निराशा ही आशेची खरी ओळख असते.
आकांक्षा किरणराव आळणे
निराशा-जवळपास सर्वांनी तोंड दिलेले असते ह्या bad phase ला आयुष्यात एकदा तरी.निराश का होतो आपण ???जेवढे प्रगल्भ तेवढेच मानसिक रित्या तकलादू असतो का आपण???भरमसाठ प्रश्न पडणारा हा विषय आहे.
मुळात खूप भावनांच्या खेळात गुंतलेले असतो आपण. आनंदी,दुःखी,नाराज,खजील,helpless असे प्रत्येक प्रसंगानुसार वेग वेगळ्या भावना मनात येतात आणि त्यावर आपण react होतो.गोष्ट कोणतीही असो त्यावर react कसे करायचे हे आपल्या हातात असते.
Constantly जेव्हा फक्त आणि फक्त negative गोष्टीनाच जेव्हा सामोरे जावे लागते तेव्हा मात्र माणूस किती ही जिद्दी,हिम्मत वाला असला तरी ह्या phase मध्ये मानसिक खच्चीकरण होऊन तो निराश होतोच आणि डिप्रेशन ला बळी जातोच…!!!
आयुष्य म्हणजे काय ढोबळमानाने- “Series Of Different Events Happening One After Another”(सातत्याने एका मागून एक घडणारे प्रसंग म्हणजेच आयुष्य होय).प्रासंगिक गोष्टी काही ही घडू शकतात.म्हणजे कधी आनंद देणारी गोष्ट घडू शकते,कधी दुःख दायक एखादी घटना घडू शकते.
कधी-कधी अगदी अनपेक्षित काही ही घडू शकतं आयुष्यात.माणूस चुकतो कुठे-तर तो चुकतो गोष्टींना,प्रसंगांना,माणसांना एक चौकटीत बांधतो,assume करतो,prejudice करतो अनेक प्रसंग इथे चुकतो.आपण आपले future कसे well-planned करून ठेवतो ना.एक आराखडा तयार असतो.
मला उद्या अमूक कार घ्यायची आहे,पुणे-मुंबई सारख्या मेट्रो सिटी मधेच मला settle व्हायचे आहे,खूप मेहनत करून खूप सारे पैसे कमवायचे आहेत आणखी काय काय मोठे मोठे स्वप्नांचे डोलारे आपण मनात बांधून ठेवलेले असतात आणि त्या नुसार आपण आपली प्रगती साधत असतो.पण ह्या सर्व गोष्टींचा पाठलाग करताना आपण हे विसरतो की life ही खूप unpredictable आहे.आपण ठरवल्या प्रमाणे ती ‘घडत’ नसते तर तीच आपल्याला ‘घडवत’ असते.
आपले पूर्वग्रह आपल्याला निराशा आणतात.उदाहरणार्थ आपण जे योजिले आहे त्या विपरीत काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टींना जसे आहे तसे स्वीकारणे हे खूप कठीण जाते कारण already आपण त्या एका गोष्टीला फ्रेम करून ठेवलेले असते मनात,पूर्वग्रह असतो त्या particular गोष्टीबद्दल आणि ती गोष्ट जसे आपण विचार करून ठेवला तशी न घडता वेगळीच काही कलाटणी घेते तर ते आपल्याला अनेकदा हँडल देखील नाही करता येत.काय-कसे react करावे हे ही कळत नाही .
परिणामी निराशा येते.तो अनुभव काहीही असो failure,heart break,शारीरिक दुखापत,मानसिक छळ,मनाविरुद्ध करावी लागणारी नौकरी,किव्वा मनाविरुद्ध निभवाव लागणार एखादं नातं..!!माणूस एवढा खचून जातो की पूर्णपणे होपलेस होऊन जातो.
काय करावे काय नाही सुचत च नाही अश्या वेळेस.मग काय आपण कोसत बसतो आपल्या नशिबाला,माझ्या नाशिबिच असे होते म्हणून माझ्या सोबत एवढे वाईट घडले वगैरे वगैरे.
पण मित्रांनो सर्व आपण आपण ठरवल्या प्रमाणे च होईल असे नाही ना.आयुष्य हे स्वलिखित नसतं.फार तर फार काय ज्या 2-3 गोष्टी आपल्या हाती असतात त्यासाठीची जबाबदारी आपली असते.career choose करणं,जोडीदार choose करणं,हे आपल्या हाती आहे पण जर घरच्यांची परवानगी असेल तर च.
अनेक कुटुंबात तर एवढी पण परवानगी नसते विशेषतः मुलींच्या बाबतीत.असो..!!तर विषय हा होता की career,लग्न ह्या गोष्टी एक वेळ आपण ठरवू शकतो त्यानुसार त्यावर work करू शकतो पण आयुष्याच्या बाकी पैलूंचे काय???
दैनंदिन जीवनात अनेक उदाहरण आपण बघतो- कधी ध्यानी-मनी विचार न येता एखाद्याचा अचानक accident होतो,एखादा खूप गंभिर आजाराला झुंज देतो.स्वप्न तर प्रत्येक जणच बघतो ना??कुठेतरी असे दुर्देवाने अनेकांचे स्वप्न अपुरे राहतात जे जे आयुष्यात मिळवायचे ते थोडे आढे-वेढे घेत achieve करण्याची वेळ अनेकांवर येते.पण मग मार्ग काय आहे ह्यावर-खचून जाणे की भक्कमपणे पुन्हा स्वतःला उभे करणे???
तर पुन्हा स्वतःला उभे करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.खूप निराशा येते,खूप हतबल होतो माणूस पण शेवटी काही गोष्टी हातात नसतात आणि हे ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्यासोबत जे काही घडते त्यावर आपण react कसे करतो ह्यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते.म्हणजे घडला वाईट प्रसंग एखादा त्यावर आपण काय करू शकतो तर तटस्थपणे बघायला हवे त्या प्रसंगाकडे आपली काही चूक आहे का,कुठे काय गैरसमज आपण करून घेत आहे का ह्या सर्व गोष्ट तेव्हाच्या तेव्हा पडताळल्या गेल्या पाहिजे.निदान तो प्रसंग घडून गेल्यानन्तर त्यातून मिळालेला lesson आपण कधीच विसरला नाही पाहिजे.
निराश हीच आशे ची खरी ओळख असते.कुठे तरी आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवतो,त्या साठी काम करतो पण पाहिजे तसा result मिळत नाही म्हणून आपण निराश होतो.पण अश्या वेळी आपण हा विचार केला पाहिजे की react न होता respond करावं.व्यवस्थित विचार करावा आणि सर्वात महत्वाचे खूप आयुष्यात जगताना positive attitude ठेवावा.
प्रसंग येत राहतील,चांगले-वाईट लोकं चांगले-वाईट अनुभव देऊन जातील.कधी यश येईल कधी अपयश येईल.सर्व मनासारखे घडेल हा विचार तर fix ठेवायलाच नाही पाहिजे कारण इकडे पूर्वग्रहापेक्षा विपरीत घडले की तिकडे आपले मानसिक खच्चीकरण होण्यास सुरुवात होते.
जरी निराश आहेत,जरी खचलेले आहेत तरी ही स्वतःच स्वतःला पूर्ण ताकदीने भक्कमपणे उभे करा.काही गोष्टी स्वतःच स्वतःसाठी कराव्या लागतात स्वतःला एवढे strong बनवा की सर्व काही स्वतः face करू शकाल नेहमीच मदतीला कोणी असेल असे नाही आणि अपेक्षा तरी का ठेवायची कोणाकडून कारण शेवटी जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग होण्याचे chances आहेतच आणि अपेक्षा भंग झाला की परत ‘निराशा’च येते.
शेवटी समारोप घेता घेता हाच संदेश आहे की-
” रख जिगर,रख कलेजा
हर एक मुश्किल से कर तू मात,
हार ना माने कभी किसीं बुरे वक्त से
यही तेरी बिरादरी,
यही तेरी जात..!!”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


