Skip to content

निसर्ग आहे, तो पर्यंत मानसिक स्वास्थ्य टिकून आहे!

निसर्ग आहे, तो पर्यंत मानसिक स्वास्थ्य टिकून आहे!


मिनल वरपे


शारीरिक मानसिक आणि आर्थिक या तिन्ही बाजूंनी समन्वय साधने अगदीच सोपे नसते. जेव्हा आपली मानसिक स्थिती उत्तम असेल तेव्हाच आपण शारीरिक रित्या सबळ राहू..आणि शारीरिक रित्या उत्तम असणार तेव्हाच आर्थिकतेने संपन्न राहणार.

उदाहरणार्थ, जर आपली मनस्थिती चांगली असेल तेव्हा आपलं शरीर सुद्धा आपल्याला साथ देते. बैचेन वाटणे, मन अस्थिर वाटणे यामुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडू शकते.

एखाद्या ठिकाणी आपण जॉब करतोय आणि सारखी तब्येत बिघडते अस घडत असेल.. आपल्या शारीरिक तक्रारीमुळे आपलं कामात लक्षच लागत नसेल तर या सर्वाचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो म्हणजेच आर्थिकता आलीच. जेव्हा आपण मनाने प्रसन्न असू तेव्हा आपलं शरीर सुद्धा उत्तम राहते.

मुळातच मानसिकता शारिरीकता आणि आर्थिकता याचा समन्वय साधण्यासाठी सर्वात महत्त्वाच आहे ते म्हणजे निसर्ग.

कोणताही मानसिक आजार असो वा शारीरिक त्या व्यक्तीला निसर्गाच्या सानिध्यात राहील की ताजेतवाने वाटते.

शहरांची गर्दी सोडून जेव्हा मिळेल तेव्हा..जमेल तसं जास्तीत जास्त लोक ही निसर्ग रम्य ठिकाणी जाऊन मोकळा श्वास सोडतात.

ज्या ठिकाणी मोकळी हवा मिळत नसेल तिकडे आपला जीव घुसमटतो. आणि अशा ठिकाणी जर जास्तवेळ आपल्याला राहायला लागलं तर लवकरच आपल्या शारीरिक (डोकं दुखणे, श्वास कोंडणे);आणि मानसिक ( अस्वस्थता, बैचेन वाटणे) तक्रारी निर्माण होतात.

नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या फळभाज्या, पालेभाज्या शरीरासाठी पौष्टिक असतात.

नैसर्गिक घटकांपासून तयार होणाऱ्या औषधांवर तर आता खूप सारे उपचार सुरू आहेत. आयुर्वेद म्हटलं तर डोळे मिटून त्यावर सहज विश्वास ठेवला जातो. कित्येक मोठमोठे आजार आयुर्वेदिक उपचरांनी बरे झाल्याचं आपण ऐकतोय.

पण..ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, ज्याच्या सानिध्यात राहिल्यावर आपलं मन प्रसन्न राहते, कितीही आरोग्याच्या तक्रारी त्याच्या सानिध्यात आल्यावर सहज कमी जाणवतात.. अशा या महत्त्वपूर्ण असणाऱ्या निसर्गाची आपण किती काळजी घेतो???

ऋतुचक्र, आजकल कधी पाऊस पडेल ना कधी थंडी याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. याच मूळ कारण काय असणार तर मानवी कृत्य..फर्निचर साठी वृक्ष तोड, इमारती बांधण्यासाठी जंगल तोड, जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण या सारख्या समस्यांमुळे निसर्गचक्र बिघडते.

निसर्ग चक्र बिघडलं की त्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वर होतो. पावसाळा ऋतू नसताना अचानक पाऊस पडला की ताप थंडी तसेच इतर साथीचे रोग उद्भवणे, उन्हाळ्यात अती उष्णतेमुळे होणारे आजार.

आपण जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलो तरी जर मानसिक आणि शरीरिक स्वास्थ्य उत्तम नसेल तर असलेला पैसा काहीच उपयोगात येत नाही..

पण जर आपण निसर्गाची योग्य ती काळजी घेतली, आपल्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी दक्षता घेतली, वृक्षारोपण करून निसर्गाचं संवर्धन केलं तर आपल्याला निसर्गाचा समतोल साधून आपलं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समन्वय साधायला सहज शक्य होईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!