Skip to content

नाते हे एकमेकांच्या समजदार स्वभावाने घट्ट होत असतात.

नाते हे एकमेकांच्या समजदार स्वभावाने घट्ट होत असते.


मिनल वरपे


कोणतही नात हे कायम एकमेकांच्या समजदार स्वभावाने, प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट होत असते पण मग या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची गरज नसावी.

पण हे सगळं जरी खर असेल तरी आपण बहुतेक वेळी अगदी क्षुल्लक चुका करून नाती आणि जवळची माणसं गमवतो.कारण आपल्याला रोजच्या या दिनक्रमात एक साधी आणि सरळ गोष्ट लवकर उमगत नाही ती म्हणजे जेव्हा नात्यात तणाव निर्माण होतात त्यावेळी ते नात जर दोघांचं असेल तर त्यामधील तणाव दूर करण्यासाठी तिसऱ्या व्यक्तील कधीच involve करू नये.

नवरा बायको हे नात जितकं बळकट तेवढीच सर्व नाती उत्तमाची राहतात. जस नवरा बायको या नात्यात तिसऱ्या व्यक्तीने निर्णय दिला किंवा काही उपदेश दिले की ते दोघांपैकी एकाला सहन होत नाहीत तसेच आई मुलांचं, सासू सुनेच, बहिण भावाच असो नाहीतर कोणतंही नात असो प्रत्येक नात्याला गरज असते ती एकमेकांची.

आपण सहजच आपल्या नात्यातील वाद किंवा लहान सहान गोष्टी बाहेर कोणाला किंवा तिसऱ्या सांगतो पण त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होत असतो. आणि तसेही आपल्यासाठी सतत कोणीतरी कायम available असेल हे तर शक्य नाही.

बघ त्याची बायको कस सर्व सांभाळून जॉब करते.. किंवा बघा तिचा नवरा तिला किती खुश ठेवतो हे असे तिसऱ्या व्यक्तीला आपल्या संवादात जरी आपण involve केलं तरी मनात कुठेतरी वाईट वाटते.आणि हे जर नेहमी होत राहील तर आपल्या नात्यातील ओढ कमी होत जाते.

कोणी तिसरी व्यक्ती येऊन आपल्याला समजावेल इतकं कमकुवत नात आपलं नसावं. नात बनवलं किंवा नात आहे तर ते कस टीकवाव याबद्दल आपल्याला जाणीव असणे गरजेचे असते. जर तिसऱ्या व्यक्तीला आपल्या नात्यात सल्ला द्यायला सांगितलं किंवा त्यांचे उपदेश घेतले तर समोरच्या व्यक्तीची भावनिकता दुखावली जाते.

आपण जेव्हा आपल्या नात्यात तिसरं कोणाला involve करतो तेव्हा आपल्या नात्यातील विश्वास कमजोर होत जातो. बऱ्याचदा संशयाची भूमिका सुद्धा घेतली जाते तर कधी तिसऱ्या व्यक्तीला सहभागी केले म्हणून दोघांमधील नात कायमच तुटू शकते.

लहानपणापासून आई वडिलांनी केलेले संस्कार,त्यांनी दिलेली शिकवण, आतापर्यंत घेतलेले अनुभव तसेच शिक्षण यातून आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आलेली असते तसेच विचार करून योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून योग्य मार्ग निवडण्याची क्षमता आलेली असते.

जर आपल्याकडे समजून घेण्याची इच्छा असेल स्वतःला आणि समोरच्याला तसेच नात्यावर विश्वास असेल आणि नात हे मनापासून निभावयाच असेल तर नक्कीच ते दोघांच्या समजुतीने आणि संवादाने टिकवायचं.

गरज पडली तर समुपदेशन घेणे ही वेगळी गोष्ट आहे ती दोघांच्या संमतीने होत असते पण समोरच्या व्यक्तीला चार शब्द चांगले सांगावेत, नात्याची किंमत कळावी तसेच आपल्याला सांभाळता येत नाही म्हणून तिसऱ्या व्यक्तीला नात्यात involve करणे कायम चुकीचे असणार.

कारण नात बनवताना जस दोघं जबाबदार असतात तसेच त्या नात्यातील दुरावा तसेच तणाव कमी करण्यासाठी सुद्धा दोघांनीच प्रयत्न करायला हवेत. जर ते दोघांनीच केले, समजुतीने, संवादाने ,विश्वासाने आणि एकमेकांचा विचार करून तर तिसऱ्या व्यक्तीची गरज पडणार नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!