Skip to content

नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय.

नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय.


टीम आपलं मानसशास्त्र


फोटो , म्हणले तर अगदी अनेक वर्षांपासून फोटो हे काढले जातात.सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाइट असतं. आता colour. पूर्वी पासून आपल्या काही खास आठवणी म्हणून , सण , समारंभ , लहान बाळाच्या , वृद्धांच्या आठवणी असतील किंवा एखाद्या स्थळाला भेट दिली असेल तर तिथल्या memories आपण फोटो स्वरूपात साठवून ठेवत आलो .

आता जग , technology खूप पुढे गेली. प्रत्येकाच्या मोबाईल कॅमेरा मध्ये फोटो , व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात. आधुनिक कॅमेरे ही आहेत ज्यात व्हिडिओ शूट केले जाते.

सगळ्यात महत्वाचे सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे लोकांना. आपल्या अनेक personal गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या सारखे. उठ की सूट
कुठे गेलो की ते फोटो, व्हिडिओ काढले , शेअर , पोस्ट केले जातात . म्हणजे खरे तर बरेचवेळा हे आपल्या चांगल्या आठवणी आठवून , साठवून ठेवणे बाजूला राहते . याउलट ते प्रदर्शन मांडले जाते.

नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय.
आता मध्यंतरी हेमांगी कवी या मराठी अभिनेत्री ने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केला होता. आणि तो खूपच गाजला. चर्चेत आला.

घरात पोळ्या करतानाचा व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. त्यात तिने घातलेला घरातला पेहराव आणि त्यात घरात असताना अंतर्वस्त्र न घालता तिने तो शूट करून सोशल मीडिया मध्ये पोस्ट केला म्हणून त्यावर स्त्री वर्ग च तिच्याविरुद्ध comments करत होत्या. तर काही पुरुष वर्ग ही.

कदाचित तिच्या मनात तसे काही नसेल ही तो व्हिडिओ पोस्ट करताना. किंवा जरी आले असेल तरी घरात तिने कसे राहावे हा तिचा निर्णय असेल.

पण जेव्हा तो व्हिडिओ सोशल मीडिया वर आला तेव्हा मात्र ते लोकांच्या डोळ्यावर आले. आणि तिला मात्र हे नक्कीच प्रत्यंतर आले की , नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय.

हेमांगी कवी ने ही सडेतोड उत्तरे दिली. पण नंतर करणे देणे , माझे स्वातंत्र्य याचा विचार नंतर करू नये. जर तुम्ही तुमच्या पोस्ट करिता , तुमच्या पेहराव याकरिता स्वातंत्र्य म्हणत असाल, तर जेव्हा तुम्ही असे व्हिडिओज पोस्ट करता तेव्हा लोकांना ही ते स्वातंत्र्य आहेच की. !! त्यांनी काय टीका टीपणी करायची हे त्यांच्या हातात आहे. त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

लोकांना ही थोडे दिवस मीडिया वर चर्चेचा विषय झाली. हळूहळू तो विषय मागे पडला ही परंतु आजही जर हेमांगी कवी चे नाव पुढे आले तर तिच्या त्या व्हिडिओ ची आठवण येते लोकांना. पण आजपर्यंत तिने ज्या चांगल्या भूमिका केल्या त्याची फार कमी लोकांना आठवण येते.

बरेच जण , मित्र मैत्रिणी , प्रियकर प्रेयसी , नवरा बायको ही आपले व्हिडिओ , फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करत असतात.
खरे तर यातून काय सांगायचे असते ? काय मानसिकता असते ?

प्रेमी युगुल बहुदा त्यांना जगापुढे दाखवायचे असते की आपले एकमेकांवर केवढे प्रेम आहे , आपण किती एकमेकांच्या प्रेमात बुडालो आहोत हे दाखवीत असावेत.

बऱ्याच नवरा बायकांचे प्रत्यक्षात पटत नाही पण social media वर अगदी एकमेकांचे फोटो , व्हिडिओज , एकत्र सेलिब्रेशन चे व्हिडिओज , कोणाचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस , काही भारी आणि किमती वस्तू भेट दिली तर ती त्याचे फोटो videos पोस्ट केले जातात.

हे पोस्ट केलेले व्हिडिओज बघून जे लोक त्यांना जवळून ओळखतात ते चर्चा करू लागतात . घरी तर एक क्षण ही पटत नाही यांचे मग हे असे कशाला दिखावा करतात. असे प्रश्न जरी पडले तरी ते personal वर बोलतात. किंवा एकमेकात चर्चा करतात. पण सोशल मीडिया वर लोकांची ही तशीच दिखावा comment असते. वाह किती छान , मस्तच , made for each other ..lovely pics , nice capture अशा comments करतात. पण या सगळ्या तोंड देखल्या असतात.

अगदी काही वेळेस खरेच चांगले नाते अस्तेही आणि म्हणून ते व्हिडिओज , फोटो तसे शेअर केले जातात.

आपण कोणते व्हिडिओज , फोटो पोस्ट करायचे , शेअर करायचे याचा नक्कीच विचार केला पाहिजे. आणि आपण कोणासाठी करतो आहोत ? याचा विचार नक्की करावा. काही नाती अशी असतात की ती त्यांच्या पुरती मर्यादित असतात. आणि रहावीत. त्याचे प्रदर्शन मांडू नये.

नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय. तसे करू नका. तुमची आणि तुमच्या सोबतच्या जोडीदार असेल , मित्र मैत्रिणी नातेवाईक , प्रियकर किंवा त्याहून पलीकडे कोणते नाते असेल तर ते तुमच्या पुरते मर्यादित ठेवा. जगापुढे आपले आणि आपल्या लोकांचे हसे करून घेवू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “नको ते व्हिडिओ पोस्ट करून आपण फक्त लोकांच्या चर्चेचा विषय होतोय.”

  1. All posts are very nice and good thinking. When I have confused I really reading your blog and receive my answer.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!