परिस्थितीची जाण असणारे तरुण-तरुणी वाया जात नाहीत.
मयुरी महेंद्र महाजन
पुणे.
मानवाच्या जन्मापासून ते त्याला दुनियादारीची समज ,येईपर्यंतचा माणसाचा प्रवास ,त्याच्यावर झालेले संस्कार, आणि त्याने सोसलेले परिस्थितीचे न दिसणारे चटके, त्याच्या संपूर्ण आयुष्याला आकार देत असतात, असे म्हणतात की परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, आणि या परिस्थितीची जाण ज्यांना असते ना…..,!
अशी तरुण-तरुणी कधीच वाया जात नाही, मित्रांनो कदाचित माझे शब्द तुम्हाला काट्यासारखे टोचतील ,परंतु हे तितकेचं वास्तव आहे ,आज प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासाठी गरजेपेक्षा जास्त च्या सुख सोयी उपलब्ध करण्याकडे पालकांचा कल दिसून येतो….., असलेली श्रीमंती सुखसोयींचा उपभोग घ्यायला हरकत काहीच नाही, परंतु हे सर्व जर वडिलोपार्जित संपत्ती ची श्रीमंती असेल ,तर आपण आपलं वेगळं अस्तित्व स्थापन केलं का???????? असा प्रश्न पडतो…….,
कारण की जे आयतं मिळते, त्याची किंमत माणसाला राहत नाही ,आणि हो हे सुद्धा तितकेच खरे आहे, की हजार रुपयांची पार्टी देणार्या मुलांसोबत, केवळ शिक्षणासाठी शंभर रुपयांवरती काम करणारे तरुण-तरुणी सुद्धा आहेत, मिळेल ते काम करायचं, वेळ प्रसंगी वडापाव खाऊन दिवस ढकलायचा ,परंतु तितक्याच जिद्दीने स्वप्नांचा पाठलाग करायचा ,ज्यांना आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी फरफट करावी लागते ,ज्यांना आईच्या कष्टाची, बापाच्या घामाची, किंमत असते,
अशी मुलं-मुली आयुष्यात कधीच वाया जात नसतात ,माहिती असतं वय अल्लड आहे ,बुद्धीचा जोर कितीही ज्ञानाच्या शिकवणी घेत राहिल्यात, तरी बरोबरीची संगत बऱ्याचदा व्यसनांसाठी, चुकीच्या कामासाठी, परावृत्त करू शकते………, परंतु आपल्या परिस्थितीची जाणीव माणसाला कधीच यासाठी परवानगी देत नाही ,..अन्न वाया घातल्यावर जेव्हा घरातील मोठी मंडळी आपल्याला रागवतात, तेव्हा त्या पाठीमागे आपल्याला रागवण्याचा हेतू नसून ,आपल्या अर्थी त्या गोष्टीची किंमत नाही, आणि ते ताटातली भाकरी किती कष्टाने कमवावी लागते, याची आपल्याला जाणीव असावी…, यासाठी ते बोलणं असतं ,….
शिक्षण घेण्याच्या वयात ,जेव्हा जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ,तेव्हा सुरू होतो संघर्ष आपल्यात आणि परिस्थितीत, ज्यांनी ऊन्हाचे चटके बघितलेले आहे, ज्यांनी पोटाची भूक बघितलेली आहे ,ज्यांना कुठली गोष्ट मिळाली नाही ,म्हणून मन मारून घेतले आहे ,त्यांना विचारा परिस्थिती काय असते …..,,.,,,,,,,,,,,,आज सर्व काही असून सुद्धा घराघरांमध्ये कलह आहे ,भांडणे आहेत, लहानपणीचं ईतके लाड सुरुय की असलेल्या गोष्टींची किंमत उरलेली नाही…… कारण सहज मिळालं ….ना……कधीतरी मागितलेली वस्तू नका देऊ, कधीतरी उन्हाचे चटके बसू द्या…, जेवणासाठी कितीतरी खटाटोप,हे नको तर ते,…. ते नको तर हे…. कधीतरी उपवास घडू द्या ,…कळेल परिस्थिती काय असते!!!!!!!!!!!!….,,,
आज प्रत्येक आई-वडिलांना वाटते ,जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकरांना मिळावं…. जरूर मिळावं त्याला हरकत नाही… परंतु ते जाणिवेतून मिळावं, त्यांना त्याची जाण असावी ,काही ठिकाणी परिस्थितीपुढे आई-वडीलचं ईतके लाचार असतात ,की पोरांना काही द्यायची इच्छा असून सुद्धा त्यांना ते देऊ शकत नाही ,परंतु त्यांना जाण असते, आणि त्यातून ते मोठे होतात, आपली परिस्थिती बदलण्यासाठी परिश्रम घेतात, आणि एक दिवस त्यांच्या कष्टाचे,, मेहनतीचे, चीज होतेचं,… परंतु कितीही झालं तरी भोगलेली परिस्थितीत ते कधीही विसरत नाही, आई वडिलांचा कानमंत्र ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, हा कायम लक्ष्यात असतो,…
आज वाढदिवसाला पाचशे ,हजारचा, केक घेणारी तरुण-तरुणी सुद्धा आहेत ,आणि पन्नास रुपये वाचावे म्हणून पायी अंतर कापणारी तरुण-तरुणी सुद्धा आहेत, तुम्हाला वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे ,कधीतरी अशा मुला मुली सोबत करा, ज्यांचे या जगात कोणीच नाही, रस्त्याच्या कडेने काहीतरी विकायला म्हणून बसलेले असतात, त्यांना काही गोष्टी देऊन सेलिब्रेट करा ना…., वाढदिवस….जो वाढदिवस तुम्ही या पद्धतीने साजरा करणार त्यादिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ,तुम्हाला आयुष्यभराचे समाधान देऊन जाईल ….,यात शंका नाही….,
जाण असणे महत्त्वाचे आहे, ते भावनांची जाण असो,पैशांची जाणं असो,आपल्या माणसांची जाणं असो, जे परिस्थितीची जाणं जाणतात…, त्यांना आयुष्याच्या वाटा बरोबर कळत जातात…. परिस्थितीची जाणीव वाया जात नाही ,कष्ट आणि मेहनत कधीच वाया जात नाही, फुकटाचं कधी भेटत नाही, भेटलं तरी ते पचत नाही,, म्हणून आपल्या परिस्थितीशी नेहमी दोन हात करायची तयारी असावी…..!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



madam aata sadhya aasa dista ki je tarun taruni ya paristitun var aalet ani sadhya chaglya paristitit aahet tya sarvana aata parat garib lokanmadhe, tyancha ghari, jau vatat nahi ani te tyancha mulana pan jau det nhit.
aapan ya vishaya var pan ek lekh lihila pahije ki tyanchi aashi mansikta kasha mule nirman zhali asavi ani tya sathi kay karta yeu shekte.