Skip to content

दुसरी संधी ही प्रत्येकाला मिळते, कारण पहिला प्रयत्न सर्वांनीच गमावलेला असतो.

दुसरी संधी ही प्रत्येकाला मिळते, कारण पहिला प्रयत्न सर्वांनी गमावलेला असतो.


वृषाली बनसोडे


आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो. तेव्हा नव्याने सुरूवात करणे अपेक्षित आहे. कारण ही सुरूवातच मुळात यशाकडे घेऊन जाणारी असते. मागील काय तृटी होत्या,काय चुका झाल्या, काय बेस्ट होत. या सर्वांचा विचार करायला वेळ मिळतो. काही घटना प्रसंगावरून हे अधिक लक्षात येईल.

रूपाली अतिशय समंजस, नाकासमोर चालणारी मुलगी. ती आता दहावीत गेली होती. अभ्यासात जेमतेम होती, पण दहावीचं मनावर घेतलं होतं. नियमित अभ्यास चालू होता . क्लासही लावला होता इंग्रजी ,गणिताचा. याच विषयांच तिला जाम टेन्शन यायचं. पण तिने यावर एक उपाय शोधून काढला होता. तिच्या एका मैत्रिणीला क्लास नव्हता तिला ही क्लासमध्ये झालेलं सगळं शिकवायची. जेणेकरून तिची रिव्हीजन होत होती आणि आत्मविकासही वाढला होता.

काही दिवसांनी दहावीची परिक्षा झाली. पास होणार ही खात्री होती. परंतु परिणाम उलटा झाला. नेमके गणित इंग्रजी हे विषय गेले. रूपली खूप उदास झाली. तिला कोणाशीही बोलण्याची इच्छा वाटत नव्हती. तीने रिचेकींगचा फॉर्म देखील भरला पण काही उपयोग झाला नाही.

पण काही दिवसांनी तीने ठरविले रडून उपयोग नही पुन्हा प्रयत्न करायचे. आता तर क्लासही लावला नाही आणि ऑक्टोबरला दोन्ही विषय चांगल्या मार्कांनी सुटले काय केलं तिने स्वत:ला आजमावून बघितलं खरंच मला सगळं कळलय का अर्धवट ज्ञानालाच मी चोंबळत बसले आहे ,याचा तिने नीट विचार केला आणि चूका सुधारण्यावर भर दिला. आज ती शैक्षणिक क्षेत्रातच उच्च पदावर आहे.

*हे का शक्य झाले… कारण रूपाली स्वत:ला दुसरी संधी दिली. 🙂*

मिलींद युनिव्हर्सिटी च्या दुसऱ्या वर्षाला होता तिथं तो सविता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला.सविताने तिचा पास्ट आधिच मिलींदला सांगितला होता. त्याने त्यावर काहीच फारकत घेतली नाही. त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितले होते, तुझ्या भूतकाळाशी मला काही देणं नाही. आणि ज्या अर्थी तु मला स्वतःहून प्रपोज केलं, त्याअर्थी तुला मागचं सगळं विसरायचं आहे. एवढ मला कळू शकतं. त्याच्या या उत्तराने सविता अतिशय भारावून गेली होती.

एकदा ती त्याच्या गावाच्या घरी देखील जावून आली होती. तिला ते आवडलंही. दोघांमध्ये लग्नाच्या बोलाचाली होत होत्या. काही दिवसांनी सविताला मुंबईला नोकरी लागली. ती तिथेच रूम घेऊन राहू लागली. आता ती मिलींदला फारसा वेळ देत नव्हती, त्याला वाटायचं कामामुळे असेल कदाचित….

अखेर तो दिवस उजाडला… तिने त्याला सांगितले आपल्यात आता काही नाही….. आणि तिने मोबाईल नंबरच बदलून टाकला..

या प्रकरणाने मिलींद मात्र फारच हळवा झाला होता त्याने जवळ जवळ जगाशी संपर्कच तोडला होता. यावर उपाय म्हणून त्याच्या आई वडीलांनी त्याचे लग्न लावून दिले. सुदैवाने प्रिया चांगली मुलगी होती. तिला विश्वासात घेऊन मिलींदने त्याचा भूतकाळ तिला सांगून टाकला. यावर ती त्याला एवढचं म्हणाली इथून पुढे फक्त माझेच बनून रहा म्हणजे मिळवले. 😀😀😀

आज मिलींदला एक छानशी मुलगी आहे आणि त्यांच्या स्वत:च्या ३ छोट्या कंपन्या आहेत…

*प्रियाने मिलींदला दुसरी संधी दिली नसती तर तो आज प्रगतीपथावर नसता*

अशी नामवंत लोकांचीही नावे घेता येतील की ज्यांनी पहिल्या प्रयत्नात अपयश स्विकारून दुसऱ्यांदा प्रयत्न केला व यश मिळाले.

*अब्राहम लिंकन*
*आईनस्टाईन*
*अमिताभ बच्चन*
*सचिन तेंडुलकर*
असे एक ना अनेक नावे घेता येतील….

*आपण सर्व जण लहानपणी कोणताही खेळ खेळताना पहिला डाव देवाला द्यायचो. आठवतय….*
*या मागची हीच भूमिका असेल कदाचित… पहिला फक्त प्रयत्न आणि दुसरी संधी*🤭
ही संधी स्वत:ला देऊ या आणि यशाची शिखरे सर करूया . 🙏🏻


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!