तुम्ही टेन्शन निर्माण करणाऱ्या लोकांसोबत राहताय हे असं ओळखा.
हर्षदा नंदकुमार पिंपळे
टेन्शन हा आयुष्यातील एक भाग आहे. प्रत्येक व्यक्तीला टेन्शन असतं.कुणी खूप टेन्शन घेतं तर कुणी त्याच टेन्शनला अगदी हसतहसत झेलत असतं.टेन्शन नाही अशी एकही व्यक्ती नाही. पण काही लोकं ही टेन्शन घेण्याबरोबरच टेन्शन देतही असतात. कधी कधी कळत नकळतपणे हे टेन्शन आजुबाजूच्या लोकांमुळेही निर्माण होत असतं.पण ही लोकं कोणती हे आपल्याला कळत नाही. तर हे ओळखण्याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे—–
१)नकारात्मक विचार पद्धती –
बेसिकली माणूस रोज रोज नकारात्मक विचार करत नाही. काही वेळेस त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे तो थोडा नकारात्मक विचार करायला लागतो.अपयश, नैराश्य , किंवा अन्य वाईट प्रसंगाच्या वेळी माणसाच मन खोलवर दुःखावल जातं.त्यावेळी माणसाला आनंद, समाधान या गोष्टींचा विसर पडलेला असतो.अनेकदा तर तो तहानभूक देखील विसरतो.आणि हे सगळं एका मर्यादेपर्यंत निःशंक घडतही असतं. परंतु आजुबाजुला काही अशीही माणसं असतात जी सातत्याने नकारात्मक विचार करतात.कोणतीही गोष्ट करायची झाली तरी सगळ्यात आधी नकारघंटा वाजवण्यात अशी माणसं नेहमीच पुढे असतात.”नाहीच होणार..नाहीच होणार” असा चंगच त्यांनी मनाशी बांधलेला असतो.आणि अनेकदा हीच नकारात्मक विचार पद्धती वेगवेगळी विचीत्र परिस्थिती निर्माण करते.
२)डीमोटीवेट करणे –
माणसाला एखाद्याची प्रगती, एखाद्याच सुख हे सहसा बघवत नाही.स्वतःच कितीही बरं किंवा वाईट चालू असुदे तरीही काही माणसं ही दुसऱ्याच सुख बघायला मुळीच तयार नसते.अशी माणसं सतत दुसऱ्यांना खेचायचा प्रयत्न करतात.आयुष्यात सुखही येत असतं असं ही माणसं बहुधा बोलतही नाही.याउलट आयुष्य किती नकारात्मक आहे, आयुष्यात सगळं कसं निरर्थक आहे हे ती माणसं सतत बडबडत असतात. एखाद्याला मोटीवेट करण्याऐवजी सतत डीमोटीवेट करत असतात.
३)कायमस्वरूपी एकाच ठिकाणी गुंतून पडणे –
प्रत्येक माणसाला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे आहे. प्रत्येकाच्या वाट्याला चांगले आणि वाईट दोन्हीही दिवस हे येतात. फरक इतकाच की प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते.प्रत्येकाचा भूतकाळ हा चांगलाच असतो असं नाही.अनेकदा कित्येक वाईट घटना घडून गेलेल्या असतात.मान्य आहे की, एखाद्या घटनेतून बाहेर पडायला माणसाला थोडा वेळ लागतो. सहजासहजी माणूस त्या घटनेतून बाहेर पडत नाही.अर्थात काही माणसं ‘move on’ करतच नाहीत. एकाच ठिकाणी ती कायमस्वरूपी अडकून राहतात.पुढे काहीतरी भविष्य आहे असा विचार ते करतच नाहीत.
४)चिंतेत (भविष्याच्या) हरवणे-
माणूस वर्तमानात त्याचं भविष्य सुंदर करण्यासाठी धडपडत असतो. अथक परिश्रम घेऊन तो भविष्य घडवण्याच्या मागे लागतो. अपयश येऊनही तो डगमगत नाही. पुन्हा नव्याने तो उभा राहतो परंतु काही लोकांना सतत भविष्याची चिंता करण्याची सवय असते. त्यात वाईट आहे असं नाही. परंतु एका मर्यादेपलीकडे जाऊन जर माणूस संपूर्ण वर्तमान भविष्याच्या चिंतेत घालवत असेल तर त्याला खरच काय अर्थ आहे..?वर्तमान जगायचा सोडून अशी माणसं कायमच चिंतेने ग्रासलेली असतात. बऱ्याचदा त्यांच्या याच स्वभावामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन कोलमडत जातं.
५)सतत गोंधळलेले असणे-
प्रत्येक माणसाचा स्वभाव मुळीच सारखा नसतो.काही व्यक्ती या शांतपणे, नीटनीटकेपणाने स्वतःच्या गोष्टी सांभाळतात. आणि जमत नसेल तर ते कसब शिकून घेतात. पण काही व्यक्ती या सतत गोंधळलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीबाबत ते कधीच ठाम नसतात. सतत एखाद्या संभ्रमात ते अडकलेले असतात.घाई करून गोंधळून जाऊन गोष्टी बिघडू शकतात हे त्यांच्या अनेकदा लक्षातच येत नाही.
साधारणपणे अशा काही गोष्टी ज्या व्यक्तींमध्ये असतात त्यामुळे टेन्शनची निर्माण होऊ शकतं.म्हणून शक्यतो सकारात्मक लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आणि नकारात्मक विचार पद्धती असलेल्या लोकांनाही आपणच मोटीवेट करायला हवं.तरच टेन्शन वगैरे गोष्टींपासून आपण थोडेफार तरी लांब राहू शकतो.
सो..हसा खेळा मस्त रहा..टेन्शन न घेता बिंधास्त आयुष्य जगा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेख खूप प्रेरणादायी वाटला.कोई तनरोगी,कोई मनरोगी, धनविना उदास यही है जीवन कहानी।।