तुम्हाला इतरांमध्ये सतत चांगल्या गोष्टी दिसत असतील तर तुम्ही सुंदर व्यक्तिमत्व आहात.
टीम आपलं मानसशास्त्र
मनुष्य हा असा प्राणी आहे की जो विचार करू शकतो, त्याला बुध्दी आहे. विचारांची देवाण घेवाण करण्याची क्षमता नैसर्गिक रीत्याच प्राप्त झाली आहे. काही व्यक्ती कोणत्याही परिस्थतीत सकारात्मक च विचार करतात आणि बोलतात ही आणि त्यातही चांगल्या गोष्टीचं दिसतात. . अगदीं एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू देत. एखादी व्यक्ती आपल्या बरोबर सतत वाद घालत असते. पण तरी सकारात्मक राहून तिला कायम समजून घेवून , समजून सांगून , काही वेळेस शांत राहून , काही ही react न करता . शांतपणे हो का असे का , बरं . असे म्हणून त्या व्यक्तीला तिचे चांगले गुण च कायम दिसत असतात. वाद घालणारी व्यक्ती वाद घालते याच्या मागे हे कारण असे म्हणून त्यात ही चांगली गोष्ट पुढे आणतात.
जसे शिक्षक हे विद्यार्थी एखाद्या विषयात अभ्यासात मागे पडत असेल तर शिक्षक त्याला डायरेक्ट असे म्हणत नाहीत की तुझा हा विषय कच्चा आहे. तुला काही येत नाही. याउलट शिक्षक मुलाला बोलावून सांगतात. अरे तुझे हे विषय खूप चांगले आहेत. तुला त्यात गती ही आहे. आणि गुण ही चांगले आहेत. गणितात ही तुझी प्रगती चांगली आहे फक्त अजून थोडा सराव आणि प्रयत्न करूयात . म्हणजे सगळ्या विषयात उत्तम प्रगती दिसून येईल.
आपलं व्यक्तिमत्त्व सुंदर आहे याचा अर्थ केवळ बाह्य रूप सुंदर आहे असे नव्हे. तर तुमचे अंतर्मन , आंतरिक व्यक्तिमत्त्व सुंदर असणे त्यात बाह्यरूप सुंदर असणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच.
आपलं व्यक्तिमत्त्व सुंदर घडविताना , आपला दृष्टिकोन चांगला ठेवत असताना , आपण इतरांमध्ये सतत चांगल्या गोष्टी बघत असतो याला कारणीभूत घटक ही तसेच असतात . जसे आपल्या आजू बाजूचे वातावरण , आपली विचार क्षमता , आपली तार्किक क्षमता. संस्कार , शिकवण , अनुभव . प्रयत्नपूर्वक कमावलेले मानसिक स्थैर्य या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो आणि त्यातून आपण चांगलेच विचार करत असतो.
काही लोकांना इतरांच्या मध्ये कायमच चांगल्या गोष्टी दिसत असतात कारण की ते केवळ चांगल्या गोष्टींकडे च बघत असतात. आणि वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यांच्या cognitive process मध्ये , विचार करण्यात , बघण्याचा दृष्टीकोन यात सकारात्मक गोष्टी जास्त असतात. त्यांच्या magnifying glass मधुन किंवा त्यांच्या चष्म्यातून वाईट गोष्टी दुर्लक्षित करून minimize करून केवळ चांगल्या गोष्टींवर focus केला जातो.
आपल्या सर्वांना परिचित टाइल्स चे उदाहरण आहे. एका शानदार हॉटेल चे ओपनिंग होते. एका भिंतीवर सुंदर टाइल्स लावल्या असतात. पण त्यात एकच tile थोडी खराब असते. तिचा रंग उडला असतो आणि tile थोडी फुटलेली असते. हॉटेल मध्ये येणारे सगळे त्या रंग उडालेल्या आणि फुटलेल्या tile kade बघत असतात आणि हळहळत असतात .एव्हढे सुंदर हॉटेल आणि अशी का खराब tile .
एक व्यक्ती उशिरा येते, संपूर्ण हॉटेल बघते . जिथे tile लावलेल्या असतात तिथे येते. आणि ती फुटकी tile सोडून बाकी सगळ्या tile , design , रंग संगती बघते आणि कौतुक करते की किती छान पॅटर्न आहे. या टाइल्स मुळे ,वत्याच्या रंगसंगती मुळे अजूनच हॉटेल ची शोभा वाढली . आणि इतर ही interior designing खूप सुंदर झाले आहे हे बघते. बाकी लोकांस आश्चर्य वाटते की असे कसे काय बोलतो हा. त्याला दिसत नाही का ती फुटलेली tile.
आणि न राहवून ते लोक त्याला विचारतात ..हे कसे काय तुम्हाला आवडले. तेव्हा तो सकारात्मक, इतरांचे चांगले दिसणारा व्यक्ती म्हणतो तुम्ही पण सगळ्यांनी बघा खरेच किती सुंदर रंगसंगती , आणि टाइल्स ची रचना केली आहे. मी त्या एका खराब tile करिता एवढ्या सुंदर बाकीच्या टाइल्स ना , एव्हढे सुंदर interior designing केले आहे त्याकडे का दुर्लक्ष करू..त्या फुटक्या tile पेक्षा कैक पटीने या बाकी गोष्टी खूप सुंदर मांडल्या आहेत तिकडे बघितले त्यामुळे माझे लक्ष त्या फुटक्या tile वरच केंद्रित होवून राहू शकले नाही.इतर अनेक गोष्टी खूप सुंदर डिझाईन केल्या आहेतं .
तेव्हा इतर लोकांचे त्या हॉटेल मधील बाकी गोष्टींकडे लक्ष जाते . डिझायनिंग खूप सुंदर केले आहे, मांडणी छान केली आहे. याची जाणीव होते. आणि मग ते सगळे त्या सुंदर रचनेची बारकाईने पाहणी करतात. ती त्यांना आवडते ही.
तसे काही लोकांना वाईट गोष्टी कडे दुर्लक्ष करून सतत चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय असते. काही लोक सतत कोणा बद्दल तरी नावे ठेवत असतात. तो / ती अशीच आहे. दिसायला काळी आहे नकटी आहे. पण एखादा असे म्हणतो की तिचे डोळे टपोरे सुंदर काळेभोर आहेत. ओठ नाजूक आहेत. केस लांबसडक आणि सुंदर आहेत. तिच्या गालावरची खळी अजून जास्त सौंदर्य खुलविते. तिच्या काळया रंगात ही ती अतिशय स्मार्ट दिसते. असे एखादी व्यक्ती आवर्जून सांगते. कारण ती एकच गोष्ट focus करून त्यावर अडून बसत नाही. तर प्रत्येक गोष्ट कशी चांगली आहे हे बघते. तसा दृष्टिकोन त्या व्यक्तीचा लहानपणापासून तयार झालेला असतो.
व्यक्तीची ही व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता येण्याकरीता खूप मेहनत घेतलेली असते. अनुभव घेतलेले असतात. जडणघडण तशी झालेली असते. पुस्तके वाचन .मोठ्या लोकांची चरित्रे त्यांची प्रेरणा यातून स्वतः ला घडवीत असतात. स्वतः वरचा आत्मविश्वास तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या आहेत याचीच जाणीव करून देत असतात.
एका ऑफिस मध्ये receptionist ची जागा रिकामी असते. अर्थात तिचे काम काय ? तर फोन calls घेणे ..आणि योग्य ठिकाणी ते जोडून देणे. किंवा निरोप घेणे आणि देणे.
या पोस्ट करिता अनेक जणी अर्ज करतात..इंटरव्ह्यू सुरु असतात. एक फोन. येतो आणि त्या फोनवर गोड आवाजात ती स्त्री हॅलो म्हणून बॉस सोबत बोलायचे आहे अशी request करते. बॉस फोन घेतात तेव्हा ती अतिशय नम्रतेने बोलायला सुरुवात करते. आपले नाव सांगते. अनुभव सांगते. आणि काही कारणामुळे येण्यास उशीर होत आहे हे सांगते . तेव्हा बॉस तिचे ते गोड आणि नम्र बोलणे ऐकून हो ठीक आहे असे म्हणतात.
ती स्त्री परत थोड्या वेळाने फोन करून पोहचत आहे असे सांगते. वेळेत पोहचू शकली नाही म्हणून परत परत माफी मागते. तेव्हा ही तिच्या एका हॅलो या शब्दात गोडवा , आदर , आदब, नम्रता या बोलण्यातला गुणांमुळे मंत्र मुग्ध होतात. आणि ते त्या इंटरव्ह्यू ला येणाऱ्या स्त्री ची आतुरतेने वाट बघत असतात. ती येते तेव्हा परत बॉस ना येवून हॅलो , नमस्कार करून उशिरा येण्या विषयी दिलगिरी व्यक्त करते. माफी मागते. तिच्या बोलण्यात ली ताकद ,स्पष्ट उच्चार , मधुर बोलणे आणि आत्मविश्वास समोरच्याला जागीच खिळवून ठेवते. ती स्त्री म्हणते मला माहिती आहे की मी दिसायला काळी आहे . आणि माझ्या काळया रंगामुळे मला अनेक ठिकाणी reject केले जाते.
बाकी इंटरव्ह्यू formalities पूर्ण झाल्यावर बॉस तिला उद्या पासून ऑफिस जॉईन करा सांगतो. तिचा रंग , रूप या बरोबर त्याला काही फरक पडत नाही कारण त्याच्या receptionist पोस्ट करिता तिच्यात सगळे गुण , शिक्षण असते. आवाजातला गोडवा , दुसऱ्याला convience करण्याची क्षमता , समजून सांगण्याची पद्धती, नम्रता , respect या सगळ्या गुणांपुढे रंग हा गुण फिका पडतो. तिच्यातला चांगले गुण बॉस टिपतो. आणि तो हाच विचार करतो की तिचा आवाज फोनवर ऐकू जाणार आहे .तिचे रूप नाही. त्यामुळे तिच्या स्पष्ट , कणखर आवजच्या जादूने ती तिच्या जबाबदाऱ्या उत्कृष्ट रीतीने पार पाडेल याची खात्री असते . म्हणून तो तिचीच निवड करतो.
कसे आहे दुसऱ्याची पारख करताना अनेक अनुभव घेतलेली व्यक्ती अचूक पारख करते. वाईट गोष्टी वगळून चांगल्या गोष्टींकडे च लक्ष केंद्रित करत असते. आणि ज्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर आहे. अंतर्बाह्य ते स्वतः ला खूप चांगले ओळखून असतात. समजत असतात. तसेच दुसऱ्याला ही ते खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. त्यांना समजून घेवू शकतात .कारण त्यांच्या मधला emotional quotient जास्त असतो. त्यामुळे दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि प्रत्येक वेळी येणारे अनुभव त्यांना अजून सकारात्मक राहण्यास शिकवत असतात. Glass पाण्याने केवढा भरला असेच म्हणणार .. जेवढा वर रिकामा आहे त्याकडे लक्ष गेले तरी त्याला फारसे महत्व देणार नाही.
असेच असते आपल्या जवळच्या व्यक्ती , नाती यात ही काही वेळेस मतभेद होतात , वाद होतात , काही वेळेस अबोला ही येतो परंतु जो खूप सकारात्मक आहे तो त्या दुसऱ्या व्यक्ती मधले गुण च मांडत असतो. गुणांची कदर करत असतो. चांगुलपणा , मदत करण्याची वृत्ती, समजून घेण्याची वृत्ती , आपुलकी , प्रेम , काही खूप चांगले क्षण एकमेकांसोबत घालविले असतात ते क्षण , या गुणांना श्रेष्ठ समजत असतो आणि त्याच्यातल्या नकारात्मक गोष्टी दुर्लक्षित करून नाते टिकावे म्हणून परत परत प्रयत्न करत असतो. आणि केवळ चांगल्या गोष्टींकडे लक्ष देत असतो.
यातून त्या तडजोड करणाऱ्या व्यक्तीचे सुंदर व्यक्तिमत्त्व , दुसऱ्याच्या गुणांची कदर करण्याची वृत्ती तर दिसतेच. सकारात्मकता दिसते शिवाय व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता समजून येते.
आणि हे व्यक्तिमत्त्व सुंदर होण्याकरिता सततचे प्रयत्न , सातत्य , मेहनत , अनुभव , शिकण्याची जिद्द , वाचन , लेखन आणि मोठ्ठ्या लोकांसोबत चर्चा , वैचारिक प्रगल्भता हे कष्टाने कमविलेले गुण कारणीभूत असतात.
आयुष्यात परिपूर्ण असा कोणी नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फार कमी असते. काही ना काही उणीव प्रत्येकात असते. पण ती उणीव इतर गोष्टींनी भरून निघते. काढते. जसे हात नसलेली व्यक्ती पायाने सुंदर चित्र रेखटते.
इतरांच्या चुका सहज दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून ती संधी म्हणून त्यांना सुधरण्याकरीता chance आहे .तो अनुभव आहे असा विचार केला तर ती व्यक्ती ही चुका मधून शिकत असते अनुभव. घेवून योग्य किंवा बरोबर काय तसे वर्तनात बदल घडवित असते.
आयुष्य सुंदर आहे. इतरांच्या वाईट गोष्टी दुर्लक्षित करून त्यांना त्या सुधारण्याची संधी द्याच .पण त्यांच्यातल्या सतत चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दिसत असतील तर तुम्ही सुंदर व्यक्तिमत्व आहात.एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आहात. इतरांच्या मधल्या चांगल्या गोष्टी बघताना , शोधताना तुमच्या सुंदर व्यक्तिमत्त्वातली प्रगल्भता अजून वाढवा.
आयुष्य सुंदर आहे. सुंदर व्यक्तिमत्वाची जोड देवून अजून सुंदर बनवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


