Skip to content

दीर्घायुषी जगण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स !!

दीर्घायुषी जगण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स !!


टीम आपलं मानसशास्त्र


दीर्घायुषी जगण्याची इच्छा इथे कोणाला नाही, प्रत्येकाला आयुष्याचे जितके दिवस लांबता येईल, तितके अनेक नव्या-नव्या गोष्टी करता येईल असे प्रत्येकाला वाटत असते. तसेच इतक्या कमी वयात मरण येऊ नये, म्हणून जो तो प्रयत्नही करत असतो.

या लेखात काही गोष्टींचा विचार करूया. म्हणजेच काही शारीरिक आणि काही मानसिक बाबी यांची सांगड घालून योग्य दिशा मिळू शकेल. कारण या दोघींशिवाय दीर्घायुष्य जगण्याची संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही.

काही मानसिक टिप्स :

♦ कोणत्याही प्रसंग, व्यक्ती, घटना यांतून निर्माण होणारे ताण, चिंता, अतिविचार यांमध्ये फार काळ अडकून पडू नये. आपण जितके अडकून राहू तेवढ्या प्रमाणात जगण्याच्या इतर मूल्यांपासून स्वतःला दूर सारू.

♦ इतरांकडून अवास्तव अपेक्षा अजिबात ठेऊ नये. जास्तीत जास्त अपेक्षा आपण स्वतःकडूनच ठेवायला हव्यात. तुम्ही जितक्या अपेक्षा या स्वतःकडून ठेवाल तितकं तुम्ही मानसिक संघर्षापासून अलिप्त रहाल. म्हणून स्वतःच्या अपेक्षांची जबाबदारी स्वतःच घ्या.

♦ आपल्या आवडी निवडी जपा. जगण्याच्या या धावपळीत आपण आपलं जगणंच विसरून गेलेलो असतो. आपले छंद हे आपल्याला जगवत असतात. परंतु आपण मात्र त्या सगळ्यांकडे कायम दुर्लक्षच करतो.

♦ जास्तीत जास्त कोणाच्याही हेवेदाव्यांमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका. तो व्यक्ती असाच आहे, त्याला मी असंच उत्तर देईल वगैरे. यांमध्ये गुंतून पडू नका. ध्येयापासून विचलित करणाऱ्या या गोष्टी असतात. यांपासून चार हात दूर राहिलेलेच बरे.

♦ कोणाचंही वैर घेऊ नका. एकतर माफी मागा किंवा माफ करा. नवनवीन विषयांमध्ये आपल्या मनाची गुंतवणूक करा. जुन्या कलांमध्ये काय घडलं होतं, मग पुढेही घडेल कि काय, अशा भंपक गोष्टींसाठी वेळ देऊ नका.

♦ जास्तीत जास्त सोशल राहण्याचा प्रयत्न करा. चार भिंतीतलं आयुष्य केव्हाही धोकादायक. आपण जितकं समाजाला स्वीकारू तेवढा आत्मविश्वासही आपला बळावतो. इतरांचे सल्ले घ्या, तसेच इतरांना योग्य सल्ला द्या. इतरांच्या मदतीला धावून जा. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्या.

काही शारीरिक टिप्स :

♦ दररोज १५०० कॅलरीपेक्षा जास्त भोजन करू नये. शरीराचा लठ्ठपणा जास्त असलेल्यांनी आपला आहार कमी करावा. उकडलेल्या भाज्या, फळे यांचा आहार घ्यावा. आहारात साखर, मिठाई, तूप यांचे प्रमाण कमी करावे.

♦डायबिटिसच्या रुग्णांनी कार्ले, जांभूळ, बेलाची पाने यांचे सेवन करावे. अशा लोकांनी शक्यतो उपवास करणे टाळावे. गूळ, साखर, मध, आईस्क्रीम, गोड फळे, भात, पोहे, मैद्याचे पदार्थ यांचे सेवन करणे टाळावे. वेळोवेळी रक्त-लघवीची तपासणी करून घ्यावी.

♦ हृदयाचे विकार असणाऱ्यांनी आपल्या शरीराचे वजन वाढू देऊ नये. मानसिक चिंता आणि क्रोध यांपासून दूर राहावे. भाज्या व फळे यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. तेलात तळलेले पदार्थ, तूप, मिठाई यांचे सेवन करू नये. तसेच बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू यांना दूर ठेवावे. नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. नियमितपणे ताक प्यावे.

♦ उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. याचबरोबर लोणचे, चटण्या, पापड, मसालेदार पदार्थ यांचे सेवन कमी करावे. अशा लोकांनी सकाळी आणि संद्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाणे आणि हलका व्यायाम करणे गरजेचे असते.

♦ त्वचारोग असलेल्या रुग्णांनी अंग खाजत असल्यास त्वचेवर खोबऱ्याचे तेल चोळावे. अशा लोकांनी कॉस्टिक सोडायुक्त साबणाचा वापर करू नये.

♦ पोटाचे विकार, जळजळ, ऍसिडिटी, अल्सर इत्यादी त्रास असणाऱ्या लोकांनी बेसनाचे पदार्थ खाण्याचे टाळावे. मिरची, मसाले तिखट पदार्थ खाऊ नयेत. जेवताना शक्यतो पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

♦ खोकला, दमा आणि ऍलर्जी असलेल्या लोकांनी दही, ताक, लिंबू, संत्री, चिंच, कैरी, थंड पेय, आईस्क्रीम आणि फ्रिजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ खाऊ नयेत.

वरील हे सर्व पथ्य आपल्या दीर्घयुषी जगण्यास मदत तर करतीलच पण आपल्याला सदैव टवटवीत ठेवतील. आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा या टिप्स आवर्जून सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “दीर्घायुषी जगण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!