तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे कसे ओळखावे?
टीम आपलं मानसशास्त्र
बरेचवेळा आपण भोळेपणाने आणि आपलेपणाने सगळ्या गोष्टी मोकळेपणाने सांगत असतो. पण समोरची व्यक्ती खरेच कशी आहे हे आपल्याला माहिती नसते. आपल्याला आलेल्या अनुभवावरून आपण आपले त्या व्यक्तीविषयी मत बनवत असतो. आणि त्यानुसार त्या व्यक्ती सोबत काही गोष्टी शेअर करत असतो. तिच्या काही गोष्टी समजून घेत असतो.बोलत असतो.
संवाद साधत असतो. काही मनातल्या गोष्टी असतील , काही अनुभव असतील तर आपल्या आयुष्यातल्या व्यक्ती आणि त्यांच्याविषयी माहिती देत असतो. ओळख करून देत असतो. तर काही वेळेस बिझनेस कसा करावा , आपले कॉन्टॅक्ट जाता जाता काही गोष्टी सहज बोलून जात असतो.
पण समोरची व्यक्ती आपल्या भोळेपणामधून सांगितलेल्या माहितीचा दुरुपयोग, चुकीचा वापर करून घेते का ? का त्याचा सदुपयोग करून घेते ? का काहीच नाही ..की आपण माहिती दिली , काही गोष्टी सांगितल्या तर त्या मनाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवणारे आहेत. हे आपल्याला सहज समजत नाही. अगदी खूप जवळची व्यक्ती असेल , चांगली मैत्री असेल, रोजच्या सहवासातील असेल तरी ही तिला आपण पूर्णपणे समजू शकत नाही.
पण तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे कसे ओळखावे?
नेहा : कुठे आहेस मीना ?
मीना : अग, शाळेच्या friends सोबत हॉटेल शिवसागर मध्ये आहे. डेक्कन.
नेहा : मी पण डेक्कनला आहे. मी पण येते.
मीना : विचार करू लागते , माझे friends शाळेतले तिला माहिती पण नाहीत मग कशी काय येते आहे ही ?
मीना : बरं ये. आतमध्ये बसलो आहे.
नेहा : ( दहा मिनिटांनंतर ) हाय !
मीना : हाय , हा माझा मित्र अभिजित , आणि हा सिद्धार्थ.
आणि ही माझी आधीची शाळेतली मैत्रीण नेहा. तरी ही अजून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. आणि मधली काही वर्ष थोडी दूर होतो आम्ही तिच्या बाबांची transfer दुसरीकडे झाली , नंतर तिचे लग्न होवून पुण्यात आली. पण मग मीही पुण्यात आले . त्यामुळे परत आमची मैत्री टिकून आहे. आणि तेव्हा तर फोन पण नव्हते मात्र पत्र मैत्री , सुट्टीत भेटी गाठी , एकमेकींकडे राहायला जाणे येणे होत असे. आणि आता तरी काय फोन , व्हॉटसॲप वर सहज available असतो.
नेहा : मीना तुझ्या या मित्रांचे number दे. आता ओळख झाली आहे. तर कधी बोलता येईल.
मीनाने काही आढे वेढे न घेता दोघांचे number दिले. अजून ही जेव्हा कधी भेटत तेव्हा इतर मित्रांचे ही number दिले.
नेहा चे दोन divorce झाले. पहिल्या नवऱ्यापासुन एक मुलगी आणि एक मुलगा . खूप लहान वयात घटस्फोट झाला. मुलांची सर्वस्वी जबाबदारी तिची. नवऱ्याने काहीच खर्च दिला ही नाही आणि नंतर काही संबंधही ठेवले नाहीत.
दहा बारा वर्षानंतर दुसरे लग्न केले पण तेही फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे ती खूप depression मध्ये आहे असे ती कायम मीनाला सांगत असे. तिला कोणी friends नाहीत असेही ती सांगत असे. म्हणून मीना तिला अधून मधून फोन करत असे. तिला भेटत असे. बाहेर जात असत दोघी. कधी मीनाचे मित्र मैत्रिणी भेटणार तेव्हा नेहा ला ही सोबत घेवून जात असे . मीना अगदी भोळेपणाने हा विचार करत असे की नेहाला थोडी कंपनी मिळेल , डिप्रेशन मधून बाहेर पडेल , तर कधी सगळ्यांच्या सोबत गप्पा , हास्य विनोद यात तिला तिच्या दुःखाचा विसर पडेल .
मीना चे हे अगदी खास मित्र आणि मैत्रिणी ज्यांचे रोज मेसेज , फोन येत. अभिजित आणि सिद्धार्थ तर अगदी खास . रोज फोन , मेसेज असणारच , दिवसभरात एकमेकांची जेवला का पासून काम आणि इतर अनेक गोष्टींवर चर्चा.
अभिजित मुंबई ला शिफ्ट झाला तरी खास भेटायला येत असे. केवळ तुला भेटायला आलो असे मीनाला एव्हढे पण म्हणे आता राहू दे बाकी सगळ्यांना भेटणे . तूही फोन करू नको next टाईम वेळ काढून येईन सगळ्यांना भेटायला.
पण जसे अभिजित आणि नेहा ची ओळख करून दिली तसे नेहाने आणि अभिजित ने ही मीना बरोबर बोलणे , मेसेज करणे , भेटणे कमी केले, ऑनलाईन असतील दोघे तरी मिनाचे मेसेज वाचायला ही दोघांना वेळ नसे. मीना खूप वेळा विचारत पण होती नेहा ला का ग अभिजित बरोबर एव्हढा वेळ काय बोलते. मझ्या मेसेज ला reply करायला वेळ नसतो तुला.. तेव्हा नेहा स्पष्ट म्हणाली मी कोणाशी बोलावे , कोणाशी chat करते हा माझा विषय आहे . इतरांनी कोणी त्यात पडू नये. त्यानंतर मात्र मीना त्यात पडली नाही.
पण जेव्हा नेहा आणि अभि हे अभिजित चे अभि मध्ये झालेले रूपांतर. त्यातून पुढे निर्माण झालेली भावनिक आणि शारीरिक जवळीक .त्या दोघात काही तरी खटकले तेव्हा मात्र नेहा ने सगळे chat , त्यांचं बोलणे , भेटणे , बाहेर जाणे हे सगळे सांगितले आणि आता रोज अभि बद्दल विचारपूस करू लागली. रोज नेहाला good morning मेसेज , रोज फोन करू लागली. भेटू लागली. कारण काय तर भोळी मीना नेहाला अभि विषयी माहिती सांगेल , त्यांच्यात समेट घडवेल ही अपेक्षा.
तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे कसे ओळखावे?
१. व्यक्ती तुमच्या सोबत बोलणे टाळते. मेसेज करणे टाळते , भेटणे टाळते.
जेव्हा तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातो तेव्हा ती व्यक्ती तुमच्या सोबत बोलणे व, मेसेज करणे , भेटणे ही टाळत असते.
याचे एक तर कारण ती व्यक्ती तुमच्या माहितीचा गैरवापर करत असते, तुमच्या लोकांशी तुमच्या नकळत बोलत असते. भेटत असते. काही व्यवहार करत असते. जे तुमच्या पासून लपून छपून करत असते म्हणून ही टाळत असते तुम्हाला .
तर तुमच्या source चे वापर करून स्वतः प्रगती करण्याच्या प्रयत्नात , तर तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न असतो.
तर कधी तुमचे जवळचे लोक , मित्र मैत्रिणी यांच्या सोबत बोलण्यात , भेटण्यात इतके बिझी असतात की तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ ही नसतो.
२. एकदा माहिती मिळाली , कॉन्टॅक्ट मिळाले किंवा व्यवहाराची गुपिते समजली की तुमचे महत्व राहत नाही.
केवळ तुमच्याकडून माहिती मिळविणे , इतरांच्या ओळखी करून घेणे , मैत्री वाढविणे , व्यवसाय वाढविणे याकरिता तुम्ही एक stepping stone असता. त्यानंतर तुमची गरज नसते. वागणे बदलते.
जसे गरज सरो वैद्य मरो.
३. आवड , सवड आणि सोयीनुसार भेटणे , बोलणे , मेसेज करणे , फोन करणे :
जसे तुमच्या भोळेपणानी तुम्ही माहिती दिली , किंवा काही गोष्टी माहिती नसतील तर त्या विचारल्या , तरी त्यांच्या वेळे नुसार , सवडीनुसार , सोयीनुसार ते बोलणार ,माहिती सांगणार किंवा तुमच्याकडून आधी मिळालेल्या माहिती , कॉन्टॅक्ट व्यतिरिक्त अजून काही महत्वाची माहिती पाहिजे असेल तरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार.
४. काही वेळेस खूप स्पष्ट आणि परखडपणे टाळणे किंवा बोलणे : –
आपणच दिलेल्या माहिती संदर्भात , व्यक्तींच्या संदर्भात जरी आपण काही विचारले तरी अतिशय परखडपणे ते काही सांगणे टाळतात. जसे एखाद्या मित्राची ओळख करून दिल्यावर काय बोलणे झाले असे जरी विचारले किंवा business मध्ये एखादा reference दिला तरी उत्सुकता असते पुढे काय झाले म्हणून विचारले तरी हे चुकी चा वापर करणारी व्यक्ती खूप स्पष्टपणे उत्तर देते की , मी कोणाशी काय बोलावे ,कोणाला भेटावे , काय विचारावे याच्याशी इतर कोणाला ही त्याच्याशी काही कर्तव्य नसावे. मी काय करायचे , कोणाला भेटायचे , कुठे , काय बोलायचे हे माझे मी बघून घेईन .
असे म्हणल्यावर , तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे त्यांच्या भाषेवरून लगेच समजते. , जसे काही आपल्याच वरती अरेरावी ची ही भाषा असते.
५. बरेचदा भोळ्या व्यक्तीच्या वागण्याचा गैर फायदा घेतला जातो. मनमोकळेपणे बोलणे , अगदी अनुभवी असलेला ऑफिस मधला भोळा मित्र दुसरा मित्र त्याला आपले घरगुती प्रॉब्लेम्स सांगून लवकर जातो आणि स्वतः चे काम मात्र त्याच्यावर सोपवून वेळेत पूर्ण करण्यास सांगतो. असे नेहमीच घडू लागते. तेव्हा लक्षात येते की घरगुती urgent काम काही ही नाही पण हा बाहेर फिरायला जाणे , मित्र मैत्रिणी यांच्या सोबत सतत बाहेर जाणे करतो तेव्हा आपल्या भोळेपणा आणि चांगुलपणाचा चुकीचा वापर आपला मित्र करतो आहे हे लक्षात येते. कामतर कधी वडीलधाऱ्या मंडळींचा मान म्हणून खूप सौम्य भाषेत बोलले जाते .
उदाहरण : घरात नुकतेच लग्न होवून आलेली धाकटी सून सुरुवातीलाच घरात सगळ्यांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करते, तिला स्वैपाक करण्याची आवड आहे हे सांगून अगदी नवीन असताना ही ती स्वतः छान छान पदार्थ करते. तेव्हा तिने इतरांची मने जिंकण्याकरिता केलेला स्वैपाक आणि त्याची आवड हे अगदी भोलेपणाने सांगितल्यावर घरातल्या लोकांनी कामाची बाई , स्वैपाक करणारी बाई काढून टाकली.
आणि मग मात्र सगळी जबाबदारी या धाकट्या सूनेवर सोपविली. म्हणजे तिने भोळेपणा ने सांगितले आणि स्वैपाक केला म्हणून तिच्या या आवडीचा , तिने सगळ्यांना खुश करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचा इतर कुटुंबीयांनी चुकीचा वापर केला की , कारण तिला आवडते तर एखादा पदार्थ तिच्या आवडीचा करू देणे वेगळे पण बाई काढून कायमच तिने स्वैपाकघरात काम करत राहणे म्हणजे तिने सांगितलेल्या आवडी ची ढाल करून तिला कायमच स्वैपाकघरात अडकवून टाकणे म्हणजे तिच्या आवडीचा , घरातल्या माणसांना जपण्याच्या स्वभावाचा चुकीचा वापर केला जातो आहे असेच म्हणावे लागेल.
६. भोळ्या व्यक्तीचे नुकसान , मग आर्थिक असेल , मालमत्ता असेल, भावनिक असेल , नात्या विषयी : भोळ्या व्यक्तीने निरागसतेने आपल्या काही महत्वाच्या माहिती सांगितल्या तर समोरची व्यक्ती गुपचूप त्याचे नुकसान करते . जसे आर्थिक साठा कुठे लपवून ठेवला असेल , दागदागिने तरी ते गुपचूप तिकडून घेवून त्याचा वापर स्वतः करिता करणे आणि हे हळूहळू लक्षात येणे. कारण समोरच्या व्यक्तीवर दृढ विश्वास असतो. पण रोज काही आर्थिक घट येणे ..पैसे दागिने गायब यातून लक्षात येते . आणि तेव्हा मात्र बरेचवेळा आपलीच लोक चुकीचा वापर करून घेत आहेत असेही लक्षात येते.
७. काही वेळेस भोळी व्यक्ती तिचे विक पॉइंट सांगते तेव्हा त्याचा फायदा घेवून त्याच पॉइंट ची भीती घालणारे आपले लोक जेव्हा वारंवार ते करू लागतात तेव्हा ते मानसिकदृष्ट्या डाऊन करतात. आपला भोलेपणाचा चुकीचे वापर करून घेत असतात. आपल्याला emotionaly सेन्सिटिव्ह करतात.
तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे कसे ओळखावे?
तुमच्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातोय, हे कसे ओळखावे? तर सुरुवातीला भोळी व्यक्ती आपलेपणाने बऱ्याच गोष्टी करत असते. पण जसजसे वारंवार अनुभव येत जातात तसे हळूहळू त्यांच्या लक्षात येते की, आपल्या भोळेपणाचा इतर व्यक्तींकडून चुकीचा वापर केला जातो आहे. आणि मग ती भोळी व्यक्ती थोडी सावध राहण्याचा प्रयत्न करते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अशी माणसं या विश्वामध्ये खूपच आहेत उदाहरण सांगायचे झाल्यास एखादा भेटला व आपल्याला तसे करायला लागला तर आपण ओळखून तुरंत त्या व्यक्तीला नंबर व आपल्याबद्दल माहिती सांगण्यास टाळावे व तेही त्या व्यक्तीबरोबर थोडावेळ थांबून आता मी इथे थोडावेळ का म्हणालो तर ती व्यक्ती आपल्याशी ज्यावेळेस बोलते नाही का आणि अधूनमधून काही प्रश्न विचारते तर त्याच्यामध्ये वेळ जातोच नाही का त्यामुळे मी थोडावेळ म्हणालो तसा जातच असतो ना थोडावेळ तर तसा सहजासहजी विश्वास लगेचच बाहेरच्या माणसांवर ठेवणं हे योग्य नाही असे मला वाटते आणि वास्तविकता हे आहेच आणि अगदी खरी गोष्ट आहे सहजासहजी लगेच असा विश्वास नाही ठेवायला हवं खरतर कारण लोकं कधी काय करतील ह्याची शास्वती नाही