Skip to content

ना खंत ना दुःख… असं एककल्ली आयुष्य जगता येऊ शकतं का ??

ना खंत ना दुःख… असं एककल्ली आयुष्य जगता येऊ शकतं का ??


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


सुखदुःखाशिवाय आयुष्य हे नाहीच….तरीपण आयुष्यात सुखं आली आणि दुःखं आलीच नाही तर आयुष्य हे आयुष्य वाटेल का…? कोणतीच खंत आणि कोणतच दुःख नाही….असं आयुष्य जगता येईल का…?नाही ओ, आयुष्य म्हणजे जन्ममरणाचा फेरा आहे…जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे हे आयुष्य आहे. कुणी आलं की आनंद होतो तस कुणी गेलं की दुःख हे होतच.नाही म्हंटल तरी अगदी दुश्मन गेल्यावरही आपल्याला सलत राहतच.डोळ्यातून नाही पण मनातून मात्र आपण रडतोच ना…?

इथे असलेल्या प्रत्येकाला भावभावना आहेत. त्यामुळे प्रत्येकजण प्रसंगानुरूप अगदी सहजपणे भावभावनांना वाटा मोकळ्या करून देत असतो.इथे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीच दुःख असतं , कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी खंत वाटत असते.वाईट वाटत असतं.आणि हा माणसाचा स्वभावच आहे.

पहा , एखाद बाळ जन्माला आलं तर खूप आनंद होतो. पण तेच बाळ जन्माला आलं नी पाच मिनीटातच मृत पावलं तर मानसाला खूप दुःख होतं आणि इतकच नाही तर त्या बाळाला थोडं आयुष्य हवं होतं ते त्याच्या नशिबी नाही ‘ अशी खंत देखील वाटते.असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात दिवसागणिक रोज घडतात की ज्यांच्यामुळे माणसाला अतोनात दुःख सहन करावं लागतं.असं झालं नाही , तसच झालं अशी खंत वाटते.

आणि कुणाला कशाचं दुःख वाटेन नी कुणाला कशाची खंत वाटेल काही सांगता येत नाही. कारण माणसाच मन हे काहीही केलं तरी ओळखता येत नाही. इतकीच (माझी) खंत आहे…..हो…इतकीच माझी खंत आहे कारण इतरांच्या आयुष्यात काय चाललय याच्याशी खरतर काहीही देणंघेणं नाही पण इतरांच्या मनात कोणते विचार घोळतायेत , कोणती दुःख सलतायेत हे मला जाणून घ्यावसं वाटतं पण हे जाणून घेता येत नाही याचीच वेडी खंत वाटते.

कितीतरी ठिकाणी “खंत” या शब्दाचा वापर केला जातो.

*
“आयुष्यात सगळं काही आहे पण आम्ही आमच्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडलो इतकीच खंत आहे”

*
या जगातील वाढत्या स्पर्धेमुळे लोकं स्वतःशी स्पर्धा करणं विसरत चालली आहे याची एक खंत वाटते.

*
तिने इतके प्रयत्न केले , संघर्ष केला पण पदरी मात्र अपयश आलं याची जरा खंत वाटते.

*
बांबू संस्कृती कडे कळत नकळतपणे दुर्लक्ष होत चाललय याची खंत वाटते.

*
तुमच्याकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती , तुमच्यासारखी सुसंस्कृत माणसंही मर्यादा सोडून वागतात आता याचीच खूप खंत वाटते.
पहा किती किती ठिकाणी हा शब्द वापरला गेला आहे.

आणि दुःखाच म्हणाल तर—–

*
कर्जबाजारीपणामुळे एखादा जीवन संपवतो तेव्हा त्याच्या घरच्यांच दुःख…

*
ज्यांना जीव लावला , त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला.अशी अवस्था जेव्हा होते न तेव्हा होणारं दुःख हे समजण्यापलिकडच आहे.

वगैरे वगैरे अनेक गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात दुःख हे येत असतं.ते कधीच चुकणार नसतं. आणि हा माणूस आहे. चिंता करणं , काळजी करणं , वाईट वाटणं हे माणसाचे स्वभावच आहेत.त्यामुळे मला नाही वाटत की माणूस असा खंत आणि दुःखाला बाजूला सारून जगु शकेल…? आयुष्यात कोणत्याही गोष्टीची खंत करायची नाही , कोणत्याही गोष्टीच दुःख करून घ्यायच नाही हे आपल्याला जमेल का…? खरतर या गोष्टी जमण्यासारख्या मुळीच नाहीत आपण त्या अनेकदा जमवून घेण्याचा प्रयत्न करतो .एक प्रकारे तडजोड करतो.

आपण इतकही म्हणून जातो की कशाला उगाच दुःख कवटाळून बसायचं…? कशाला कोणत्या गोष्टीची खंत करून घ्यायची ….?आहे ते आयुष्य मनसोक्त जगायच तर आपण दुःखाच्या समुद्रात पोहत बसतो….होडी पुढे गेलीच नाही अशी खंत करत बसतो.पण मग ह्या सगळ्यांना सोडून आपण असं एककल्ली आयुष्य जगू शकत नाही.

कारण मनुष्य हा काही भावनाशून्य प्राणी नाही. त्यामुळे खंत , वाईट वाटणं , दुःख होणं या गोष्टी अगदी स्वाभाविक आहेत. हां पण एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला तशी माणसाच्या या खंत करण्याला , सतत दुःख दुःख करण्याला काहीतरी एक लिमीट ही हवीच.कारण नाहीतर मनुष्य हा त्यातच गुरफटून जातो.एखादा याला अपवाद असु शकतो की जो खरच

“ना खंत नी ना दुःख” असं एककल्ली आयुष्य जगू शकतो.कारण शेवटी हे आपल्यावर “Depend” करतं “किती आणि काय”…..पण 99.99% सांगायच झालं तर मनुष्य असं एककल्ली आयुष्य जगू शकत नाही. एखादाच याला अपवाद असू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!