Skip to content

निकृष्ट मानसिक आरोग्याचा तुमच्या social life वर परिणाम होतोय का?

निकृष्ट मानसिक आरोग्याचा तुमच्या social life वर परिणाम होतोय का?


हर्षदा पिंपळे


‘Mental Health’ अर्थात ‘मानसिक आरोग्य.’आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे मानसिक आरोग्य होय.आपल्या आयुष्याची जी काही रेलचेल असते ती या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते.खरं सांगायच तर या मानसिक आरोग्यावर नाही म्हंटल तरी सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. मानसिक आरोग्याशिवाय बाकी गोष्टी पूर्ण होणं अशक्य आहे.

आणि म्हणूनच मानसिक आरोग्याला इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे.आता मानसिक आरोग्य म्हणजे काय हे बऱ्यापैकी सर्वांनाच ज्ञात असावं.साधं सरळ सांगायच झालं तर आपल्या शरिराच जसं आरोग्य असतं तसच आरोग्य आपल्या मनाचंदेखील असतं.आपलं शरीर उत्तम असेल तर आपण त्याला उत्कृष्ट दर्जा म्हणून मोकळेही होतो.आणि तेच शरीर जेव्हा आजारी पडतं तेव्हा मात्र आपण त्याला निकृष्ट दर्जा सहजपणे देतो.याचाच अर्थ शरीर आजारी पडतं.

पण मग मनाचं काय…? आपलं मन कधीच आजारी पडत नाही का..? आपलं मानसिक आरोग्य नेहमीच उत्कृष्ट दर्जाचं असतं का.?

तर मित्रांनो, हे प्रश्न अगदी विचार करण्यासारखे आहेत.आपलं शारीरिक आरोग्य असतं तसच मानसिक आरोग्य असतं.पण ते कितपत निरोगी असतं याची आपल्याला बहुधा कल्पनाच नसते.आपण अनेकदा निकृष्ट असं मानसिक आरोग्य अनुभवत असतो.परंतु तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल की निकृष्ट मानसिक आरोग्य हे आपल्या आयुष्यासाठी किती घातक आहे. या निकृष्ट मानसिक आरोग्याचे आपल्या आयुष्यावर ,आपल्या सामाजिक आयुष्यावर काही विपरीत परिणाम होत असतात.आपण मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ यापलिकडे जाऊन जे काही असतं ते आपलं सोशल लाईफ. सोशल लाईफ म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग.

कारण आपण एक माणूस आहोत. आपण या समाजात राहतो.वावरतो.आणि ग्रीक फिलॉसॉफर ‘Arristotsle’ ने तसं विधानही केलेलं आहे.की “माणूस हा एक समाजशील प्राणी आहे.” तर सामाजिक जीवन आणि आपलं मानसिक आरोग्य या दोघांचाही जवळचा संबंध आहे. आणि निश्चितच निकृष्ट मानसिक आरोग्याचा परिणाम या सोशल लाईफवर होतो.

कसा ते पाहूयात—

सार्वजनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हंटल जातं.म्हणून निकृष्ट मानसिक आरोग्य हे सार्वजनिक, सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास जबाबदार ठरू शकते. निकृष्ट मानसिक आरोग्यामुळे सामाजिक जीवनही निकृष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

आता सामाजिक जीवन म्हंटलं की त्यात अनेक गोष्टी येतात. जेव्हा आपण घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडतो तेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी आलेलो असतो.शाळा,कॉलेज, ऑफिस, वेगवेगळ्या संस्था,दुकानं म्हणजे आपलं सामाजिक जीवन.कारण तिथे गेल्यावर आपण वेगवेगळ्या माणसांमध्ये वावरतो.

समाजामध्ये वावरतो.त्यांच्याशी संवाद साधतो.अनेक गोष्टींची देवाणघेवाण करतो.अर्थात आपण सोशल बनतो.आणि अर्थातच अशावेळी अशा ठिकाणी वावरताना आपलं मानसिक आरोग्य निकृष्ट असेल तर त्याचा परिणाम या सगळ्यावर होतोच.निकृष्ट मानसिक आरोग्य कामावर ,शिक्षणावर गंभीर परिणाम करते.

कामावर लक्ष केंद्रीत न होणे,शिक्षणावर लक्ष केंद्रित न होणे,कामाच्या ठिकाणी अतिसंघर्ष करावा लागणे, कामात,शैक्षणिक गोष्टींमध्ये अपयश येणे,उदरनिर्वाहाच्या क्षमतेवर परिणाम होणे,नकारात्मक संबंध प्रस्थापित होणे,संवादात अडथळे निर्माण होणे,हेल्दी असलेल्या नातेसंबंधावर वाईट परिणाम होणे,सामाजिक जीवनातील ताणतणावास प्रोत्साहन मिळणे असे अनेक परिणाम हे केवळ मानसिक आरोग्य निकृष्ट असल्याने होऊ शकतात.

निकृष्ट मानसिक आरोग्यामुळे संपूर्ण सामाजिक जीवनाचा समतोल बिघडू शकतो.म्हणूनच मानसिक आरोग्य हे सुदृढ आणि उत्कृष्ट असणं आवश्यक आहे.WHO ने म्हंटल्याप्रमाणे कोणतेच आरोग्य हे मानसिक आरोग्याशिवाय निरोगी नसते.म्हणजेच शारीरिक, सामाजिक वा कोणतही आरोग्य व्यवस्थित हवं असेल तर आधी मानसिक आरोग्य सुस्थितीत असायला हवं.

आपलं मानसिक आरोग्यच असंतुलित, खराब असेल तर त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होणं साहजिक आहे.तर निकृष्ट मानसिक आरोग्यामुळे जर सामाजिक जीवनाला हानी पोहोचत असेल तर ते अयोग्य आहे. आणि यासाठी आपणच प्रयत्नशील रहाणं आवश्यक आहे. तर कोणत्याही परिस्थिती आपलं मानसिक आरोग्य निकृष्ट राहण्यापेक्षा ते उत्कृष्ट कसं राहिल यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

सामाजिक जीवन नीटनेटकं हवं असेल तर चांगल्या मानसिक आरोग्याची निश्चितच गरज आहे.कारण नकारात्मक भावना,राग,दुःख,नैराश्य यावर मात करण्यासाठी,भावभावनांच ,नकारात्मक-सकारात्मक विचारांच्या व्यवस्थापनासाठी चांगलं मानसिक आरोग्य महत्वाची भूमिका बजावत असते.त्यामुळेच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी काही गोष्टी नक्कीच करायला हव्या.

जसे की,नियमित व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे,स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे,मद्यपान टाळणे,धूम्रपान टाळणे,अतिचिंता थांबविणे,प्रसन्न वातावरणात फिरायला जाणे,पुरेसा सकस आहार, पुरेशी शांत झोप,छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे यांसारख्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.

जेणेकरून मेंटल हेल्थ निरोगी राहण्यास मदत होईल. आणि मेंटल हेल्थ निरोगी असल्यास सामजिक जीवनही आनंदी राहील.सामाजिक जीवनावर चांगल्या मेंटल हेल्थचा निश्चितच चांगला परिणाम होईल यात शंका नाही.

So,

मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्या.मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याकडे कल ठेवा.

मन चांगलं असेल तरच इतर गोष्टी सुरळीतपणे पार पडू शकतात. त्यामुळे मनाला स्वस्थ ठेवा.मानसिक विकास चांगला झाला तरच सामाजिक विकास चांगला होऊ शकतो,मानसिक आरोग्यावरच आपलं आयुष्य आहे, हे लक्षात घेऊन तरी आपल्या मानसिक आरोग्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी इतकीच विनंती.

बाकी, मस्त रहा,स्वस्थ रहा.

आयुष्य सुंदर आहे. मनमुरादपणे जगून घ्या.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “निकृष्ट मानसिक आरोग्याचा तुमच्या social life वर परिणाम होतोय का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!