Skip to content

डोळे आणि कान बंद केले म्हणजे संकटे जात नसतात.

डोळे आणि कान बंद केले म्हणजे संकटे जात नसतात.


मयुरी महेंद्र महाजन,

पुणे,


आयुष्य हे कितीतरी खाचखळग्यांनी भरलेले आहे, कितीतरी चढ-उतार या निरंतर चालणार्‍या या प्रवासात आपण अनुभवतो, मग त्यामध्ये दुसऱ्याकडे बघून काही गोष्टी शिकतो, तर काही स्वतः घेतलेल्या अनुभवावरुन ,…. जीवन हे एक संघर्ष आहे ,रोज कुठल्यातरी अडचणी आहे, रोज कुठले तरी प्रश्न आहेत, आजची समस्या सोडवली तर उद्याची नव्याने ठाकणारी समस्या आपल्या ध्यानीमनी नाही,

परंतु या सर्वांमध्ये जीवन कुठेही थांबवायचे नाही, आणि ते थांबतही नाही , बरेच जण निराश होतात ,हताश होतात, स्वतःला संपवून टाकतात ,परंतु जीवनाचा प्रवास निरंतर चालतो, मग ते आपल्या कुटुंबासोबत….

बर्‍याचदा असे म्हटले जाते, की चांगले विचार करावे, नेहमी चांगले होते, परंतु संकटाचा येणारा काळ, हा कितीही डोळे आणि कान बंद केले ,म्हणजे संकटे जात नसतात, ती येणारी असतात ,आणि त्याचं चोरपावलांनी येतात, परिस्थिती आपल्या हातात नसली, तरी त्या परिस्थितीत आपली मनस्थिती व त्याचा दृष्टिकोन मात्र आपल्या हातात नक्कीच असतो ,कारण येणारी संकट आपले बाहू घट्ट करत जातात ,..

वास्तव दिसणारी परिस्थिती कितीही डोळे झाकून ठेवले किंवा आपल्या कानावर हात ठेवून त्यांना बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी वास्तव हे शेवटपर्यंत वास्तवचं असतं, संकटे येतात आणि ज्या वेगाने येतात त्या वेगाने ती निघूनही जातात ,परंतु यामध्ये स्वतःला यातून सावरणे महत्त्वाचे असते ,आणि त्यासाठी आपण आलेल्या किंवा येणाऱ्या संकटांना दूर करून चालणार नसते, त्यांचा आधी स्वीकार करावा लागतो ,तसे तर खूप कमी जण असतात ,जी आलेल्या संकटांना वेलकम करतात, ये बाबा तुझीच कमी होती, स्वागत आहे तुझं,…

आपल्या पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळे आणि कान हे महत्त्वपूर्ण आहेत, कारण आपण जे काही माहिती ग्रहण करतो, ती आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी गोळा होते ,आणि ज्या वेळेस आपल्या मेंदूला तशा प्रकारच्या सूचना मिळत जातात, त्याप्रमाणे त्या माहितीचे पुनरावलोकन होत जाते, यामध्ये डोळे हे आपल्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची आणि खूप वर्णनीय बाब आहे ,

कारण हे सुंदर जीवन जे आपल्याला प्राप्त झालेले आहे ,ते आपण या डोळ्यांनी बघू शकतो, बघणे आणि ऐकणे ही क्रिया, आपल्या आयुष्याला वळण देणारी आहे, चांगले बघावे, चांगले एकावे, आणि चांगले बोलावे ,हे गांधीजींच्या माकडांचे संदेश आपण नेहमी लक्षात असू द्यावे त्यांचा आपल्याला भरपूर फायदा होईलं…..

तसेच ज्यांना कुणाला डोळे नाहीत, कान नाहीत, त्यांच्या आयुष्यात संकटे नाहीत, असे नाही, परंतु तुम्हाला प्रश्न पडू शकतो??? जर का डोळे आणि कान यांचे समांतर उत्तरे येथे नसेलं तरी त्याचा शब्दशः अर्थ येथे इतकाच आहे, की समोर संकटे आहेत, हे दिसत असूनही आपण आपल्या डोळ्यांना ते बघण्याची म्हणजे स्वीकारण्याची संधी देऊ शकत नाही,

कारण की असे म्हणतात, जर डोळ्यांनी बघितले, कानांनी ऐकले तरचं त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा, म्हणजेच संकट दिसत आहेत ,ऐकू येत आहे ,तरीही जर आपण त्याकडे कानाडोळा करत असणारं, तर त्यामुळे ती जाणारी नसतात, फक्त आपण स्वतःला फसवत असतो, मी तर काही बघितलेच नाही, ऐकलेचं नाही, याप्रमाणे…..

याउलट आपण संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःला नेहमी सज्ज ठेवायला हवे, येऊ देतं लाख संकटे ,त्यासाठी मी नेहमी तयार आहे, हे स्वतःला बजावून सांगावे, संकटे ही संकटाच्या स्तरावरतीचं असणार आहे, परंतु मी नेहमी सामना करण्याची तयारी ठेवतो, आणि झालंच तर संकटा समोर जिंकेल ,नाहीतर शिकेल ,पण कुठे थांबणार नाही, हा विश्वास स्वतःशीच ठेवत जर आपण लढलो ,तर संकटाची तीरतांडी उडवायला आपल्याला ताकद मिळेलं,

हे अगदी खरं आहे, की काही वेळेस धीर खचतो ,पावलं अडखळतात ,पण आपल्यामध्ये संकटाशी सामना करण्याची ताकद नेहमी लपलेली असते, फक्त ती त्या निमित्ताने बाहेर पडते, इतकेच ….म्हणून संकटे आपली आहेत, त्यांना आपणच हरवू शकतो, आपल्यालाचं त्याच्याशी सामना करावा लागतो, त्यामुळे ती शक्ती आपण ओळखायला हवी ,आणि संकंट जात नसतात ,त्यांना जिंकावं लागतं, आपल्यात लपलेल्या आपल्याचं असंख्य शक्तींनी…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!