तुम्हाला सुद्धा लोकांनी केलेल्या ‘Comments’ चा त्रास झालाय का ?
टीम आपलं मानसशास्त्र
एखाद्या लेखाचा मुख्य अर्थ समजून न घेता प्रतिक्रिया देणे चांगल्या वाचकाचे लक्षण अजिबात नाही. लक्षात घ्या कि जेव्हा तुम्ही एखादी प्रतिक्रिया देता तेव्हा हजारो लोक तुमची प्रतिक्रिया वाचून तुमच्याबद्दल एखादे मत ठरवत असतात. प्रतिक्रिया देताना आपण मुख्य विषय समजून घेतलाय का आधी याचा विचार करा .
एखादा लेखक जेव्हा काहीतरी लिहितो तेव्हा त्याने सर्वांगीण विचार करून त्याने ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या घटना तो लिहीत असतो. तुम्ही न घेतलेले अनुभव किंवा तुम्ही न पाहिलेल्या गोष्टी समाजात घडतच नाही असे नसते.
जर एखाद्या व्यक्तीचे विचार गोष्ट तुम्हाला नाही आवडली तर त्यांना तुमचे मत पर्सनली कळवा समजून घ्या त्या लेखातून/कथेतून त्यांना नक्की काय संदेश द्यायचा आहे. ते समजून घेतल्यानंतर जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करा. तेव्हा हि हा विचार लक्षात ठेवा कि , ती प्रतिक्रिया खूप लोक वाचणार आहेत आणि लेखकाआधी ते तुमचे व्यक्तिमत्व ठरवून मोकळे होतील.
तुमचे अनुभव आणि तुम्ही पाहिलेले जग यापेक्षा कितीतरी नवीन घटना नित्य घडत असतात. लेखक ते अनुभव लेख किंवा गोष्ट रूपाने तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात. त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक स्वार्थ नसतो. फक्त त्यांच्या लिखाणातून , विचारातून तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन मिळावे काहीतरी शिकायला मिळावे असा साधारण हेतू असतो.
तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी घडतच नाही असे ठरवून मोकळे होऊ नये. विविध स्वभाव आणि विचारांची लोक या आपल्या समाजात वावरत असतात. प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो.
तो ज्या परिस्थितीत वाढला ती परिस्थिती त्याच्या त्या दृष्टिकोनाला कारणीभूत असते. जर सर्वाना लहानपणापासून एकसारखे चांगले संस्कार मिळाले असते तर कदाचित समाजात कधी गुन्हेगारी वाढलीच नसती.. सर्वांच्या आयुष्याचा शेवट परी कथेतील राजा राणी सारखा गोड झाला असता.
उदा . ” कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे चूक आहे ” हे सर्वाना माहित आहे मग व्यसन करणारे लोक या जगात नाहीत का ? असे असते तर व्यसनमुक्ती केंद्र का निघाली असती. ? एखाद्या लेखकाने थोडे काही वेगळे विचार व्यक्त केले कि , काही वाचकांना अशी सवय असते कि मूळ गाभा समजून न घेता पटकन प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात.
सर्वाना एक विंनती आहे कृपया जेव्हा कधी एखादी गोष्ट वाचाल एखादा लेख वाचाल तेव्हा त्याचा सर्वांगीण विचार करा. फक्त तुमच्या स्वतःच्या दृष्टीने जग न पाहता समजून घ्या कि नक्की त्या लेखातून / गोष्टीतून कोणाला काय संदेश द्यायचा आहे.
लक्षात घ्या कि एकसारख्या विचारांचिच सर्व लोक नसतात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. तुमच्या प्रतिक्रियेवरून लोक तुमच्या बद्दल चे मत बनवून तुम्हाला जज करतात. प्रतिक्रिया देताना सर्वांगीण विचार करून प्रतिक्रिया देत जा.
जर खरचं लेख किंवा गोष्टीचा गाभा चूक असेल तर तुमची परखड प्रतिक्रिया नक्की द्या .. तिथे एक उत्कृष्ट वाचक म्ह्णून तुम्हाला रिस्पेक्ट दिला जाईल. इतर चांगली लोक तुमच्या सोबत त्यामुळे जोडली जातील. पुढे आपली इच्छा …

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

