तुमच्यातली शांतता भंग पावली असल्यास अशा ठिकाणी जा!
सोनाली जे
तुमच्यातली शांतता भंग पावते म्हणजे काय होते बरे ? एखादी मनाविरुद्ध घडलेली घटना त्रासदायक ठरते. दुसऱ्याच कोणाच्या वर्तनाचा त्रास होतो म्हणून त्यावर प्रतिक्रिया म्हणजे राग येतो. एखाद्या गोष्टीत यश आले नाही तर मन निराश होते. Relationship, नाती या मध्ये काही कारणाने संबंध बिघडले तर येणारी उदासीनता, नकारात्मकता.
यात सगळ्यात विचार केला तर आपल्या अपेक्षेपेक्षा कोणती वेगळी गोष्ट घडली, इतरांचे वर्तन आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडले, अपयश आले म्हणजे एक तर आपल्यात काही तरी उणिवा आहेत..स्किल कमी आहेत.. knowledge किंवा विचार क्षमता कमी आहे.त्यामुळे अपयश येते. नाते संबंध बिघडतात कारण समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही .आपण त्याला समजून घेत नाही.तो असाच वागला तसाच वागला , त्याने असेच केले ..म्हणजे काय तुमच्या मनाविरुद्ध वागला.
थोडक्यात तुमच्या मनातील शांतता अशा आणि अनेक कारणांनी बिघडत असते. अशावेळी दोन ठिकाणे आहेत यातून बाहेर पडण्याचे.
१. तात्पुरते ठिकाण
जसे आपण चिडलो , उदास झालो , अपयश आले , नात्यात बिघाड तर आपण पटकन शांत होण्याकरिता उपाय करावेत जरूर पण ते तात्पुरते मार्ग आहेत हे लक्षात घ्यावे.
जसे राग आला, चिडचिड झाली तर तो शांत करण्याकरिता आवडते संगीत ऐका music therapy , movie बघा, बाहेर फिरायला जा, long drive ला जा, मित्र मैत्रीणीना भेटायला जा. Motivationl व्हिडिओज बघा. आवडते खेळ खेळा , छंद जपा. पण हे solution तात्पुरते झाले.
२. कायमस्वरूपी ठिकाण
वरचे temporary मार्ग तर अवलंबून बघाच , त्यातून पटकन आपल्या विचारातून बाहेर पडायला फास्ट आणि सोपे मार्ग आहेत.
पण तुमच्यातली शांतता भंग झाली असल्यास काही permananet किंवा long term मार्ग काढले पाहिजेत ना !!
त्याकरिता तुम्ही तुमच्याच मनाच्या कप्प्याची कवाडे हळूहळू उघडा..त्या मनात खोल शिरण्याचा प्रयत्न करा. मनात असंख्य कप्पे आहेत आणि त्या प्रत्येक कप्प्यात खोल काही तरी दडलेले आहे.. आत्मपरीक्षण करा.. त्या प्रत्येक कप्प्यात लपलेले राग , द्वेष , तिरस्कार , अपयश , नात्यात बिघाड या प्रत्येक गोष्टीची कारणे तपासून बघा, शोधून बघा , पूर्णपणे सारासार विचार करा. बारकाईने विचार करा.आत्मपरीक्षण करा. या सगळ्याचे कारण तुम्हाला तुमच्यातच आहे हेच जाणवेल..तुमची अपेक्षा , तुमची कमतरता, उणीव. या सगळ्याची उत्तरे मिळतील.
माझा एक मित्र होता तो कॉम्प्युटर इंजिनियर होता . एकदा त्याला भेटायला गेले तेव्हा तो कॉम्प्युटर वर काही तरी करत होता मी विचारले काय करतो आहेस , तर तो म्हणाला नको असलेल्या गोष्टी delete करतो आहे , मग मी थोडे लक्षपूर्वक बघू लागले..त्याने ज्या फाईल्स, folders नको होते त्या गोष्टी , खूप जुन्या गोष्टी काम करून झालेल्या ज्याची परत कधी गरज पडणार नाही. अशा गोष्टी सगळे delete केले, त्यानंतर ते recycle बिन मधून पण कायमचे काढून टाकले. कॉम्प्युटर स्कॅन करिता लावले. आणि मग परत कॉम्प्युटर restart केला.तेव्हा लक्षात आले की किती शांतपणे आणि सहज याने कॉम्प्युटर मध्ये नको असलेल्या गोष्टी कायमच्या काढून टाकल्या आणि नवीन गोष्टीं करिता कॉम्प्युटर मध्ये जागा निर्माण केली.
हातात पाण्याने भरलेला एक ग्लास बराच वेळ धरून ठेवला. तर त्या glass चे ओझे विनाकारण धरून हात अवघडतो , दुखायला लागतो..तो हातातला ग्लास टेबलवर खाली ठेवला की हायसे होते. असच आपल्या मनाचे ही आहे ..काही गोष्टी उगीचच कळत नकळत मनात धरून ठेवून असतो आपण , तो किंवा तिने असेच केले , ते माझ्याशी असेच वागले , प्लॅन करताना मला विचारलेच नाही, मला सांगितलेच नाही, ते मनावरचे ओझे आपण उगीच पेलत असतो..वेळच्यावेळी त्या गोष्टी मनाच्या कप्प्यातून बाहेर काढून टाकल्या तर हे मनाचे ओझे नक्कीच कमी होईल ना!!
एक मुलगा उत्साहाने धावत पळत येतो आणि बाबा , बाबा मला तुम्हाला हे सांगायचे आहे म्हणून बाबांना शोधत येतो एक दोन वेळा तो बाबांना हाक मारून बाबा , बाबा आज की नाही , अशी गमंत झाली माहिती का ? असे म्हणून बघतो तर त्याच्या बाबांचे पूर्ण लक्ष त्यांची गाडी जी नवीन कार आहे ती पुसण्या मध्ये असते.. बाबांचे आपल्या बोलण्याकडे लक्ष च नाही हे बघून त्याला गाडीचा राग येतो कारण बाबा पूर्ण लक्ष गाडीवर केंद्रित करून असतात. मग तो मुलगा हळूच मागच्या बाजूला , साईड ला गाडीवर चाकूने स्क्रॅच मारतो..
बाबांचे लक्ष पुढची बाजू पुसून झाल्यावर जेव्हा मागे आणि बाजूला जाते तेव्हा ते गाडीवर उठवलेले स्क्रॅच बघून त्यांना खूप खूप वाईट वाटते.. तिथे शेजारी त्यांचा मुलगा खाली मान घालून उभा असतो. बाबा त्याला विचारतात तू असे का केलेस ? तो म्हणतो मी तुमच्याशी बोलत होतो आणि तुमचे लक्ष नव्हते , तुम्ही गाडी पुसण्यात मग्न होता मग मला गाडीचा राग आला म्हणून मी असे केले..त्यावर मुलाला वाटले आता बाबा आपल्याला मारणार , चिडतील .बाबा शांत होते..त्यांनी काही खिळे आतून आणले आणि एक हातोडी.
ते आपल्या मुलाच्या हातात दिले आणि त्याला सांगितले तुला जेव्हा राग येईल तेव्हा यातले खिळे या समोरच्या भिंतीवर मारायचे.. ठोकायचे.. काही दिवसांनी ते सगळे खिळे संपून जातात..मग काय करायचे असा प्रश्न पडतो मुलाला तेव्हा बाबा म्हणतात आता राग आला परत तर जे खिळे भिंतीत ठोकले आहेत ते एकेक करून काढायचे. जेव्हा सगळे खिळे काढून होतात तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणतात बाळा आता बघ , तुला राग आला तर तू या भिंतीवर खिळे ठोकले ते परत काढले यात भिंतीवर मात्र खिळे ठोकल्याचे कायमचे वण राहिले म्हणजे काय तर तिथे भोकं पडली आहेत म्हणजे भिंतीला किती त्रास झाला असेल विचार कर प्रत्येक खिळा ठोकताना आणि तो काढताना, आणि आपल्या रागामुळे या भिंतीवर कायमच्या खुणा राहिल्या.
..तसेच आहे आपला राग , द्वेष , तिरस्कार , इतरांचे खटकणारे वागणे , काही अवास्तव अपेक्षा , तर कधी घडून गेलेला भूतकाळ असेल, तर कधी नात्यात बिघाड असेल या सगळ्याचा परिणाम आपल्या या मनातल्या बंद कप्प्यातल्या भिंतीवर त्या टोकदार खिळ्यासारखा कायमस्वरूपी खुणा सोडत असतो..आणि या प्रत्येक गोष्टीने एक कायमचा घाव मनाला देत असतो.
म्हणूनच मनाचा मोठा कप्पा आणि त्यातले छोटे छोटे इतर कप्पे जे आहेत ते आठवड्यातून साफ करायचे असे ठरवून टाका , त्या मनाच्या कप्प्यातून अनुभवातून आलेली निराशा , नात्यात आलेले बिघाड, इतरांच्या बद्दल नकारात्मक विचार , किंवा इतरांकडून आपण केलेल्या अपेक्षा , अपयश , दुसरे माझ्याशी असे वागले , बोलले, त्यांनी असे केले , तसे केले , मित्र मैत्रिणी नी दुर्लक्ष केले, नात्यात वाद आले , संवाद संपले , या आणि अनेक नकारात्मक गोष्टी , निराशा , औदासीन्य , इतरांकडून अपेक्षा या सगळ्या गोष्टी या मनातल्या कप्प्यातून काढून टाका, delete करा कायमच्या .
आणि त्यात नवीन सकारात्मक गोष्टी भरा, प्रेरणादायी गोष्टी भरा, आशावाद भरा, नाविन्यता भरा, भूतकाळ काढून त्यात वर्तमानाचा आनंद भरा, वास्तवता स्वीकारा , आणि इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपली स्वप्ने आपण पूर्ण करा त्याकरिता आपल्यातल्या क्षमता ओळखा त्या वाढवा , उणिवा असतील तर त्या प्रयत्नपूर्वक दूर करून सकारात्मक प्रयत्न करा.
मनाला ही आपला खास दोस्त बनवावे लागते.त्याची काळजी घ्यावी लागते. निरोगी ठेवावे लागते. सुदृढ ठेवावे लागते. जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तशीच किंबहुना जास्त च मनाची काळजी घ्यावी लागते . योगा , मेडिटेशन, प्राणायाम, व्यायाम करा यातून मन आणि शरीर दोन्ही ही ताजेतवाने राहते. तसेच motivational videos बघा पण त्यातून प्रेरणा घ्या.आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरिता त्याचा वापर करा..
जेव्हा कॉम्प्युटर सारखे तुमचे मन नको असलेल्या गोष्टी कायमच्या delete करेल आणि रिस्टार्ट करून नवीन गोष्टी करिता मनात जागा करेल .तेव्हा तुम्हाला आतून ही उत्साह वाटेल , मन नवीन गोष्टीत गुंतून राहील त्यामुळे तुमच्यातली शांतता भंग पावली असल्यास मनाच्या खोल कप्प्यात जा, अशा ठिकाणी जा जिथून तुम्ही मनातले सगळे गोंधळ , भरकटलेले विचार , अवास्तव अपेक्षा , निराशा , उदासीनता, विनाकारण नसलेल्या गोष्टींची चिंता म्हणजे उद्याची चिंता , ताण , तणाव सगळे काढून टाकून .झटकून टाकून , पुसून स्वच्छ .कोऱ्या करकरीत पाटी सारखी मनाची पाटी कोरी कराल तर मनात एक नवीन प्लॅनर किंवा ध्येय याचा नवीन फोल्डर कराल तर मनातली ती शांतता नवीन गोष्टीतून जसे सकारात्मकता, वास्तवाचा स्वीकार, यश मिळविण्याकरिता सकारात्मक विचार, योजना, ध्येय आखणी, आणि मनाचे ओझे हलके झाल्याचा आनंद आणि आपला आनंद आणि शांतता याला दुसरे नाही आपणच स्वतः कारणीभूत आहोत याची जाणीव झाली की मनाच्या या कप्प्यात सगळ्या मानसिक त्रासापासून सुटका होवून शांतता आणि सुखाचा परमोच्च बिंदू गाठता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



तुमचा हा लेख माझ्या आजच्या परिस्तीतिशी एकदम मिळता जुळता आहे…खरंच माझे मन शांत करण्यासाठी मला खूप मोठा नाही पण एक मार्ग सापडला तुमच्या या लेखामुळे.
धन्यवाद.
Madam very very nice