Skip to content

नातं असल्याने नातं बनत नाही, नातं जपल्याने नातं बनतं.

नातं असल्याने नातं बनत नाही, नातं जपल्याने नातं बनतं.


मयुरी महेंद्र महाजन


रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, व त्या रेशमी बंधालाचं मैत्रि असे म्हणतात, नात्यांची संकल्पना जर बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की नाते मग ते रक्ताचे असो किंवा मानलेले ते नाते दोघांकडून असेल, तरचं त्याचा जिवंतपणा व त्यातील प्रेमाचा मायेचा ओलावा कायम असतो , एकतर्फी असलेले नाते माणसाच्या मनाला आतून पोखरु लागते, व कधी तरी त्याचा शेवट होतोचं,

खरं तर ज्यांना ज्यांना नाती लाभलेली आहे, आपल्याला लाभलेली नाती आपल्यासाठी सुखाची पर्वणीच म्हणावी,कारण जगात अशी कितीतरी लोक आहेत, ज्यांना आपली हक्काची माणस नाहीत, त्यांची नात्यांप्रती असलेली व्याख्या विचारा आपल्याकडे असणाऱ्या सुखाचा आपल्यालाचं अनुभव होईल ,पण खरं सांगायचं तर जितकी जास्त नाती तितकेचं रुसवे-फुगवे, भांडणे, या गोष्टी त्यासोबत भेट म्हणून आलेल्या असतात, परंतु हे ही तितकच खर आहे , ज्यावेळेस कुटुंबावर एखादे संकट कोसळते, तेव्हा सावरायलाही हीच नाती असतात,

आता नातं असल्याने नातं बनत नाही, तर नात जपल्याने नातं बनतं, काहींकडे नात्यांची खूप मोठी यादी आहे,काहींकडे मात्र लिमिटेड नाती आहेत ,आता प्रश्न असा येतो, नाती किती आहे, यापेक्षा ती नाती कशी आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे ,जर तुमचा एकच मित्र/ मैत्रीण 100 नात्यांवरती भारी असेल, तर मग प्रश्नच उरत नाही,

बरेचदा निरिक्षणात येते, लोक नाती जोडताना तर खूप लवकर जोडतात, किंवा घाई करतात, परंतु जेव्हा निभावण्याची वेळ येते, तेव्हा मात्र पाठ फिरवत असतात ,आपण उदाहरण बघू एखाद्या रोपट्याला लावल्यावर त्याला खतपाणी घालावे लागते, याची काळजी घ्यावी लागते ,नंतर ते आपल्याला सुंदर फुले, फळे देऊन ते बहरतेच, नात्यांचेही काही अर्थी असंच आहे, वेळोवेळी काळजी घ्यावी लागते, त्यांना जपावं लागतं, नाहीतर ती जिवंत नाती सुद्धा कोमेजून जातात, अगदी त्या झाडांसारखी दिसायला तर असतात, मात्र त्यांच्यातला जिवंतपणा मेलेला असतो,

प्रश्न नात्यांचा आहे म्हणून सांगावसं वाटतं ,आपण कितीतरी जण आपल्याकडे असणाऱ्या नात्यांची कदरच करत नाही, एक तर आपल्याला ते कुठल्याही अटिविना मिळालेली असतात, म्हणून, नाही तर आपल्याला त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून ,परंतु आपण प्रत्येकानेच आपल्याला आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक नात्याला मनापासून जपायला हवं, कारण फायदा तोट्याचा विचार करून चालणार नाती, आपल्याला एक दिवस जेव्हा ती नाती आपल्यातून निघून जातात, तेव्हा त्याचं महत्त्व लक्षात येतं,

नात्यांचा विषय आहे, तर या ठिकाणी मला श्री कृष्ण आणि राधा यांचा दाखवा द्यावासा वाटतो ,त्यांनी आयुष्यभर एकमेकांशी प्रेमाचे नाते जोपासले, काही नात्यांना नाव नसतं, मात्र ते नातं कायम असतं ‘तर या ओळी त्यांच्या नात्याला अजून खुलवतात ,आपल्या तरुणांना नात्यांच्या या अनोख्या जगाला आज काल खूप विदारक स्थितीला नेऊन ठेवलेले आहे, कारण जितक्या लवकर नाती जुळतात,, तितक्याच लवकर त्यांची रजा पण होताना दिसते, आणि परकियांसारखी ब्रेकप प्रणाली, आपली तरुणाई सुद्धा आजमावतांना दिसतेय,

पण वाचणार्‍या प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, कोणाला शेवटपर्यँत साथ देता येत असेल, तरच कोणाचा हात हातात घ्या, उगाच कोणाच्या भावनांशी खेळून तुम्ही नात्यातून सावरून जाणारं, परंतु समोरची व्यक्ती मात्र कायमसाठी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही ,अशा स्थितीला पोहोचते ,आणि मनापासून नाती जपता येत असतीलं, तरच नाती जोडा, नाहीतर नाती फक्त नावाला असतात, ती जपता आली नाही तर त्या नात्यांमध्ये श्वास गुदमरलायला लागतो, आणि कधी त्याचा the end होतो, कळतही नाही,

नुसतीच नावाला नाती नसावी, ज्यांना नात्यांचा खरा अर्थ कळतो, ते वेळोवेळी नात्याला जपतात, काळजी घेतात ,जसे शेतात पाखरांसाठी लावण्यात आलेले बुजगावणे असते, नावाच्या नात्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही, दिसायला तर माणसाचे स्वरूप असते, परंतु कुठल्याच भावना माणसासारख्या नाहीत, अगदी आतून पूर्ण पोकळं, जी नाती फक्त नावापुरतीच नाती असतात, त्यांचं ते स्वरूप फक्त बाहेरून दिसत असतं ,

आपल्या नात्यांना वेळ द्या, काळजी घ्या, त्यांना जपा, जगण्याच्या धावपळीत कधी कुठले हात सुटुन जातील, सांगता येत नाही, माणूस नसल्यावर त्याचा आभास ही मोठा वाटतो ,यापेक्षा माणसं जिवंत आहे, तोपर्यंत त्याची किंमत जाणा ,व त्यांना जपा, जे आपलं असतं त्याला आपणच जपायचं असतं, मग ते माणूस असो वा नाती…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “नातं असल्याने नातं बनत नाही, नातं जपल्याने नातं बनतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!