Skip to content

नैराश्य दूर करण्यासाठी वारंवार ‘घाणेरडे व्हिडिओ पाहणे’ हा उपाय असू शकतो का?

नैराश्य दूर करण्यासाठी वारंवार ‘घाणेरडे व्हिडिओ पाहणे’ हा उपाय असू शकतो का?


मयुरी महेंद्र महाजन,

पुणे,


हल्ली आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात व्हिडिओ पाहणे जणू जिवनाचा एक भागच म्हणावा….., आणि त्यामध्ये समस्या कुठलीही असेल, त्यावर तोडगा म्हणून सहजच व्हिडिओ कडे बघितले जाते, काही वेळेस त्यातील माहिती आपल्याला दिशाभूल करणारी सुद्धा असू शकते ,परंतु आपण भोळ्याभाबड्या विचाराने त्या गोष्टी सहजचं करत असतो, आजच्या आपल्या जनरेशन मध्ये नैराश्य हल्ली खूप लवकर आणि छोट्याछोट्या कारणांवरूनही पाहायला मिळते, तसे तर त्यालाही कारणे आहेतचं…. कारण पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात तितका संवाद मनमोकळेपणाने होत होता, आता काही अंशी त्यामध्ये तफावत दिसते…..,

कारण लहान मूल रडत असताना, जेव्हा पूर्वीच्या काळी आई त्याला जवळ घेऊन छातीशी कुरवाळत होती, त्यावेळेस आईच्या हृदयाच्या स्पंदनाशी त्या बाळाची जुळलेली स्पंदने, त्याला शांत करत होती, आताचे चित्र मात्र वेगळे आहे ,मुलं रडताना बघितल्यावर सर्वात आधी त्याच्याकडे मोबाईल दिला जातो, आणि ते मुलं सुद्धा ते बघून शांत होतो, इतका परिणाम आपण त्या बालमनावरती कोरतोय हे अजूनही आपल्या लक्षात येत नाहीयं….

कारण मित्रांनो, आपण फक्त तात्पुरती समस्या सुटण्याकडे, लक्ष देत आहोत,परंतु तात्पुरती सुटणारी हीचं समस्या जेव्हा इमच्या नव्या समस्यांना जन्माला घालणार असेलं, तर आयुष्यात एका समस्येतून निघून लगेच, दुसऱ्या समस्येत सापडणार, इतका आम्ही त्या साधनांचा वापर करायला लागलेय…,,

बरं त्या व्हिडिओ पाहायला काही बंधनं नाहीत, कुठल्याही वेळेची मर्यादा नाही, वेळ नाही, काळ नाही, काय पाहावं, यालाही कुठली सीमा नाही , अगदी कुठेही, कधीही, कितीतरी वेळ वाया घालवतो ,आणि त्यातून निष्पन्न काय, काही नाही, त्यामुळे नैराश्य आहे, तर त्याला स्वीकारा, त्याला दूर करण्यासाठी घाणेरडे व्हिडिओ पाहणे, हा उपाय नाही, कारण जर थोड्यावेळासाठी असे जरी वाटले, की नाही या समस्येतून आपण बाहेर पडलो, परंतु अतिविचार यासारख्या समस्येत अडकण्याची शक्यता असू शकते, कारण समस्या कुठलीही असो, त्यावर फक्त तात्पुरता उपाय करून चालणारं नाही ,कारण तात्पुरता उपाय आपल्या समस्येची वाजणारी घंटा असते….

आज बघा ना घराघरातील वातावरण याचा आपण थोडक्यात आढावा घेतला, तरी आपल्या लक्षात येईल की कुटुंबांमध्ये मोबाईल सर्वांकडे आहे,परंतु संवाद हरवलेला दिसतो,अगदी लहानांपासून, थोरामोठ्यांनी पर्यंत, सगळेच व्हिडीओ क्लिपच्या जगात वावरताना दिसतात, साधने वापरू नका, असे अजिबात नाही, परंतु त्या साधनांचा अतिवापर, गैरवापर ,आणि त्यामुळे आपण स्वतःचे नुकसान करून घेत असणारं, तर ते आपण थांबायला हवे, ज्या पद्धतीने समस्या असतात,

त्याच प्रकारे त्याची उत्तरे सुद्धा असतातच, फक्त योग्य ते उपाय, योग्य त्या पद्धतीने, व्हायला हवे, तरच समस्या सुटण्यास मदत होते,व्हिडिओ क्लिपचा प्रकार खूप लोकप्रिय ,आणि सोपा मानला जातो, परंतु आपण काय बघतोय, आणि कशासाठी बघतोय, हे प्रश्न आपण स्वतःला केले पाहिजे, कारण मनोरंजनाचा भाग सोडला, तर कितीतरी जण व्हिडीओ क्लिप पूर्ण न बघताच, फक्त इकडून तिकडे फॉरवड करतात ,

जर समस्यांचे उत्तर व्हिडिओमध्ये शोधत असालं, तर काही गोष्टींची काळजी घ्या, तुम्ही कशासाठी व्हिडिओ बघत आहात, आधी स्वतःला विचारा, नंतर तुमचे उत्तर समाधानकारक असेलं, तर घाणेरडे व्हिडिओ ची मदत न घेता, एखाद्या समुपदेशक आणि त्यावरती, त्याच्या परीने, त्याच्याज्ञानानुसार, आपल्यासाठी काही टिप्स दिल्या असतीलं, तर ते वाचून, आपण शक्य असल्यास फॉलो करू शकतात, शक्य असेलं, तर त्याचे कारण कशामध्ये आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करावा ,

आणि त्यासाठी ध्यान, मेडिटेशन रोज नियमितपणे आपण त्यावर काम करू शकतो ,आणि अपेक्षित असलेला रिझल्ट मिळवू शकतो, त्यासाठी आपल्या दिनचर्यतून आपण काही वेळ राखून ठेवायला हवा…..

आयुष्याच्या प्रवासात कोणी वाटसरु नसेल, कोणी वाट दाखवणारा नसेल, तेव्हा तो प्रवास नसून फक्त भटकंती असते, कारण जितक्या समस्या आहेत,त्यावरतु तितकी औषधसुद्धा आहेत, म्हणून समस्येवर औषध घेतानां, ते औषध ह्या समस्येवरती आहे,किंवा नाही , हे आधी तपासून पहा,

अन्यथा बोट कापल्यावर हळद, टाकण्याऐवजी तिखट टाकलेली आपल्यालाचं त्रास देवू शकते, त्यामुळे आपल्या मानसिक क्षमतांवरती आपल्याला कुठले संस्कार करायचे आहेत, हे आपणच आपले ठरवावे, कारण होऊन गेलेले संत, महात्मे सारखी लोक साधना करत होती, आपण ही छोटीशी साधना जरी केली तरी आपल्या कितीतरी समस्या सुटू शकतात…..!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!