Skip to content

तुमची ठरलेली कामे मनापासून करा.. ते तुम्हाला विलक्षण आनंद देतील.

तुमची ठरलेली कामे मनापासून करा.. ते तुम्हाला विलक्षण आनंद देतील.


सौ. मिनल वरपे


कोणतेही काम अगदी व्यवस्थित केले तरी त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल पण मिळणारा आनंद आणि समाधान तेव्हाच टिकेल जेव्हा आपण जे काही करतोय ते अगदी मनापासून करत असू..

घरात आपल्याला एखाद काम सांगितल आणि ते सांगितल म्हणून आपण करत असू.. तर त्यामधे आपल्याला कोणताच आनंद आणि उत्साह जाणवणार नाही कारण ते काम फक्त करायचं म्हणून केलेलं असते बहुतेक वेळा त्यामधे आपल्याकडून चुका सुद्धा होणार, आपल्या चुकीमुळे घरात कोणी काही बोललं तर आपल्याला राग येणार, वाईट वाटणार मग अशावेळी इतकं सगळं होणार असेल तर त्यापेक्षा आपण दिलेलं काम मनापासून स्वीकारलं तर नक्कीच ते काम आपण अगदी व्यवस्थित पद्धतशीर करू आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल..

कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिलेलं काम जेव्हा आपण ओरडा ऐकायला नको, चुका केल्या तर कामावर परिणाम होईल, दिवस ढकलायचा म्हणून असे विचार मनात ठेवून जर केलं तर त्या कामात आपल्याला अजिबात रस वाटणार नाही.. दिवसेंदिवस कंटाळा वाढत जाणार आणि आपली मानसिकता बदलणार..

या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्या कामावर, मनावर, नात्यांवर होणार.. म्हणून जर आपण दिलेलं काम हे आपल्यालाच पूर्ण करायचं आहे ते आज असो नाहीतर उद्या .. मग तेच काम आपण कसही करण्यापेक्षा अगदी नीट केलं , मनापासून स्वीकारून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला नवनविन शिकायला मिळेल, आपल्यातील उत्साह वाढेल आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल..

आपल्याला सहजच कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येतो.. रोज उठायचं तेच करायचं.. आला दिवस सारखाच.. आपल्या सगळ्याच अवयवांना त्या नेहमीच्या कामांची सवय झालेली असते .. म्हणूनच तर सकाळी उठून अंथरूण आवरन्यापासून ते रात्रीच अंथरूण करण्यापर्यंत कधी कोणत काम करावं हे आपल्याला अगदी अचूक माहीत असते पण त्या कामातून आपल्याला आनंद मिळत नाही. फक्त ते काम त्या वेळेत पूर्ण करायचं आणि एकदाच मोकळं व्हायचं असा उद्देश ठेवून ते काम करण्यात येते मग यात कुठला आनंद मिळणार…

तेच जे हाती घेतलेलं काम त्याच वेळेत पण अगदी मनापासून.. हळुवारपणे त्याचा आनंद घेत, जपत केलं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला नविन काही करण्याचं बळ देते आणि समाधान तर मिळणारच.. बघाना सकाळचा चहा ठेवायचा असेल तर चिडचिड करत करण्यापेक्षा हे माझं कामच आहे याचा मी स्वीकार केला व सगळ्यांना चहा पिल्यावर समाधान मिळायला हवं हा विचार मनात असेल तर होणारा चहा उत्तमच असेल..

सकाळची झाडलोट म्हणा नाहीतर लादी पुसायच म्हणा ते काम करताना आणि झाल्यावर एक हळुवार आपण केलेल्या कामावर आपणच कौतुकाने नजर फिरवली तर काम केल्याचं समाधान मिळते पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ते काम मनापासून केलेलं असेल नाहीतर आपल्या कामावर दुसरे लक्ष ठेवायला असतातच…लेबल लावण्यासाठी.

नोकरीच्या ठिकाणी आपल्याला दिलेलं काम करताना वैताग आलाय या कामांचा असा विचार करण्यापेक्षा हे माझं काम आहे आणि मलाच हे उत्तमरीत्या करायचंच आहे अस ठरवल आणि कामाचा स्वीकार केला तर पुढच्या वेळेस सुद्धा तेच काम त्याच उत्साहाने करता येईल..

कोणी सांगितलं म्हणून जबरदस्ती करण्यापेक्षा तसेच माझं हे रोजच काम आहे म्हणून करायचं म्हणून करण्यापेक्षा त्या कामाचा आनंद घेत ते काम केलं तर ते काम आपल्याला विलक्षण समाधान देणार..

असे केल्याने आपलं काम आपण कसं करावं हे दुसऱ्या कोणालाही सांगण्याची गरज पडणार नाही. आणि  तरी अगदीच दुसरे मध्ये-मध्ये टोकत असतील, तुमच्या कामात जातीने लक्ष देत असतील, त्यांच्या अपेक्षेनुसार तुमच्या कामाची आखणी करत असतील तर त्याठिकाणी काही बदलाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि बाकीच्या सोडून द्यायच्या!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!