ढगाळ वातावरणाचा आपल्या मानसिकतेवर काही परिणाम होतोय का ?
मिनल वरपे
ढगाळ वातावरण…. शब्द असा आहे जो ऐकला की बहुतेकांच्या मनात त्याच वेगळं चित्र तयार होत असते. लहानपणापासून मी सुद्धा हेच ऐकलं आहे की ढगाळ वातावरण झालं म्हणजे खूप निरुत्साहीपणा जाणवतो.
या वातावरणात खूप आळस येतो..शरीर जड पडते, काहीच करावस वाटत नाही. जो उत्साह आपल्याला इतर वातावरणात मिळत असतो तोच उत्साह आपल्याला या वातावरणात जाणवत नाही.
सकाळ म्हटलं की लगेच आपल्यासमोर येतो तो म्हणजे उगवणारा सूर्य.. सूर्याची किरणं म्हणजे ऊर्जेचा स्रोत..पक्षांची किलबिल..नंतर आवाज येतात ते अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांचे ..लहान मुलांचं ते हसणं असो वा रडणे पण त्यांचा आवाज ऐकू आला की एक विलक्षण आनंद आपण अनुभवतो आणि या सर्वांमधून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि आपल्याला म्हणजेच आपल्या मेंदूला दिवसाची अशी सवय आपल्याला झालेली असते आणि यामधे जर बदल झाला तर जी रोज मिळणारी ऊर्जा तसेच प्रेरणा असते ती न मिळाल्यामुळे आपल्याला बदललेल्या वातावरणात नेहमीप्रमाणे काम करता येत नाही.
कारण आपण आपल्या मेंदूला ज्या सूचना देतो आपला मेंदू त्याच गोष्टी आपल्याकडून करून घेतो. म्हणूनच ढगाळ वातावरण म्हणजे आळस निर्माण करणार वातावरण हे आपणच आपल्या मेंदूला जाणवून देतो आणि त्यामुळेच आपल्याला आळस जाणवतो.
पण या सर्वात आपण आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवत असतो. कारण ढगाळ वातावरण म्हटलं की मला आता काय सुचणार नाही हे ठरवूनच आपण वेळ असाच घालवत असतो.
यापेक्षा जर आपण आपल्या मेंदूला सूचना दिल्या की वातावरण कोणतंही असो पण आपण आपल्याला मिळालेली वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य तो वापर करू तर नक्कीच आपल्याला वातावरणाचा वाईट परिणाम जाणवणार नाही.
जरी सूर्याची किरणं दिसली नाहीत, पक्षांचा किलबिलाट, लहान मुलांचे आवाज ऐकू आले नाहीत तरी आपल्याला मिळालेल्या ऊर्जेची आणि वेळेची हाक ऐकून आपण त्यांचं योग्य नियोजन करू.
मला आळस येईल किंवा येऊ शकतो हे जर आपण मनातून पूर्णपणे काढून टाकलं तर नक्कीच येणाऱ्या प्रत्येक वेळेत आपल्याला उत्साह जाणवेल.
जरी वातावरण बदललं असल तरी आपण आपले विचार सकारात्मक ठेवले तर बदललेल्या वातावरणाचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होणार.
जस अभ्यास असो किंवा कोणतेही काम आपण करायचं ठरवले तर दिवस असो नाहीतर रात्र त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देत नाही आणि ते काम तो अभ्यास पूर्ण करतोच. अगदी तसच वातावरण कोणतेही असो आपण आपली काम कुठेच थांबवायची नाही अस ठरवल तर नक्कीच आपण ते पूर्ण करणारच.
जर आपण ठरवलं तर प्रत्येक वेळ, प्रत्येक वातावरण आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा देईल फक्त आपले विचार आणि आपला दृष्टिकोन उत्साही ठेवण्याची गरज आहे.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

