Skip to content

पटकन भावनिक होणं…ही आपल्यातली अत्यंत वाईट सवय !!

पटकन भावनिक होणं…ही आपल्यातली अत्यंत वाईट सवय !!


मिनल वरपे


आपल्याला एक वाईट सवय आहे म्हणजे अगदीच वाईट म्हणता येणार नाही पण त्या सवयीचा काही काळ का असेना त्रास आपल्याला होतो ती म्हणजे भावनिक होण्याची मग ती व्यक्ती असो किंवा परिस्थिती.

अलीकडेच मला आलेला अनुभव.. मी जॉब करत होती तिथे सर्वांशी वेळ मिळेल तेव्हा गप्पा मारणे, जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र हसताबोलता एकमेकांच जेवण वाटून घेऊन पोटभरेस्तोवर जेवायचं.. आणि घरी जायची वेळ झाली की पुन्हा सर्वांना हसत हसत टाटा बाय बाय करत घरी यायचं…

माझी सगळ्यांसोबत छान मैत्री झाली होती. एकमेकांची थट्टा मस्करी करत आपली काम आपल्या वेळेत पूर्ण करत मस्त मजेत दिवस जात होते. पण मनात मात्र असायच की आपल्याला कायम एकाच ठिकाणी नोकरी नाही करायची. प्रगती हवी असेल तर मिळेल ती संधी आजमवायची पण पुढे जायचं.

एकदा मला अजून चांगल्या पगाराची नोकरी सांगून आली. जेव्हा कळलं तेव्हा आनंदापेक्षा दुःख च जास्त झालं आणि ते सुद्धा कसलं तर या सर्वांना सोडून जावं लागेल.आणि मग माझ्या सोबत असणाऱ्यांना mhntl की मला आता हा जॉब सोडून दुसरीकडे जायचं आहे तर ते म्हंटले चांगलं आहे कर तो जॉब.. पण आम्हाला भेटायला येत जा.. तुझी आठवण येईल आम्हाला..

हे ऐकल्यावर मी अजून जास्त भावूक झाली.. काही दिवस तर मी शांतच झाली या विचाराने की मला कस जमेल नविन ठिकाणी जायचं नविन माणसं.. ह्या सर्वांना सोडून जायचं.. आणि या विचारांमुळे मी तिथे जितके दिवस होती तेवढे दिवस काहीच एन्जॉय केलं नाही. आणि नंतर मला काही कारणाने जॉब सोडायची गरज लागली नाही.

आपण कधी कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जातो.. आत्या, काका, मावशी, मामा किंवा लग्नानंतर माहेर म्हणा.. तिथे काही दिवस राहतो खूप मज्जा करतो. आणि जेव्हा परतायचा दिवस ठरतो तेव्हापासून आपण एकदम शांतच होतो.. खूप भावनिक होतो की आता ह्या घराला घरातील माणसांना सोडून जावं लागेल..आपण इकडंन गेल्यावर यांना आणि घरी गेल्यावर आपल्याला कस करमणार या विचारांनी आपण हातात असलेल्या वेळेचा आनंद घेत नाही.

आपण नविन माणसांना भेटतो.त्यांच्याशी ओळख वाढते. मैत्री होते आणि जर ते आपल्याला सोडून कुठे जाणार असतील तर आपण त्यांच्याबद्दल खूप भावनिक होतो.

असे अनेक उदाहरण आपल्या जीवनात आपल्या आजूबाजुला घडत असतात आणि या वागण्याचं कारण म्हणजे जास्त भावनिक होणे.

मन आणि भावना या प्रत्येक व्यक्तीला असतात. अस कधीच होत नाही की एखादी व्यक्ती भावनाहिन आहे.काही जण रडून, शांत होऊन व्यक्त होतात तर काही वागण्यात कोणताच बदल न करता आतल्या आता भावनिक होतात कोणालाच सांगत नाही दाखवत नाहीत.

आपण कोणाला सोडून जाणार असू तर त्या माणसांना सुद्धा वाईट वाटतेच पण कोणी त्यांचं काम, त्यांच्या जबाबदाऱ्या सोडून वागत नाही.

खर तर भावनिक असणे होणे यात काहीच चुकीचे नाही. पण ही भावनिकता आपल्या प्रगती ला, आपल्याला पुढे जाताना आड यायला नको.

मी जर लांब गेलो तर माझं कस होईल…याच कस होईल.. खर तर आपल्याला वाटते तस होतच नाही. कारण तुम्ही जरी जुना जॉब सोडून नविन जोबवर गेलात तरी तुमच्या आजूबाजूचे तुमचाच विचार करतील अस नाहीना.. ते त्यांच्या कामाला वेळ देतील त्यांचं आहे तस रूटीन चालूच राहणार.

आपण कोणाच्या घरी राहून आलो तरी काही वेळ त्यांना घर रिकामं वाटेल नंतर त्यांचं रूटीन नुसार ते busy होतील आणि बाकी कसला विचार करायला त्यांना वेळ सुद्भा मिळणार नाही.

आपण ज्यांना भेटतो ते आपल्याला सोडून गेल्यावर आपल्यात अडकत नाहीत ते नविन माणसांना भेटून तिथे त्यांचा वेळ सहज घालवतात.

म्हणून आपण सुद्धा भावनेत अडकून राहील नाही तरच उत्तम.आपण स्वतः ला इतकं कमजोर नाही समजायचं जे समोर असेल त्याला महत्त्व द्यायचं. वाईट वाटते, दुःख होते पण त्यामधे वेळ न घालवता आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करायचं.

आपल्यात क्षमता असते ज्यातून आपण आपल्या भावनांना बाजूला ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो.फक्त आपल्यातील क्षमता ओळखायची. भावनिक होण्यापेक्षा असलेल्या वेळेत त्या माणसांसोबत,. त्या क्षणात, त्या परिस्थितीत जगून घ्यायचं…म्हणजे नंतर आपण चांगल्या प्रकारे आपल्या कामाला लागू..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!