तुमच्या उदास मनाला पुन्हा उभारी द्यायची असेल तर हा लेख नक्की वाचा.
प्रीती लांडगे
तुमच्या उदास मनाला पुन्हा उभारी द्याची असेल तर आधी तुम्हाला तुमच्या शब्दाकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. तुम्ही स्वतःशी काय बोलता स्वतःच्या मनाला काय शब्दाचे भोजन देतात हे फार महत्त्वाचे असते यावरच तुमचा आनंद आणि उदासपणा किंवा दुखी भावना हे भाव निर्माण होत असतात. जसे तुम्हाला पंचपकवान आवडते तसेच मनालाही उत्तम शब्दाचे पंचपकवान आवश्यक असते. रोज सकारात्मक भोजन देणे गरजेचे असते ते देत राहयचे.
बाहेर लोक बोलणार कोणी चांगले बोलणार, कोणी वाईट बोलणा हे आता धरुन चाला पण आपण त्याचा परिणाम आपल्या वरती किती होऊ द्यायचा हे आपण ठरवायचे बाहेरचे घरातील सतत बोलत असता कधी वाईट कधी चांगले त्यावेळी काय करणार एक लक्षात ठेवा परिवार आहे तर वार होणार आणि ते आपल्याला शब्दाने घायाळ करणार आणि आपण ही कोणाला तरी शब्दांंने घायाळ करतोच की, हे सगळे भाव आपल्या सुख दुखाला कारणीभूत ठरत असता हे आपल्या उदास आणि आनंदी होण्याची करणे आहे. कोणी काही बोलले,कोणी ओरडले काही चुकीचे बोले तर आपण दुखी होतो आणि उदास होतो म्हणून शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात अस मला वाटते.
म्हणून मी म्हणत आहे शब्दाकडे लक्ष द्या. आणि मनाला उभारी देण्यासाठी तुमचे छंद जोपासा आणि गोष्टी सोडून द्यायला शिका मनात काही धरून ठेऊ नका कारण तुम्ही तुमचा आधीचा श्वास सोडल्या शिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही. हा साधा नियम आहे. तुम्ही दुखाची भावना सोडून दिल्याशिवाय आनंदची भावना कशी येणार,म्हणून नेहमी सकाळी उठल्यावर मी आनंदी आहे,मी हेलदी आहे, मी शक्तीशाली आहे तसचे माझे प्रत्येकांशी हेलदी नाते आहे.
है दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना करुन बघा आणि अनुभव घ्या. आणि हे तुमचे तुम्हालाच करावे लागणार दुसरे कोणीही करून हा अनुभव घेता येणार नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते हेच. मेल्यावर स्वर्ग दिसतो की नाही माहिती नाही परंतु तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्या आजुबाजुला स्वर्ग किंवा स्वर्गीय वातावरण नक्की निर्माण करु शकता. निदान तुमच्या मनात तरी तुमचा शब्दाने स्वर्ग निर्माण करु शकता तुम्ही ठरवले तर.
म्हणून जेव्हा जेव्हा उदास वाटते तेव्हा तेव्हा शब्दाशी आणि तुमच्या मनाशी मैत्री करा. आणि तुमच्या उदास मनाला झकास करा पदोपदी खाली पडाल तुमचे पाय खचले जातील परंतु तरीही तुम्ही हिमतीने उभे रहा. खचून जाऊ नका सगळ्या महिला वर्गाला तर आवर्जून सांगावेसे वाटते की तुम्हाला उदास वाटले की स्वंयपाक घरात जाऊन तुमच्या आवडीचा पदार्थ करा तिथे जी साहित्य असतील त्याच्याशी गप्पा मारा खूप छान वाटेल. तुमचे दुखणे जाऊन तुम्हाला खूप हालके आणि आनंदी वाटेल हे करून बघा कार आपले स्वंयपाक घराशी खूप वेगळे नाते जोडलेले आहे. म्हणून ती गेले की आपल्याला हल्लके वाटते छान वाटते. आणि तुमचे षडरिपू चवीपुरते किंवा चवीनुसार वापरा सतत रागात द्वेषात राहू नका.
आपण वाटीभर लोणचे खाऊ शकतो का तर नाही चवीपुरते घेतो तसेच गरजेचे असेल तेव्हाच चिडा,रागवा नाही तर गरज नाही त्याची लगेच शांत व्हा. सर्वच काही मनासारखे न होत नाही. स्वीकार करायला शिका प्रत्येक परिस्थितीचा आणि व्यक्तीचा की सगळे ठिक होते. आणि ECG कधी एका लाईन मध्ये असतो का तर नाही तो वर खालीच असतो आणि म्हणूनच आपण जीवंत असतो एका लाईन मध्ये आला तर मृत्यू असतो तो. म्हणून हा चढ उतार ही आवश्यक आहे. तुम्ही उदास झाला तर कशामुळे झाला हे शोधा नक्की स्वतः च्या आत मध्ये काय होते आहे ते शोधा आणि त्या वरती काम करून ते करण शोधून पुन्हा अस व्हायला नको ते बघा किंवा जरी झाले तरी मी फार काळ उदास राहाणार नाही ते बघा.
किंवा जरी राग आला तरी 10 /5 मी. शांत व्हा. त्यासाठी उलटे आकडे मोजा किंवा दिर्घ श्वास घ्या. नाही एखाद्या व्यक्तीशी पटत तर त्याच्यापासून थोडे दूर रहा फार वाद घालत नका बसू त्याच्या सोबत आणि हो तुम्ही जेव्हा जेव्हा उदास होणार तेव्हा एक नवीन आस निर्माण होते ती आस जीवंत ठेऊन तुमच्या ध्यासाच्या दिशेने वाटचाल करा.
होऊ नको उदास तुझ्यातच आहे, काहीतरी खास त्याचा तू शोध घे आणि गगनात उंच भरारी घे जीवन छोटेसे आहे तुझी स्वप्ने मोठी होऊ दे, उदास होण्यास वेळ नाही आणि निराशेला तर जागाच नाही.
आणि हो तुम्हाला जेव्हा खूप उदास वाटत असेल, मन बैचेन असेल खूप निगेटिव्ह भाव उमटत असतील आणि तुम्हाला हज कसे कमी करावे कळत नसेल तर सरळ बाहेर मोकळ्या हवेत येऊन संध्याकाळच्या वेळी किंवा अगदी सकाळी मोकळ्या स्वच्छ आकाशाकडे बघावे आणि त्या आकाशाला विनंती करावी की माझ्यातील ही नकारात्मक ऊर्जा खेचून घे. किंवा अशीच विनंती तुम्ही धरणी मातेला ही विनंती करु शकता आणि मनातील सर्व नकारात्मक भाव धरणीला वा आकाशाला समर्पित करुन टाका अस का करायचे तर ग्लास भर पाण्यात शाई मिसळी तर पाणी काळे होईल.
परंतु हेच तुम्ही समुद्रात शाई टाकली तर ती पाण्यात मिक्स होऊन जाईल काळा रंग दिसणार ही नाही तुमची समस्या गायब तसेच जमीन आणि आकाश तत्व आहे अगदी विशाल आणि मोठे म्हणून त्यांना सर्व चुकीचे भाव अर्पण करुन टाकायचे. आणि हलके होऊन जायचे. प्रसन्न व्हायचे आणि पुन्हा पुन्हा तुमच्या मनाला उभारी द्याची.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप ऊदास वाटत होत हा लेख वाचला खुप खुप छान वाटलं
👌🙏
Very Nice
Khup chan vatal vachun maz agdi asch zal ahe tumchya ya lekh mule mi aj khup happy ahe
It’s excellent….
I feel full energetic
Khrch khupch chan….
Very nice 👍🏽👍🏽
Mast khup chaan vatla vachun
उत्कृष्ट लेख 👍👍
Khup chan
Khup cchan
Apratim khupch preranadai…,🙏🏻
🙏👍🏼Very nice
छान