Skip to content

त्रास देणारी माणसं निघून गेल्यावरही का त्रास होतो…??

त्रास देणारी माणसं निघून गेल्यावरही का त्रास होतो…??


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे(चिंतामणी चौक)


आयुष्याच्या वाटेवरती कितीतरी माणसं भेटतात , काही कायम लक्षात राहतात, काहींना आपण लक्षात राहतो, काही आयुष्याला कलाटणी देतात , काही आयुष्य बदलून टाकतात, काही आयुष्यभर साथ देतात, काही मुद्दाम त्रास देण्यासाठी आलेली असतात, ती त्यामध्ये असुरी आनंद अनुभवतात,

त्यांच्या वागण्या बोलण्याचा त्यांच्या वर्तणुकीचा आपल्याला कधी कधी खूप त्रास होतो, ही माणसं सतत कुठल्यातरी शुल्लक कारणावरून एक मोठी समस्या निर्माण करतात , शब्दाला शब्द वाढत जावून एका भांडणात रूपांतर होते आणि गरज नसताना सुद्धा शुल्लक वाद होतात,
त्याचा त्रास मात्र दिसत नसला तरी कुठे तरी मनात सलत राहतो….

काही जण आपला राग संताप ही नेहमीच दुसऱ्यावर उतवरत नाही, तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही, आणि त्यामुळे मात्र नात्यांमध्ये एक सहसंबंध निर्माण होणे कठीण जाते …. त्रास देणारी माणसं निघून गेल्यावरही का त्रास होतो??? कारण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे आपण नाही ती गोष्ट विसरू शकतो , नाही त्या व्यक्तीला ती व्यक्ती तर निघून गेलेली असते ,

तरी पण काही जखमा इतक्या खोलवर झालेल्या असतात की त्यांना कितीही भरल्या तरी त्यांचा त्रास मात्र आयुष्यभर असतो, काही गोष्टी खूप सोप्या वाटतात, अरे काय त्यामुळे त्रास झाला गेली ना ती व्यक्ती निघून सोड ना विषय आता , त्या गोष्टीला त्रास करून घ्यायचा नाही , म्हणायला खूप सोपे असते परंतु जी व्यक्ती त्या त्रासातून जात असते, त्यांच्यासाठी ते खुप कठीण असते ,

आपल्याला त्रास का होतो ?कारण आपल्या काही ध्यानीमनी नसताना आपल्यासोबत असे काही घडेल अशी कल्पना सुद्धा आपण केलेली नसते, आणि मग ते आपल्या स्वीकारता येत नाही , ते स्वीकारायला जड जाते,

आपण कधी कोणाला त्रास दिलेला नसतो ,त्यामुळे त्या गोष्टी आपल्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्धार्थी असतात , त्यामुळे त्या त्रासाचा आपल्याला वेळोवेळी त्रास होतो,

आपल्याला त्रास होण्यामागे हेसुद्धा एक कारण आहे की आपले मन खूप निर्मळ असते, आपले चांगले असल्याचा ,फायदा उचलून काही जण आपल्याचं शिकार बनतात , आणि त्यामुळे आपल्या चांगल्या स्वभावाचा आपल्याला त्रास होतो,

त्रास होण्यामागे एक कारण आहे पण असते की आपल्याला आपल्या स्वतः बद्दल खुप चिड येते, कारण मन हे ईतके नाजूक असते , की त्यावर केसासारखी जरी तडा गेली तरी त्याचं दुःख आभाळाएवढे असते, बर्‍याचदा असे म्हणतो की जाऊ दे सोडून दिला तो विषय परंतु तो त्रास मनातून काढलेला नसतो…

झालेल्या जखमा वरती खिलपी तयार होते, मात्र त्या खाली त्रास मात्र कधी संपलेला नसतो , जखमेवरची खिलपी निघतांना नाही त्याचा त्रास मात्र यापेक्षाही जास्त असतो , त्रास देणारर्‍यांचा त्रास होतो पण तो करून घ्यायचा नाही,……!

मनुष्य हा भावनांनी जोडलेला आहे, आपण माणूस जन्माला आलो आहोत , आपल्यात राग, आनंद, प्रेम, वात्सल्य… अशा कितीतरी भावनांचा मानवी शरीरात एकत्रित समावेश होतो, त्यामुळे काही वस्तूंशी सुद्धा आपल्या भावना जोडलेल्या असतात , आणि त्यामुळे त्रास देणाऱ्या व्यक्ती निघून गेल्यावरही त्रास होतो ,

नऊ टक्के जर कुणाचा त्रास होत असेल , तर अशी एक तरी गोष्ट त्या व्यक्तीमध्ये चांगली असते त्यामुळे सुद्धा त्रास होतो …. कुठेतरी माणसाला एकटे पडण्याची भीती असते , त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती निघून गेल्यावरही त्रास होतो ….

जीवन हे क्षणभंगुर आहे, त्याच्या वाटेवर फुले आहेत , तसेच काटे सुद्धा आहेत, प्रत्येक रस्त्याला वळण असतेच, तसेच आयुष्याच्या प्रवासातही त्रास आहेच, दुःख आहेचं, कधी आपल्याकडून, कधी परक्या कडून , तर कधी स्वतःच्या चांगुलपणा कडून आपल्याला त्रास होतो.. याचा अर्थ आपण माणूस म्हणून जगण्याच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत,

पण किती वेळ स्वताला त्यामध्ये घुटमळत ठेवणारं… जेव्हा त्रास होतो ना स्वतःला थांबवु नका ….रडावसं वाटत असेल ,…..रडून घ्या …..मन मोकळं करावसं वाटत असेल…… मन मोकळं करा ….पण त्रास देणाऱ्या त्याचं त्याचं जखमा परत परत कुरतडू नका …..कारण ती जखम एवढी खराब नका होऊ देऊ की नंतर ती दुरुस्त करता येणार नाही,

त्रास होतो, तो तेवढ्यापुरताच ठेवा…..

“” जिंदगी बहुत खूबसूरत है मेरे दोस्त ,
जरा कभी घर से निकल कर देख तो….!””


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!