Skip to content

तुम्हांला इतराचं सौंदर्य दिसणं, हे तरं तुमचंचं प्रतिबिंब.

तुम्हांला इतराचं सौंदर्य दिसणं, हे तरं तुमचंचं प्रतिबिंब.


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


सौंदर्य किती छान शब्द आहे….. नाही…..! म्हणायला ईतके छान वाटतं ना…. अनुभवल्यावर किती छान वाटत असेल… सौंदर्य किती प्रकारचे असते कुणाच्या विचारांचे सौंदर्य, कोणाच्या स्वभावाच सौंदर्य, दिसण्याचा सौंदर्य ,असे कितीतरी…..

मला वाटतं ही संपूर्ण निसर्ग सृष्टीचं सौंदर्याने परिपूर्ण भरलेली आहे….. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य लपलेलं असतं, आपण फक्त बघितले पाहिजे …..!

पाऊस पडून गेल्यावर शांत झालेल्या निसर्गाकडे बघितले , की आपल्या डोळ्यांना किती छान वाटते ……, पण त्या गार वाऱ्यामध्ये स्वतःला जणू त्या वार्‍यासोबत मिसळून मनमुराद त्याचा आनंद लुटतो…

तो गार वारा, गालावरून हळूच जाताना, आपल्या आयुष्यातला सगळा शीण विसरून आपल्या गालावर कधी खडी उमटते, आपल्यालाच कळत नाही , काही जणांना त्या पावसाचं येणं म्हणजे काय सगळीकडे घाणचं घाण असेही वाटू शकते…..,

आपल्या सर्वांच्या बाबतीत आपण सौंदर्य म्हटलं की आपल्या समोर एखाद्या सुंदर नायक/ नाईकेचा चेहरा डोळ्यासमोर येतो, किती ग बाई छान ….! म्हणून आपण त्यांचे कौतुक करतो, पण ती कृत्रिम पद्धत असते, कुणी -कुणी नॅचरलीचं ईतके सुंदर असतात,….
आपण लगेच म्हणतो किती छान दिसतो/ दिसते .

मुळात आपण सुद्धा खूप सुंदर असतो, आपण इतरांमध्ये तेचं बघतो, जे आपल्यात असतं, म्हणून तुम्हाला इतरांचे सुंदर दिसणं हे तर तुमचं प्रतिबिंब आहे…..!आपण पाण्यात बघितलं की आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, प्रत्येकात सौंदर्य लपलेलं असतं , कोणाच्या गोड स्वभावाचे असेल, एखादाला छान वाद्य वाजवता येत असेल , कुणाला गाणं म्हणता येत असेल, कुणाला छान लिहिता येत असेल, आणि हे सौंदर्य दिसणं हे तर तुमचं प्रतिबिंब असतं….

प्रतिबिंबाचं वेगळेपण माहिती का ? बघा जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो ,तर वा …! छान दिसतोय /दिसतेय मी ….!

असं म्हणून आपण कौतुक करतो, मनातल्या मनातच…. काही लोक खरं तर यालाही अपवाद असतीलं…,, कारण काही स्वतः लाही चांगलं म्हणत नाही, आणि इतरांनाही…..,

आपल्या अंतरंगात सौंदर्य असलं की तेचं आपल्याला आपल्या प्रतिबिंबात दिसतं, जी लोक स्वतःला चांगलं म्हणत नाही, ती इतरांना चांगलं म्हणूचं शकत नाही , कारण की त्यांना त्यांचचं प्रतिबिंब ईतरांमध्ये दिसणार,…..,

प्रतिबिंबाचं एक खास वैशिष्ट्य असतं, त्यामध्ये काहीच बदल केलेला नसतो , ते जसं असतं अगदी तसंचं दिसतं, नितळ स्वच्छ पारदर्शकता असते कमी शब्दात सांगायचं झालं तर, ते बनावटी नसतं ,ते जसं असतं ते तसचं दिसतं, जर तुम्हाला खरचं कुणीतरी चांगलं म्हणत असेल,
तर तुम्ही चांगले आहात असे नसून ती व्यक्ती चांगली आहे, कारण तुमच्यात चांगलं पाहण्याची वृत्ती त्याच्यांकडे आहे,

कधीतरी प्रयत्न करून बघा….!आपण आपल्या आजूबाजूला त्याच गोष्टी फॉलो करतो ज्या आपल्याला आवडतात, आपल्या आवडी मध्ये सुद्धा आपले सौंदर्य लपलेलं असतं…,

“” अगर चाहत हैं खुशबू की तो हर खिलता हुआ फुल गुलाब है….””!

काही जण रंगाने खूप सुंदर असतात, छान अशी सुंदर मुलगी पाहिल्यावर सर्वच म्हणू शकतात, वा….! खरच काय सौंदर्य आहे, पण म्हणून काही फक्त रंगाचं सौंदर्य असणं पुरेसं नसतं ….., काही लोक मनानेही तितकेचं सुंदर असतात ,जितके रंगाने…..

पण रंगाची सुंदरता भरपूर असेल, आणि एक माणूस म्हणून जरं आपल्याच मनातलं आपलं प्रतिबिंब खूप वाईट असेल, किंवा आपण सतत कोणाशी तरी स्वतःची तुलना करत असू, प्रत्येक वेळी फक्त दुसऱ्यांना दोष देत असू , तर आपल्याकडे गुणांची सौंदर्याता कमी आहे, असेच म्हणावे लागेल….

इथे प्रत्येकाला वाटतं मी खूप छान दिसावं… सुंदर दिसावं…. देवाने दिलेल्या आपल्या रूपाला आपण नाही बदलू शकत.

तुम्ही कितीही गोष्टी वापरा…. खरं सौंदर्य जसं आहे, तसंच राहतं, पण जे सौंदर्य आचरणात असतं, स्वभावात असतं , आपल्या वागण्या-बोलण्याच्या प्रत्येक गोष्टीत असतं, ते तर आपण नक्कीचं बदलू शकतो…..!

“” सौंदर्य फक्त चेहऱ्याचं कधीच नसतं “”

आपल्या जगण्याची पद्धत आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन याला सुद्धा आपल्या सौंदर्याची एक किनार नक्कीचं असते….

“”मत तराश यहाँ हर किसी को, अपनी जिंदगी देकर, हर शक्स साया हे तेरा, कोई फुल तो कोई कली बनकर……..”””

“”हर शक्स साया हैं तेरा,
तू मत बदल तेरा किरदार ,
बदलना ही हैं, तो बदल खुदको, मिल ही जाऐगा हर मंजिल और मुक्काम……!””


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!