Skip to content

दुःखांसोबत जगण्याची सवय लावाल तर आयुष्यात नवीन काहीच घडणार नाही.

दुःखांसोबत जगण्याची सवय लावाल तर आयुष्यात नवीन काहीच घडणार नाही.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


जीवनात बऱ्याच चांगल्या-वाईट घटनांना आपल्याला तोंड द्यावे लागते. काही वेळा त्या दुःखांवर मात करून किंवा त्यांना पचवून आपण पुढे जात असतो. पण काही दुःख अशी असतात की त्यांना विसरणं किंवा त्यांच्यावर मात करणं अवघड किंवा अशक्य वाटायला लागत आणि मग माणूस त्या गोष्टींना विसरण्यापेक्षा ते दुःखच स्वतःबरोबर घेऊन वावरायला लागतो.

आणि हे असं दुःख सतत सोबत असल्याने त्याची सवयच होऊन जाते. सगळ्याच माणसांना दुःख विसरणं शक्य नसत, पण मुळातच माणूस कोणतीही गोष्ट विसरतो हे खरं सत्यच नसत. सातत्याने त्या गोष्टी डोक्यात न येणं म्हणजे आपण त्या गोष्टी विसरतो असं नक्कीच नसत. ते कुठेनाकुठे डोक्यात नक्कीच साठवलं गेलेलं असत.

पण काही लोकांना हे सातत्याने आठवत नसल्याचं पण guilt वाटायला लागत. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीला आपण विसरलो की काय किंवा जी वाईट घटना घडली ती एवढी वाईट होती तर आपण कसे विसरू शकतो असा विचार करून ते स्वतःला दोषी समजतात. आणि त्या दोषापेक्षा मग त्यांना त्या दुःखात राहणं जास्त सोयीस्कर वाटायला लागत आणि ती माणसे त्या दुःखाची सवय करून घेतात.

जर आपण सतत स्वतःला दुःखद घटनांची आठवण करून देत असू किंवा ती आपोमत होत असेल तर आपण आयुष्यात येणाऱ्या नवीन संधींचा लाभ घ्यायला मुकतो. किंबहुना त्या संधी आलेल्या सुद्धा आपल्याला कळत नाही इतके आपण आपल्या दुःखात गुरफटलेले असतो. मुळातच नैसर्गिकरित्या ऊन-पाऊस-थंडी असे ऋतू येत जात असतात, त्याचप्रमाणे दिवस-रात्र आणि सुख-दुःख हेही ऋतूंप्रमाणेच येत जात असतात.

त्यामुळे दुःख वाट्याला आलं म्हणजे सुखाचा उपभोग कधीच घेऊ नये असं कधीच नसत, किंवा आपल्या वाट्याला सुख येणार नाही असं देखील कधी होत नाही. त्यामुळे अशा दुःखाला वाट मोकळी करून देऊन आपण ही त्यातून मोकळं व्हायला शिकणं गरजेचं आहे. आणि आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टींना, संधींना एक चान्स तरी नक्कीच देणं आवश्यक आहे.

दुःख सगळ्यांनाच या ना त्या पावलावर फेस करावं लागत असत, पण त्या दुःखाबाबत आपण काय करतो हे त्या दुःखापेक्षा जास्त महत्वाचं ठरत. तुम्ही परत अधिसारख्या उत्साहाने जगायचं ठरवता की जो भूतकाळ आपण कधीही बदलू शकत नाही , त्याचा सतत विचार करत बसून वर्तमान आणि भविष्यकाळ खराब करायचा? आपल्या दुःखांसाठी बऱ्याच वेळा माणसे इतर माणसांना, नशिबाला किंवा देवाला दोष देत असतात.

त्या माणसांनी त्यांच्या चुकांबद्दल माफी मागावी, किंवा त्याची कबुली द्यावी अशी अपेक्षा त्यांना असते. इतरांना दोष देत बसण्याचे ही काही तोटे असतात. उदाहरणार्थ, जरी तुम्ही त्या माणसाला त्या चुकीबद्दल जाब विचारला तरी ती व्यक्ती, ‘ मी असं काही केलंच नाही’ असं म्हणू शकते किंवा ‘ हा केलं मी ते, आता काय?’ असं उलट आपल्यालाही विचारू शकते.

अशावेळी आपल्याकडे राग आणि वेदना यांव्यतिरिक्त काहीही उरत नाही. त्यामुळे ज्या वेदना , दुःख वाट्याला आलं आहे ते पूर्णपणे अनुभवून त्याला कुठेही आत दाबून न धरता पूर्णपणे अनुभवून मग move on करणे योग्य ठरते. ज्या व्यक्ती मागच्या दुःखांना नेहमी मनात ठेवतात, त्यांना ते दुःख नेहमी कवटाळून बसतं. पण आपण या गोष्टी let go करण्यासाठी म्हणजेच त्या सोडून देऊन पुढे जाण्यासाठी काही गोष्टी करू शकतो.

१. त्या दुःखांना सोडण्याचा निर्णय घ्या. त्या घटना, त्या वेदना, ती दुःख मनाने स्वतःहून जाणार नाहीत , जर आपणच कुठेतरी consciously त्यांना धरून ठेवलं असेल. त्यामुळे conscious effort करून आपल्याला ती सोडून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. मनाला सगळं पटवून दिल्यास हळूहळू त्या गोष्टी आपण नक्कीच सोडून देण्यात यशस्वी होऊ शकतो. सोडून देण्याचा निर्णय घेणे म्हणजेच ही गोष्ट स्वीकारणे की आपण या गोष्टी सोडू शकतो आणि त्या गोष्टी सोडण्याचा चॉईस आपल्याजवळ आहे. कारण ही दुःखं आपण धरून ठेवायची की सोडून द्यायची हा आपलाच चॉईस असतो.

२. आपल्याला झालेलं दुःखं व्यक्त करणे. मग ते त्या व्यक्तीकडे व्यक्त करणं असो किंवा आपल्या डायरीमध्ये ते लिहिणं असो, पण त्या गोष्टी व्यक्त केल्याने आपल्याला नक्की कशाचं एवढं दुःखं आहे आणि कोणती गोष्ट आपल्या मनात राहून गेलीये हे कळायला मदत होते. जेवढं काही असेल तेवढं सगळं त्याच वेळेस मनातून रिकामं करून टाका.

३. इतरांना दोष देणं बंद करा. चूक कोणाची हे शोधणं नक्कीच महत्वाचं. पण ते करत असताना आपली यात थोडीशी सुद्धा चूक नाही ना हे ही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि आपली चूक असेल तर पुढच्या वेळी तसं होऊ न देणं हे आपल्या हातात आहे. आणि जर चूक दुसऱ्या कोणाची असेल तर हे लक्षात घ्यायला हवं की आपण दुःखात राहिलो काय किंवा सुखात जगलो काय दुनिया चालायची कोणासाठी थांबत नसते. त्यामुळे आपण दुःखं कुरवाळत बसायचं की उठून दुःखं झटकून देऊन आलेल्या गोष्टींशी सामना करायचा हे आपण ठरवायचं.

४. आज आणि आत्तावर फोकस करा आणि चालू क्षणाचा आनंद घ्या. मागच्या गोष्टी परत-परत उगाळत बसण्यापेक्षा, त्यांचा त्रास त्या घडून गेल्यानंतर आत्ताही करून घेण्यापेक्षा आजचा दिवस नव्याने जगायला शिका. मागच्या दुःखामध्ये तुमची चूक असेल किंवा नसेल पण त्यासाठी तुम्ही आजचा दिवस खराब करत असताल तर याचा दोष कोणाला देणार? मागचं सोडून देऊन आजचा दिवस कसा बेस्ट बनवता येईल आणि जगता येईल याचा विचार करा.

५. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही करू शकता ते हे की, त्यांना (ज्यांच्यामुळे तुम्ही फार दुखावले गेलात) किंवा तुम्ही स्वतः या दोघांना भूतकाळातल्या घटनांसाठी, दुःखासाठी माफ करा. जे तुमच्याशी वाईट वागले, ते वागणं विसरला नाहीत तरी चालेल, पण शेवटी माफी सगळेच deserve करतात. मग त्यांनी माफी मागो वा न मागो , आपण मात्र माफ करून टाकायचं. कारण माफ करणाऱ्याला त्याचा सगळ्यात जास्त फायदा असतो. माफ केल्याने आपण ते ओझं घेऊन वावरत नाही , आणि त्यामुळे आपण हलके होत असतो. माफ करणे म्हणजेच एकप्रकारे त्या गोष्टीला वाट करून देणे, सोडून देणे.

कोणताही माणूस दुःखं घेऊन जगणं, deserve करत नसतो. त्याने ना वर्तमान काळावर फोकस राहतो, ना मन लावून कष्ट करता येतात, आणि आपल्या इतर नात्यांवर देखील याचा गंभीर परिणाम होत असतो. या गोष्टी करायला जरी अवघड वाटत असल्या तरी ज्याची खरंच मनापासून या दुःखातून बाहेर येण्याची किंवा त्याला सोडण्याची इच्छा असेल त्याला नक्कीच करताना ते फारसं अवघड जाणार नाही. शेवटी इच्छा तेथे मार्ग !!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “दुःखांसोबत जगण्याची सवय लावाल तर आयुष्यात नवीन काहीच घडणार नाही.”

  1. Rupesh Bhandigare

    Very nice article.. Leave the sadness…mind constraint on only present..it is very best way of happiness..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!