तुमच्या कॉन्फिडन्सला कोणीही धक्का पोहोचू शकणार नाही, इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व बनवा.
सोनाली जे
व्यक्तिमत्त्व हा तुमचा आरसा आहे , ज्यात तुमचे अंतर्गत आणि बाह्य व्यक्तिमत्त्व display होत असते.
” दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते .” अशी म्हण तर सर्वांना माहिती आहेच.
बहुतांशी जग हे बाह्य व्यक्तिमत्त्वावर फिदा असते.
मग बरेचदा सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जाते.
म्हणूनच आधी अंतर्गत व्यक्तिमत्त्व आणि नंतर बाह्य व्यक्तिमत्त्व रुबाबदार बनवा म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्सला कोणीही धक्का पोहोचू शकणार नाही.
व्यक्तिमत्त्व यातला मुख्य घटक विचार आणि विचारांची प्रगल्भता , तारतम्य मग ते बोलण्यातले असो अथवा वागण्यातले असो अथवा विचारात ले असो.
तुमच्यातला आत्मविश्वास कधी वाढत जातो असे तुम्हाला वाटते ?
जेव्हा तुम्ही, विविध क्षेत्रातील भरपूर ज्ञान संपादन करता. काळा नुसार नवनवीन स्किल शिकता , develop करता , ते कुठे कसे वापरायचे ही टॅक्ट जमते. कामाचा अनुभव असेल , लोकांशी संवाद साधण्याचा असेल , लोकांकडून काम करून घेण्याचा confidence असेल , किंवा एखादी गोष्ट शिकविण्याचा कॉन्फिडन्स असेल. किंवा येत नसेल एखादी गोष्ट तर ती येत नाही पण शिकण्याचा कॉन्फिडन्स असेल . किंवा ती कबूल करण्याचा कॉन्फिडन्स.
तुमचे बोलणे समोरच्याला ऐकत रहावेसे वाटेल आणि तुम्ही शांत असाल तेव्हा कधी बोलणे सुरू कराल याची वाट इतर बघत असतील तर तुमच्या विचारातून , बोलण्यातून तुमचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते.
तुम्ही कसे ही रहा. मग तुमचे कपडे कसेही असोत. किंवा साधे राहणीमान असो. पण तुमच्या कॉन्फिडन्सला कोणीही धक्का पोहोचू शकणार नाही, इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व बनवा.
तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तर स्वतः भोवती एक ऑरा तयार होतो. त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात.
कालच स्वामी विवेकानंद जयंती झाली. स्वामीजी सन्यासी होते ते जेव्हा शिकागो ला गेले तेव्हा त्यांच्याकडे काय होते ? इतर लोकांच्या सारखे कपडे , सूट बूट नव्हते. पण त्यांच्याकडे असणारे सखोल ज्ञान आणि त्यातून मिळालेला दुर्दम्य आत्मविश्वास . त्यातून त्यांनी बाह्य जगावरती विजय मिळवून स्वतः चे रुबाबदार व्यक्तिमत्त्व जगावर ठसविले. नुसता सूट बुट आणि चांगला पेहराव केला म्हणजेच त्याचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते असे नाही तर , मनाची तरलता , स्वतः मधला कॉन्फिडन्स आणि मनाचे पारदर्शकत्व /transperancy त्या माणसाचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार बनवत असते.
बुद्धीच्या जोरावर संपन्न रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला कोणी ही कधी हि धक्का लावू शकत नाही. किंवा असा धक्का लावण्याचे मनात ही येवू शकत नाही आणि नकळत त्याच्या बौध्दीक स्वामित्वा पुढे सगळेच नतमस्तक होतात.
आयुष्य सुंदर आहे. भरपूर बौध्दीक विकास करा , वाचन करा , विविध देश फिरा , बघा , लोकांना भेटा. भरपूर अनुभव घ्या म्हणजे तुम्ही विचाराने प्रगल्भ व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास दृढ होईल . इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व बनेल की तुमच्या कॉन्फिडन्सला कोणीही धक्का पोहोचवू शकणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
