा उत्साहाने आठवायचे आणि वापरायचे ही.

त्यांच्या फोटो च कौतुक केल जात आणि त्यांचेशी सातत्याने संवांद ठेवायला सुरुवात होते. हा ड्रेस सुंदर दिसतो. हा रंग खूप उठून दिसतो. ही हेअर स्टाईल भारीच दिसते. मग अगदी ड्रेस कुठून घेतला असेल ते ड्रेस size .. आवडते दुकान , आवडता ब्रँड असे सगळे सगळे भरपूर वैयक्तिक माहितीची देखील देवाणघेवाण होते. सामाजिक माध्यमातून भेटणारी, ओळख झालेली प्रत्येक नवीन व्यक्ती चुकीची किंवा त्रासदायक नक्कीच नसते. पण काहीवेळा चुकीच्या लोकांना प्रतिसाद दिला गेल्यास, त्यांचा हेतू लक्षात न आल्यास, अथवा जास्तच विश्वास ठेवल्या गेल्यास महिलांना स्वतः च्याच अश्या उतावीळ पणे वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.

प्रत्येकाचं स्वतः च असं एक मन असत ज्यामध्ये तो स्वतः च्या फॅनटसी पूर्ण करण्याची स्वप्न पाहत असतो. आजकाल मोबाईल मुळे, अनेकांच्या संपर्कात राहता येत असल्यामुळे, नवीन नवीन अँप्लिकेशन मार्फत संवाद साधने सोपे झाल्यामुळे आपली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतोय. सामाजिक माध्यमातून जी आभासी दुनिया आपल्याला खुणावत असते तिच्या किती आधीन जायचं हे ठरवणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.

महिला मुळातच भावनाप्रधान असल्याने त्यांना या स्वरूपाच्या आभासी प्रेमाची पटकन भुरळ पडते. महिलांना हे समजत नाही की जरी त्यांनी अश्या प्रकारच्या ऑनलाईन प्रेम प्रकरणात भावना गुंतवल्या असतील तरी त्या कोणत्या मर्यादेपर्यंत असाव्यात ? चॅटिंग करताना आपली तसेच समोरच्याची भाषाशैली, भाषेचा दर्जा किती घसरू द्यावा, किंवा किती लगट करून द्यावी आणि घ्यावी.

त्यामुळे मित्र , ऑफिस मधला सहकारी , शेजारी राहणारा जो हळूहळू मैत्री वाढवत असतो. तो खरेच मैत्रिणीची प्रेमाने चौकशी करत असतो. काळजी करत असतो. अगदी दमलीस ना ! आज खूप बिझी होतीस . खूप अभ्यास , खूप काम अगदी घरात असेल स्त्री जरी ओळखीची तरी घरकामात खूप वेळ गेला ना !! आज काय काय केले ..इथून सुरुवात झाली की ती बिचारी खरेच तिला कुठे तरी सॉफ्ट कॉर्नर पाहिजे असतो. मन आपलेपणाने मोकळे करता यावे अशी जागा हळूहळू सापडते. पण go with the flow हे डोक्यात बसलेले असते. मग काय कसेही , कोणत्या ही पातळीवर वाहवत जातात.

मैत्रीण असो सहकारी असो घरी पोहचली का? कधी ? घरी कशी गेलीस .. अरे रे कॅब वेळेत आली नाही का ? अरे रे local मिळाली नाही का .? अरेच्चा गाडी कशी पंक्चर झाली. मग जवळ मिळाली का करून ..

इथपासून सकाळी सुप्रभात ..आजचा दिवस चांगला जावो. Good afternoon , good evening , good night यांचे भरपूर मेसेज . अगदी मिस यू.
सणासुदीला शुभेच्छा वर्षाव ..

इतके सतत सोशल मीडिया वर पुरुष आपल्या जवळच्या किंवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या , कॉलेज मध्ये एकत्र असणाऱ्या मैत्रिणी , स्त्रियांची काळजी घेत असतात.

काही वेळेस अगदी सहज चौकशी जरी केली तरी काही स्त्रिया या गैर समज करून घेवून त्यांचे भावना विश्व निर्माण करतात. अगदी आपल्यात काही खास असेल म्हणून चौकशी करतो , आणि प्रेम यासारख्या चुकीच्या कॉन्सेप्ट मध्ये जातात. तर काही स्त्रिया तुम्ही कौतुक करता ना मग घ्या फायदा म्हणून तुम्हाला लुटणाऱ्या ही भेटतात.

आणि खरे खोटे हे काही समजत नाही. प्रेम खरे आहे का मेसेज खरा ..का खोटे प्रेम आणि मेसेज मात्र प्रेमाचा . काही वेळेस सोशल मीडिया चे तुमचेच मेसेज तुमच्या विरूद्ध वापरून फसवणूक केली जाते. .यातून भावनिक , मानसिक त्रास , फसवणूक यासारखे अनेक प्रकार ही होतात. जे आपण वाचतोच.

पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेतात, तितकी घरातल्या स्त्रियांची घेतली तर…

घरातल्या ही स्त्रिया यांना सुरक्षित राहावे असे वाटत असते. त्यांना ही. मानसिक , भावनिक आधार पाहिजे असतो. तुम्ही त्यांचे ही कधिंतरी कौतुक करावे ही अपेक्षा असते. अरे वाह छान दिसतेस हुं असे आपल्या आई , बहीण , बायको , वहिनी ,अगदी मुलगी सुधा यांना म्हणालात तर तिला अजून उत्साह येतो. मन आणि शरीर दोन्ही उत्साही होते. घरच्या स्त्री चे dp वरून कौतुक असेल . स्वैपाक यावरून असेल हा पदार्थ छान झाला असे असेल . तर ती अजून उत्साहाने ते करते. विविधता आणते. नवनवीन पदार्थ हौसेने करते. Encouragement मिळत असते तिला . तुम्ही दिलेली दाद म्हणजे तिची प्रेरणा असते. किंवा किती दमते एव्हढे एक वाक्य तिला सगळे त्रास , दुःख , आलेला थकवा विसरून जाण्यास मदत करतो.

आपल्या घरच्या पुरुषांना आपली काळजी आहे. त्यांना आपण घरासाठी जे करतो ते समजते. जाणीव आहे. यात स्त्री घरचे करून बाहेर नोकरी , व्यवसाय करणारी असेल तर किती करतेस ग तू. किती धावपळ होते तुझी . पण आनंदाने करतेस एव्हढे म्हणले तरी तिला समाधान मिळतें . आणि परत पुढे जोमाने कामे करण्यास ती उत्साहाने तयार होते. ही प्रेरणा मिळत असते तिला. भावनिक दृष्ट्या तिलाही समजून घेणार आपले कोणी आहे हा आधार मिळत असतो.

आणि याउलट जर घरच्या स्त्रीची कदर नसेल . तिला समजून घेवून तिला ही थोडे उत्साही होण्यासाठी good morning , कधी प्रेरणादायी तरी कधी हसवीणारे असे लेख पाठविले .. तिची ही इतर सोशल मीडिया वर असणाऱ्या स्त्रियांना आपुलकीने विचारपूस , काळजी घेता तशी घेतली तर तिला स्वर्गसुख च मिळेल की. तिचे थकलेले , जबाबदाऱ्या पार पाडून मग घरातल्या , बाहेरच्या , मुलांच्या , भावाच्या , वडिलांच्या , सासू सासऱ्यांच्या आई वडिलांच्या , शेजारी पाजारी , ऑफिस या सगळ्या जबाबदाऱ्या , घरची कर्तव्य , साफ सफाई असेल ते अडीनडीला घरगडी , इस्त्रिवाली, ड्रायव्हर , कधी घरगुती डॉक्टर , तर कधी परिचारिका , बेस्ट chef .cooking मास्टर , तर प्रसंगी जी जबाबदारी पडेल ती पार पाडणारी ही घरची स्त्री.

पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेतात, तितकी घरातल्या स्त्रियांची घेतली तर…ती तुमचे आयुष्य अजून सुंदर फुलवेल. अनेक चांगल्या गोष्टी ही तिच्या कडे आहेत. ती ही चांगले काम करणारी , चांगली दिसणारी , प्रोजेक्ट असो किंवा घर काम आनंदाने पूर्ण करणारी त्याची ही कदर करायला शिका. तिलाही कधी तरी कौतुकाचे , काळजी चे , मदतीचे , आपुलकीचे , प्रेमाचे , प्रेरणा देणारे चार शब्द पाठवा. बोला. ती आज जेवढे करते त्यापेक्षा अजून कैक पट उत्साही होईल . आणि तुमच्या आनंद , सुखासाठी अजून झटेल. ती ही व्यक्ती च आहे. तिला ही चार गोड शब्दांची , एखाद्या सुंदर मेसेज ची गरज आहेच की. आणि तीच मग सोशल मीडिया वर ही आपल्या घरातल्या पुरुषांना, त्यांनी दिलेल्या प्रेरणा यांना सगळीकडे viral करेल .. करते.. हा हा हा.

घरची स्त्री अपेक्षा करत नाही पण तिला ही शब्द , संवाद , भावना , प्रेरणा , प्रेम , आपुलकी याची , नव्या विचारांची टॉनिक म्हणून गरज असतेच की. निदान घरच्या पुरुषांनी घरच्या स्त्री ला चांगले म्हणले , काळजी घेतली तर ती गैरफायदा घेणार नाही. फसवणूक नाही. उलट अजून काळजी घेईल तुमच्या मनाची , शरीर स्वास्थ्याची. पैशाची ही . आणि सुख , शांतता मिळेल.

आयुष्य सुंदर आहे . पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेता, तितकी घरातल्या स्त्रियांची घेवून अजून सुंदर बनवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पुरुषांनो, जितकी काळजी सोशल मीडियावरील स्त्रियांची घेतात, तितकी घरातल्या स्त्रियांची घेतली तर…”

  1. अगदी बरोबर आहे. लेख खूप आवडला.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!