त्रास होणार असेल तर क्षणिक सुखांचा मोह आवरायला हवा.
सोनाली जे.
संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हणले आहेच..
मागे बहुतांसी सांगितले संती । वाया हे फजिती संसार तो ।
अंधाचे सांगाती मिळालेले अंध । सुख आणि बोध काय तेथे
फार पूर्वीच संतांनी उपदेश केला की संसार ही केवळ लटकी माया असून तिच्या बंधनात अडकणे म्हणजे व्यर्थ जीवन घालवणे. जो सत्याचे दर्शन घेऊ शकत नाही, अशा अंधास दुसरा अंध भेटला तर कोण कुणाला योग्य मार्ग दाखवणार आणि त्यापासून कोणते सुख प्राप्त होणार ?
आपण ही आयुष्यात क्षणिक सुखांच्या मागेच तर धावत आहोत!!
आज माझ्या कडे जी गोष्ट नाही ती मिळविण्याकरिता मी धडपड करेन, ती वस्तू मिळत नाही तोपर्यंत ती अतिशय मौल्यवान.पण एकदा का ती वस्तू मिळाली की ती मिळविण्याकरिता ची धावपळ संपली.. माझीच वस्तू आहे कधी ही पाहिजे तेव्हा माझीच आहे त्यामुळे एकदा का ती मिळाली की आपल्याला त्याची किंमत शून्य होते.आणि ज्या गोष्टी नाहीत त्या मिळविण्याकरिता परत आपण धडपड करत असतो .
म्हणजेच आपण जो आनंद मिळवीत असतो तो क्षणिक च तर असतो. व्यक्ती , नाती , मैत्री, प्रेम यांचे ही असेच आहे..एखाद्या मुलाला एखादी मुलगी खूप आवडते., सध्याच्या तरुणांच्या बोली भाषे प्रमाणे त्या मुलीला पटवे पर्यंत ती मुलगी अतिशय महत्वाची, तिला तुमच्या आयुष्यात आणण्याकरिता तुम्ही तिची ओळख करून घेण्याकरिता धडपड करता, जवळचे मित्र – मैत्रिणी यांची मदत घेता . ओळख झाली की तिच्या आवडी निवडी समजून घेण्याचा प्रयत्न करता, तिला भेटवस्तू देवून खुश करता, कधी हॉटेल मध्ये , कधी बाहेर पिकनिक अशी तिला खुश करण्याकरिता अनेक प्रयत्नाची शिकस्त करता.
परंतु जशी ती तुम्हाला पटली किंवा तुम्ही तिला पटवली की तुमची धडपड संपली. मग ती आपलीच आहे. मग वारंवार होणाऱ्या भेटी कमी झाल्या तरी , किंवा तुम्ही अभ्यास , नोकरी यात व्यस्त असता आणि भेटू शकत नाही..परंतु हे कधी जेव्हा तुम्ही तिला आपले करण्याकरिता ची धडपड संपल्यावर..जेव्हा तुम्हाला खात्री पटते की आता ती आपलीच आहे तेव्हा तुम्ही तुमच्या इतर कामांना ही प्राधान्य देवू लागता. पण यात जर दोघांमध्ये understanding नसेल तर एकमेकांकडून अपेक्षा वाढलेल्या असतात.
एकमेकांना वेळ देणे जमत नसेल , भेटणे जमत नसेल किंवा इतर गोष्टी मध्ये व्यस्त असाल तर साहजिक त्यातून वाद वाढतात. पूर्वी कसा वेळ असायचा आता का नसतो, पूर्वी किती मनमोकळेपणाने बोलायचो, आवडी निवडी जपल्या जायच्या, आता काय होते..अशा वादातून वाद मिटविण्याचा प्रयत्न म्हणून एकमेकांना भेटले , वेळ दिला, भेटवस्तू दिल्या तरी जेव्हा परत routine मध्ये लागल्यावर परत हेच विचार आणि याच विषया वरून परत वाद होत असतील आणि भेटण्यातुन समेट होत असेल आणि परत लांब गेले की वाद होत असतील म्हणजेच एकमेकांना त्या क्षणिक सुखांच्या मोहातून परत परत त्रास च होत असेल तर त्याला वेळीच आवर घातला गेला पाहिजे ना!!
एक तर खूप क्लिअर कॉन्सेप्ट , understanding असावे , एकमेकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि जे करणे खरेच शक्य आहे .हे जर एकदाच एकमेकांनी समजून घेतले तर अवास्तव अपेक्षा, लटके राग , किंवा सतत भेटण्याची अपेक्षा या गोष्टी वर कंट्रोल तर येईलच.
तसेच सतत भेटणे , बोलणे, जवळ असणे , भेटवस्तू देणे , फिरायला जाणे म्हणजेच प्रेम या सारख्या क्षणिक मोहापासून दूर राहता येईल ..आणि उलट खरे प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांविषयी आदर , विश्वास आणि आपुलकी , ओढ वाटणे , या गोष्टींचा बाँड strong करता येईल.
वाल्या कोळ्याची गोष्ट सर्वांना परिचित आहेच.. वाल्या कोळी आपली बायको आणि मुलगा यांना आनंद देण्याकरिता , सुखी ठेवण्याकरिता जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंची लुटमार करत असे. त्यातून जे पैसे , दागिने मिळत ते तो आपल्या बायको आणि मुलाला सुखी आनंदी करण्याकरिता घेवून जात असे.
एकदा नारदमुनी जंगलातून जात असताना वाल्या कोळी त्यांना अडवितो.त्यांच्यावर कुऱ्हाड उगरतो तेव्हा नारदमुनी खदा खदा हसायला लागले ते पाहून वाल्या कोळी आश्चर्य चकित झाला आणि त्याने कारण विचारले. तेव्हा नारदमुनी म्हणले वाल्या तू एव्हढे पाप करतो आहेस तुझ्या घरी जावून बायको आणि मुलाला विचार की ते तुझ्या पापा मध्ये पण सहभागी होतील का? वाल्या म्हणतो का नाही होणार मी जे करतो आहे ते मुलाच्या आणि बायकोच्या सुख आणि आनंद याकरिता च तर करतो मग ते नक्कीच माझ्या पापात सहभागी होतील. घरी जावून वाल्या कोळी बायको आणि मुलाला विचारतो की तुम्ही माझ्या पापा मध्ये सहभागी व्हाल का?
तेव्हा बायको आणि मुलगा स्पष्टपणे नाही म्हणतात..ते म्हणतात तुझे कामच आहे आम्हाला आनंदी आणि सुखी ठेवण्याचे ..तेव्हा वाल्या कोळ्याच्या लक्षात आपली चूक येते तो नारदमुनींना परत येवून भेटतो आणि त्यांची माफी मागतो आणि म्हणतो आज तुमच्या मुळे माझी चूक मला समजली की मी माझ्या बायको आणि मुलगा यांच्या क्षणिक सुखा करिता रोज वाटसरूनां त्रास देत होतो , त्यांना मारत होतो आणि रोज माझ्या पापामध्ये वाढ करत होतो आणि मलाही त्रास करून घेत होतो..
आज मी त्यांच्या क्षणिक सुखाचा विचार करून जरी पाप केले तरी त्यांचा पैशाचा मोह कमी होणारच नाही, त्यांना आनंद आणि सुखाचा मोह माझ्याकडून कायम अपेक्षित आहे..पण या मोह मायेत त्यांना माझ्या पापाचा वाटेकरी मात्र व्हायचे नाही..मी त्रास करून घेतो , इतरांना ही देतो याचे त्यांना स्वतच्या क्षणिक सुखापुढे काहीच वाटत नाही. महाराज तुम्ही आज माझे डोळे उघडले असे वाल्या नारदमुनींना म्हणतो आणि तेव्हा तो या लुटमार या सगळ्यापासून दूर राहतो आणि तपश्चर्या करतो तेव्हा तो वाल्याचा वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखले जातात..
सध्याची परिस्थिती च अशी झाली आहे की गोष्टी वापरा आणि टाकून द्या. जसे पूर्वी पेन घेण्याकरिता धडपड करत होतो ते मिळाल्यावर लिहून रिफिल संपली तरी रीफिल बदलून तेच पेन वापरायचो . आता रिफिल संपली की पेन टाकून देतो केवळ त्यावेळी करिता ची त्याची गरज समजून..
विंडो शॉपिंग मध्ये केवळ क्षणिक आनंदा पायी किंवा त्याची ती आकर्षकता बघून ती घेण्याचा मोह होतो आणि आपण नको असलेल्या वस्तू ही घेवून येतो. बरेचदा घरी आल्यानंतर समजते की या गोष्टीचा आपल्याला काहीच उपयोग नाही आपण विनाकारण पैसे खर्च केले त्याऐवजी आपण ते बचत केले असते किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू करिता वापरले असते. .
म्हणजे काय तर मोठ्या मॉल मध्ये जावून आपण आपल्या तिथल्या गोष्टी ,किंवा जे display म्हणजे एक प्रकारची जाहिरात च की त्याचा मनावर परिणाम करून घेतो , त्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात आणि मनावर चे आणि खर्चावर चे नियंत्रण त्या क्षणाला सुटते. आणि मोहाची जादू चालून जाते .
पण जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा , किंवा पुढचे खर्चाचे ताळमेळ लावण्याचे प्रयत्न केले जातात तेव्हा या क्षणिक सुखांचा त्रास च होतो..गरज नसताना घेतले गेले म्हणून पश्चात्ताप च होतो.
त्रास होणार असेल तर क्षणिक सुखांचा मोह आवरायला हवा.याउलट आपल्या आयुष्यात कायम टिकणारा आनंद शोधा..जसे आपले आत्मपरीक्षण करून स्वतः ला ओळखा , आपले छंद जपा जे तुम्हाला कायम उत्साही ठेवत असतात. जसे लोकांना जपा पण त्यांना मानसिक आधार , विश्वास द्या , खात्री द्या , वेळ द्या ,आधार द्या, संवाद साधा , त्यांच्या भावना समजून घ्या , तुमच्या मोकळेपणाने मांडा, त्यांच्याकडून आणि त्यांना केवळ वस्तूरुपी किंवा पैशात च काही दिले गेले पाहिजे असे नाही.. कायम टिकणारी नाती जपण्याचा प्रयत्न करा.लहान मुलांच्या सोबत वेळ घालवा, खेळा त्यांच्या कडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात.
सध्याच्या काळात अनेक क्षणिक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. पैसा आणि तिखट खाताना छान वाटते, आनंद मिळतो पण नंतर त्रास होतो.
आयुष्य सुंदर आहे क्षणिक सुखापायी त्रास करून न घेता चिरंतन सुखाचा शोध घ्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Nice Information