Skip to content

… तरचं आपल्याला ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील..

… तरचं आपल्याला ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करता येतील..


सौ. मिनल वरपे.


ठरवलं की सगळं होतेच करता येतेच हे जरी खरं असलं तरी आपण काय ठरवतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असते..

आज मी ठरवलं की रोज सकाळी लवकर उठणारच तर मी नक्कीच सकाळी उठेन पण जर मी ठरवलं की खूप वेळ झोपणार नाही तर सांगता येत नाही मी उठेन की नाही…

हेच आपलं एका खास बाबतीत होत ते म्हणजे दुःख, आयुष्यातील वाईट अनुभव, चुकीचे प्रसंग अशा अनेक गोष्टी ज्या आपण ठरवून विसरण्याचा, पुन्हा आठवू नयेत म्हणून, आयुष्यातून मनातून पूर्णपणे काढून टाकण्याचा खूप विचार करतो अनेक प्रयत्न सुद्धा करतो पण आपले प्रयत्न बऱ्याचदा आपल्याला यश देत नाहीत…

कोणीतरी जवळची व्यक्ती जी आपल्यापासून दूरावलेली असेल जीच्याशिवय जगण्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसेल, आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून कायमची सोडून गेली असेल, अनेक प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल तर आलेलं अपयश विसरून पुन्हा नव्याने उभ राहताना जुने अनुभव त्रास देत असतील, असे अनेक प्रसंग जे आपल्या मनाविरुद्ध घडले असतील पण तर विसरता येत नाही.

आपण इतके प्रयत्न करून सुद्धा आपण जे ठरवतो ते आपल्याला करता येत नाही, तस वागतो येत नाही याचं कारण काय असेल तर आपण जे ठरवतो ते सकारात्मक्तेने विचार करून करत नाही…

एखादी गोष्ट विसरायची असेल तर नक्कीच आठवते कारण आपण सारखे घोकत असतो की अमुक अमुक गोष्ट मला विसरायची आहे.. मला एखाद्या व्यक्तीला विसरायचं आहे पण मी सारखं त्या व्यक्तीबद्दल मला काय प्रोब्लेम आहे याचाच विचार करत असेल तर मला त्या व्यक्तीचा विसर कसा पडणार…

आपण जे ठरवलं ते तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा आपण जे विसरायचं आहे, ज्या सवयी सोडायच्या आहेत, जून काय टाकून द्यायचं आहे याचा विचार न करता आता मला काय करायचं आहे याचा सतत विचार करेन.. माझं संपूर्ण लक्ष मी जेव्हा मला काय करायचं आहे यावर केंद्रित राहील तेव्हाच मला जे नाही करायचं याकडे माझं लक्ष राहणार नाही.

म्हणजेच मला जर सकाळी लवकर उठायचं आहे तरी रोज हाच विचार करेन की मला काहीही करून लवकर उठायचं आहेच.. आणि यामुळे आपलं पूर्ण लक्ष लवकर उठण्याकडे राहील पण तेच जर मी हा विचार केला मला उशिरा उठायचं नाहीये, मी उशिरा उठलो तर काय होणार, मी कितीही ठरवलं तरी मला उठायला उशीर होतोच तर आपलं लक्ष सकारात्मक विचारांवर न राहता भरकटून जाईल..

म्हणून जे काही ठरवायचं ते पूर्ण सकारात्मकतेने ठरवलं, मनात त्याबद्दल सकारात्मकता ठेवली तरच आपल्याला ठरलेल्या गोष्टी पूर्ण करता येतात…

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!