परफेक्ट जोडीदार मिळावा हा हट्ट ऍडजस्टमेंटच्या जगतात कितपत टिकेल??
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
परफेक्ट जोडीदार…….. मला कसा अगदी परफेक्ट जोडीदार हवा. तरच मी लग्न करेल. किंवा जोपर्यंत मला माझ्या मनासारखा नाहीतर मग अगदी परफेक्ट जोडीदार मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आजकाल असा हट्ट करणारी पिढी आपण पाहतोय. त्यातलेच काही आपणही आहोत.दिवसागणिक वय वाढत जातं आणि आपला हट्टही वाढतच जातो.पण हाच हट्ट या ऍडजस्टमेंटच्या जगतात कितपत टिकेल??
आणि टिकेल की नाही..??असा प्रश्न स्वतःच्याच बाबतीत कधी पडतो का हो….?? आणि जरी पडत असेल तर मग हट्ट आणि ऍडजस्टमेंट या दोघांपैकी एक निवडताना तुम्ही काय निवडाल……??परफेक्ट जोडीदार हवा असा हट्ट कराल की कुठेतरी थोडीफार ऍडजस्टमेंट कराल…?? कारण सगळ्यांचेच सगळेच हट्ट असे सहजासहजी पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठेतरी ऍडजस्टमेंट तर करावीच लागते.
कदाचित तुमचा हा हट्ट पूर्ण होईलही.पण शंभर टक्के शाश्वती मुळीच नाही.आणि खरं सांगायचं तर हा असा हट्ट फार काळ या एडजस्टमेंटच्या जगात टिकून राहील असं वाटत नाही. कारण आपण म्हणताना परफेक्ट जोडीदार हवा अस म्हणतो.पण इथे परफेक्ट आहे तरी कोण…???एकदा स्वतःलाही विचारुन पहा की आपण खरच परफेक्ट आहोत का…??कारण समोरचाही आपल्यात तेच परफेक्शन पाहत असतो. तुमच्यासारखाच तोही तितकाच हट्टी असतो.
तो असाच हवा…तसा नको..तो एकदम परफेक्ट असावा अशा दोघांच्याही अपेक्षा असतात. केवळ ही अपेक्षा नाही तर एक प्रकारचा हट्ट असतो.तो की या एडजस्टमेंटच्या जगात पुरवणं खरच खूप अवघड आहे.अशा हट्टाला आपण जर सोडायला तयारच नसु तर जोडीदार मिळणं कधी कठीण होऊन बसेल कळणार नाही.
आयुष्य म्हंटल तर मोठ्ठ आहे आणि म्हंटल तर अगदी क्षणभंगुर आहे. मग आयुष्याच्या जोडीदाराला इतका वेळ उंबऱ्यापल्याड का ठेवायचं…?? असही व्हायला नको नं….की आयुष्य निघून चाललं आणि जोडीदार फक्त स्वप्नातच राहिला..अगदीच परफेक्ट असं कोणी नसतं हा विचार करून आपण आपला हट्ट सोडणं किती गरजेच आहे याचा विचार जरूर करा.
मान्य आहे की नेहमीच एडजस्टमेंट करण खूप अवघड जातं.समोरच्याची कोणती न कोणती गोष्ट आपल्याला खटकतेच. पण एका गोष्टीमुळे तो परफेक्ट नाही किंवा तो कधीच परफेक्ट असु शकत नाही हे आपण गृहीत धरतो. आणि आपला हट्ट मात्र तसाच धरून ठेवतो.हेही मान्य आहे की पूर्ण आयुष्य आपल्याला जोडीदारासोबत काढायच असतं. त्यामुळे तो निवडताना आपण विचार जरूर करतो.पण ‘परफेक्ट जोडीदार’ हे समीकरण आजही सुटलेलं नाही. आपण इथेच अडून बसतो.’सगळं चांगलय पण न ती एक गोष्ट मला काही आवडली नाही.’
असा प्रसंग कित्येकांनी अनुभवला असेलही.पण मग एडजस्टमेंट करायची नाहीच का…??? आणि कोण शाश्वती देणार की आत्ता परफेक्ट आहे आणि नंतरही तो परफेक्टच असेल याची…?? गोष्टी बदलुही शकतात.आणि त्यामुळे हा असा हट्ट या एडजस्टमेंटच्या जगात फार काही टिकणार नाही. आणि टिकलाच तर तो एखादा अपवाद नक्की असेल.म्हणून इतकही हट्टाला पेटू नका..
थोडी एडजस्टमेंट करून कोण किती परफेक्ट आहे हे पाहण्यापेक्षा दोघांनी समतोल राखून आयुष्याला परफेक्ट बनवलं तर छान वाटेल.आणि कदाचित बऱ्यापैकी समजदार लोकं खूप आहेत. हट्टाऐवजी ती थोडीफार एडजस्टमेंट नक्की करतील असं वाटतं. बाकी जोडीदार ही ज्याची त्याची गोष्ट… पण मग परफेक्शनमागे धावायच की एडजस्टमेंट करायची हेही ज्याचं त्याने ठरवावं. हट्टामुळे कितीतरी वेळ निघून जातो.आणि कदाचित तोच वेळ परफेक्ट बनण्यासाठी खर्च केला तर गोष्टी सोप्या होतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


