तू फक्त एवढंच बघ, जे जातंय निसटून ते तुझं नव्हतंच!!
प्रीती लांडगे
हो खर आहे हो ना, नाही तर आपले कसे झाले, का झाले या चक्रात अडकतो. आणि येणाऱ्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. किंवा तसे होते कारण या चक्रात अडकल्या मुळे आपण आपल्याच भोवती एक प्रकारचे निगेटिव्ह वातावरण तयार करतो. तुम्ही जर कधी लक्ष दिले तर आपल्याला घाण वास सहन होत नाही.
आणि आपण लगेच दुसरीकडे चांगल्या जागी जातो किंवा फुलाचा सुगंध घेतो तेव्हा बरे वाटते अगदी तसेच आहे विचाराचे ही, तुम्ही सोडून दिले किंवा जे निसटून गेले ते आपले नव्हतेच हे जेव्हा स्वीकारता तेव्हा सकारात्मक विचाराला जवळ करता चांगले विचार येतात आणि त्याहून काहीतरी चांगले तुमच्या आयुष्यात येते. कारण जे गेले त्याला सोडले मोठ्या मनाने स्वीकारले हे महत्त्वाचे आहे.
कारण निसर्गाचा नियम आहे. (आना – जाना लगा रहेंगा) सुख येईल दुख जाईल. दुख आले तर सुख जाणार म्हणून निसटून गेले ते तुझे नव्हते. जस ओंजळीतील पाणी निसटून गेले की आपल्याला काही वाटत नाही कारण माहिती आहे. ते माझे नाही तसेच आता जीवन जगताना जे काही चांगले वाईट अनुभव येतील आणि तसेच निघून जातील तर ते माझे नव्हते अस बोलून पुढील नवा रस्ता धरायचा.
मला आता काय काय बघायचे आहे किंवा काय सोडून द्याचे आहे याकडे लक्ष देऊन जे माझे नाही त्यात सक्रिय स्वीकार मेन्टेन करायचा आहे. हे माझे का नाही यात अडकून न रहाता हे माझे नव्हते म्हणून सोडा. अगदी तुमचे रिलेशनशिप असेल. किंवा एखादी गोष्ट खूप आवडीची आहे. आणि ती निघून गेली आयुष्यातून तर त्या अडकून राहू नका कारण तो गेला आणि तुम्ही तिथेच आहात आणि कशासाठी जे तुमचे नाही त्यांच्यासाठी अडकून ठेवले आहे.
स्वतःला नाही तुमच्या दिशा स्पष्ट करायच्या असतील तुमचा विकास करायचा असेल. तर ते तुमचे नाही ऐवढे बघा लक्षात ठेवा कारण हे सगळे काही काळापूरते आहे . परंतु तुम्हाला तुमची संगत ही आयुष्य भरासाठी आहे. म्हणून काही गोष्टी निसटून गेल्या म्हणून दुख करत बसू नका. आगदी तुमचा एखाद्या व्यवसाय गेला तुमच्या हातून ठिक आहे गेला. परंतु तुमची कला कधी जाणार नाही. तुम्ही नव्या जोमाने पुन्हा तोच व्यवसाय सुरू करता फक्त तुम्ही हिंमतीने उभे रहा.
आधीच्या घटनेत अडकू नका. तसेच नात्याचे आहे. एखादे नाते बिघडले एक आकार चूकला परंतु दुसऱ्यादा नवीन आकार देऊन ते नव्याने फुलवू शकता. आता उलट आधी काय चुका केल्या हे माहीत आहे म्हणून त्या चुका तुम्ही पुन्हा नाही करणार त्यात सुधारणा करुन तुम्ही पुढे जाल आणि आधीचे माझ्यासाठी नव्हते हे समजून प्रवास सुखकर कराल.
पाणी एका जागी थांबून राहीले तर त्याचे घाण डबके होते. परंतु ते वहात राहीले तर अने नद्यांना, सागराला जाऊन मिळते आणि त्याच्या कक्षा रुंदावते. हे कधी होते जेव्हा तुम्ही निसटून गेले ते माझे नव्हते असे म्हणून पुढे जाता तेव्हा हा अनुभव अनुभवता तेव्हा. म्हणून भूतकाळातील भूते फार काळ नाचवू नये.
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे, अस म्हटलेलेच आहे. आपण कधी कधी काही गोष्टी आवडल्या नाही. म्हणून तीथून निघून जातो तसे एखादी गोष्ट नाही पटली तर ती निसटून गेली आपल्यासाठी नव्हती हे स्वीकारचे. माझ्या आयुष्यात माझ्या व्यक्ती महत्त्वाच्या विकासासाठी हे झाले आहे ऐवढे लक्षात ठेवा.
निसटून जाणे म्हणजे तरी काय ती एकाकडून दुसरीकडे गेली म्हणजे अगदी कंठ दाटून येतो. कारण तुम्ही आकंठ बुडाला म्हणून कंट दाटून आला आणि अश्रू ओघळू लागले तसेच जे जातय ते निसटू लागले. कारण ते तुझे नव्हतेच. जे आहे त्याचा आनंद घ्या. आणि बघा वा पुढे जा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

सदर लेखात बोध घेण्यासारखे फार काय आहे जन्माला आलो काही नाही गेल्यावर काही येणार नाही हे लक्षात ठेवून आपले जीवनाची सार्थक करून घेत रहावे हीच कळकळीची विनंती
Khupch chan 👌👌👍