Skip to content

नजीकच्या काळात आपल्या हातून घडलेली एखादी चूक कशी सुधारावी ??

नजीकच्या काळात आपल्या हातून घडलेली एखादी चूक कशी सुधारावी ??


आकांक्षा किरणराव आळणे,

(MBBS) लातूर


माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुक कोणाकडून होत नाही??? छोटी असो वा मोठी चूक ही होतेच. छोट्या चुका तितक्याश्या आयुष्यावर परिणाम करत नाहीत पण ‘टोकाची चुक’ चक्क आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. चूका घडल्यानंतर आपल्या हातात परिणाम भोगणे या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

त्यामुळे फार विचार करत बसणे स्वतःला कोसने,दोष देत बसणे यात वेळ न घालवता घडलेली चूक दुरुस्त करता येण्यासारखी असेल तर चूक दुरुस्त करण्याकडे आपण आपली एनर्जी प्रोजेक्ट करावी आणि हाच फोकस असावा.

सर्वात पहिले जी चुका आपण केली आहे ती मान्य करा. कुढत बसू नका. चुकीचे शहानिशा करा. कुठे चूक घडली नेमकी.?? कुठे-कुठे,काय-काय कन्सिडर करायला पाहिजे होते वेळोवेळी..??

कारण मित्रांनो नकळत चूक घडते या गोष्टीला माझा पाठिंबा नाही. मला वाटते की चुक घडण्याअगोदर कुठेतरी आपल्याला intutions जाणवतात आपण जे करत आहोत ते चूक आहे की बरोबर हे आपले अंतर्मन आपल्याला सांगत असते आणि काही रेड flags आपल्याला दिसत असतात जे आपण सोयीस्कर रित्या इग्नोर करत असतो.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो आणि नंतर ती व्यक्ती आपल्याला त्याचे वेगवेगळे रंग दाखवते ही गोष्ट सामान्यपणे मैत्री असो वा प्रेम किंवा कुठलेही विश्वासाचे नाते असो असा अनुभव कोणालाही येऊ शकतो. अशावेळी विश्वास संपादन करणे हा जो फेज असतो त्या दरम्यान समोरची व्यक्ती ही एकदम परफेक्ट वागत असते

पण तरीही कुठेतरी आपल्या मनात एक धाकधूक असते की या व्यक्तीवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवावा की नाही हे इथे आपले instinct आपल्याला काहीतरी सुचवू पाहत असते,रेड फ्लॅग दाखवत असते पण लॉजिकली समोरच्या व्यक्तीचे सो-कॉल्ड परफेक्ट behaviour पाहून आपण आपल्या instincts ला अलगदपणे इग्नोर करतो आणि समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो इथेच आपण चुकतो. सर्व प्राण्यांमध्ये gut instinct or intutions नावाची एक सुपर पावर असते.

वन्य प्राणी त्यांच्या संरक्षणासाठी याचा वापर करतात. मानवाकडे पण ही पावर असते. आपल्यालाही या पावर चा वापर करता आला पाहिजे. आपल्याला चांगल्या वाईट सर्व गोष्टींचा अंदाज येतो वेळी तो या पावर मुळेच..!! वरवर पाहता एखादी परिस्थिती,एखादी व्यक्ती किती परफेक्ट( इथे परफेक्ट चा अर्थ म्हणजे आपल्यासाठी हार्मलेस कोणत्याच बाबतीत कुठलीही इजा न करणारे) वाटत असले तरी बघा मनात शंकेची पाल पुच-पुचते की विश्वास ठेवावा की नाही ही गोष्ट करावी की नाही अनेक जण या गोष्टीला रिलेट करू शकत असतील हो ना…??

तर हे खरे असते मित्रांनो आपण आपल्या अंतर्मन काय म्हणते हे नेहमी ऐकायला पाहिजे कारण बघा अनेकदा असे होते की तुम्ही तुमच्या मनाच्या ऐकले नाही आणि विरोध करून एखादी गोष्ट केली आणि शेवटी तेच झाले जे तुम्हाला तुमचे मन सांगत होते. मनाचं कौल हा घ्यायला हवा कोणतेही काम करताना मैत्री स्वीकारताना कमिटमेंट करताना.

कारण ब्रह्मांड खूप विशाल आहे आणि मानवाला देवाने तो sense दिला आहे. आपण गुड व्हायब्रेशन्स आणि बेड व्हायब्रेशन दोन्ही sense करू शकतो फक्त गोष्ट इथे येऊन थांबते की आपण त्या व्हायब्रेशन्स ला किती विचारात घेतो बॅड व्हायब्रेशन्स मिळाल्यास त्या गोष्टीपासून,व्यक्तीपासून दूर राहिलेल कधीही चांगले आणि जे रेड flags मिळतात त्यांना कधीही इग्नोर करू नये.

चूका होणारच नाही याची काही गॅरंटी नसते मित्रांनो शेवटी आपण मानव जात सर्वच अंदाज खरे ठरतील असे नाही. पण मनाचा कौल घेऊन चांगले-वाईट ओळखून,भविष्यात चांगले वाईट परिणामांचा अंदाज लक्षात घेऊन कधीही दक्ष राहिलेले चांगलेच ना…?? त्यामुळे-

सतर्क रहे,सुरक्षित रहे,
सही गलत को सोचे-समझे,
फैसले सोच समझ कर ले,
जिंदगी आसान रहेगी..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!