डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी आपला smiley सेल्फी काढून मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेऊन पहा.
सोनाली जे.
आपण निराश , उदास का होतो. काही गोष्टी आपण कधी बदलू शकत नाही याची खात्री होते तेव्हा , किंवा मग अपयश येते मग अभ्यास असेल , परीक्षा असेल , व्यवसाय , नोकरी यात अपयश असेल तर प्रेमात ले असेल किंवा प्रेमभंग. अगदी काही नाही तर आपण दिसायला सुंदर नाही , काळे च आहोत , चष्मा आहे. नकटी च आहे. उंची नाही ..बुटकी आहे. जाडीच आहे. केस खूप सुंदर मुलायम नाहीत. तेव्हा ही उदासीनता , निराशा हा कॉम्प्लेक्स आपल्या मनात का आलेला असतो ?
तर यातून आपण निराश , उदास होत जातो. काहीच करण्याची इच्छा राहत नाही. आणि फ्रेश ही वाटत नाही. मरगळ येते. तेच तेच विचार परत मनाचे खच्चीकरण करत असतात. मार्ग तरी सापडत नाहीत. किंवा सुचत नाहीत अशावेळी. एक प्रकारचा मेंटल फटीग किंवा ब्लॉक निर्माण होतो. अशावेळी खर तर इतरांनी , आपल्या लोकांनी साथ देणे , असणे , मदत करणे , मार्ग दाखविणे गरजेचे असते. पण ते दाखविताना depression मधल्या व्यक्तीला कुठे ही असे जाणविले नाही पाहिजे की त्या व्यक्तीला इतर मदत करत आहेत. काही वेगळी वागणूक देत आहेत. हसत खेळत , मनोरंजनातून हे घडविण्याच्या प्रयत्नात पाहिजे.
माझ्या कडे येणाऱ्या depression मधल्या पेशंट ना पहिली गोष्ट मी काय सांगत असते की माझ्याकडे बघून बोला. कारण काय तर मुळात त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. आणि आपल्या अपयश आणि उणिवा याबद्दल लोक काय म्हणतील हे चक्र डोक्यात सतत सुरू असतं . त्यामुळे लोकांच्याकडे बघणे हे या व्यक्ती टाळतात. त्यांच्याशी बोललो तर ते काय म्हणतील , आपल्यातले दोष दाखवतील .नकारात्मक बोलतील , टोमणे मरतील असेच भाव मनात असतात.
म्हणून पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट काय असते तर या लोकांचा आत्मविश्वास परत आणणे. त्याकरिता जेव्हा एकमेकांसमोर असतो तेव्हा डोळ्यात डोळे घालून बघून बोलण्यातून एक तर नजर स्थिर होते. बोलताना समोरच्या व्यक्तीची होणारी चल बीचल ही नजरेतून ओळखली जाते. त्याक्षणी एक तर विषय भरकटू नये पण त्रास किंवा अजून निराशा होवू नये म्हणून आत्मविश्वास वाढेल असे healthy बोलणे सुरू करता येते.
यानंतर जेव्हा विश्वास वाढत आहे हे लक्षात येते तेव्हा बाहेर कुठे जायचे असेल किंवा नसेल तरी स्वतः छान आवरून तयार रहा. मग आवडता ड्रेस असेल , छानसा हलका मेकअप असेल , परफ्यूम असेल , आवडती हेअर स्टाइल ,. तर कधी मस्त हेअर कट , हेअर कलर करा.
यातून आपलेच मन फ्रेश feel करत असते. छान सारखे आवरणे आपल्या मनाला उत्साहित करत असते.
आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही मस्त आवरले आहे . उत्साही आहात , आत्मविश्वास वाढत आहे तेव्हा आरशा मध्ये बघून म्हणा की मी खूप सुंदर दिसते. आणि तेव्हा इतर कोणाबरोबर नाही तर स्वतः बरोबर तुलना करा.
काल परवा आपण निराश असताना आपल्या स्वतः कडे बघणे ही टाळत होतो. आणि खूप अवतारात होतो. आज आपण छान आवरल्यावर किती फ्रेश दिसतो. आणि उत्साही.
अशा वेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी आपला smiley सेल्फी काढून मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेऊन पहा. मुळात तुम्ही हसताना किती गोड दिसता हे तर आहेच. पण जेव्हा तुमचा असा फ्रेश , smiley फोटो आणि तुमच्यातला आत्मविश्वास बघून तुमच्या वॉलपेपर वर तुम्ही किंवा जवळच्या कोणी बघताना सहज मनात येते अरे वा किती सुंदर दिसतो आपण ..किंवा इतरांची comment जसे तुझ्या या smiley मुळे तू अजूनच सुंदर दिसत आहेस. असे म्हणले कोणी की अजून उत्साह वाढत असतो.
आणि जेव्हा तुमच्यातला विश्वास , उत्साह वाढतो तुमचे हे अगदी रोजचे smiley सेल्फी काढून मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणे , ही तुमच्यातल्या नकारात्मक भावना असतील त्या दूर करण्यास आणि तुमच्यातला आत्मविश्वास , उत्साह वाढविण्यास मदत करतात. आणि त्या सोबत तुम्ही डिप्रेशन मध्ये हा विचार करत असता की अपयश असेल किंवा माझ्या कडे सुंदरता नाही तर लोकांच्या तुम्हाला चांगल्या comments नी कोणी म्हणेल किती गोड हसतेस , कोणी म्हणले किती सुंदर आला फोटो. ड्रेस ही उठून दिसतो.
त्यातून उत्साह आणि सकारात्मकता वाढून खरेच आपण आपल्या बद्दल अधिक विचार करू लागतो. आणि अरे उगीच च निराशा येवून लोक काय म्हणतील असा विचार करत होतो , लोकांना टाळत होतो , पण लोक तर आपले कौतुक करत आहेत . यातून तुम्हाला निराशा , उदासीनता यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यातला आत्मविश्वास आपल्याला अनेक मार्ग सुचवितात. अरे खरेच की लोक ही आपल्या विषयी चांगले बोलतात हे बघून , वाचून , ऐकून आपला आत्मविश्वास अधिक दृढ होवून नवे मार्ग सुचत असतात. ते शोधण्यासाठी ,लोकांची मदत घेण्याकरिता , मनाची उभारी येण्याकरीता प्रेरित करत असतात.
डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी आपला smiley सेल्फी काढून मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेऊन पहा. बघा , आयुष्य सुंदर आहे . तुम्हीच तुमच्यातला आणि इतर जवळचे तुमच्यातला नकारात्मक भाव दूर करून सकारात्मक भाव निर्माण करण्यास प्रेरित करत असतात.
याउलट तुमचा चेहरा रडका असेल तर तुम्हाला सहानुभूती मिळेल , अरे रे काय झाले ? किंवा मग अरे अशा रडक्या व्यक्ती शी संपर्क ही नको म्हणून अजून टाळा टाळ ही होईल . इतकेच काय तुमचे तुम्हाला ही परत निराशा , आणि औदासीन्य दिसेल. त्यातून परत नकारात्मक विचार वाढीस लागतील.
आयुष्य सुंदर आहे आणि अधिक सुंदर करण्याकरिता डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी आपला smiley सेल्फी काढून मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेऊन पहाच पण केवळ सेल्फी पुरते नाही तर कायमच आपल्या चेहऱ्यावर ते smiley तो विश्वास दृढ होवू दे. Selfie काढताना वेगवेगळ्या पोज मध्ये काढताना आपणच आपल्या फोटोची तुलना करत असतो ..
अरे हा नाही चांगला आला, हा त्यातल्या त्यात बरा , मग एखादा अजून चांगला काढून बघू . म्हणून अजून चांगला फोटो काढण्याचे प्रयत्न केले जातात. मग जो आपल्याला खरेच आवडेल . छानसे smile तर आहेच , पण बॅकग्राऊंड पण छान , color combinations मस्त , उजेड .तर कधी अंधरातले सौंदर्य यांचा मिलाफ करताना तर कधी beautify करताना आपण विविधता आणत असतो.
प्रयोगशील वृत्ती वाढीस लागते. पेशंस वाढत असतात. आणि अजून चांगला फोटो काढण्याकरिता अजून प्रयत्न केले जातात. किंवा मग अजून आवडेल तसा मेकअप , मग मोकळे केस जास्त छान वाटतात तर तसे मोकळे सोडून , किंवा एखादी पिन ,लावून . किंवा अरे हे काय डोळ्याखाली थोडे काळे दिसते मग आता पुरते मेकअप मध्ये करू पण पुरेशी झोप आणि चौरस आहार घेवू असे मनातून विचार येवू लागतात.
हेच प्रेरित करणारे विचार मग जीवनात ही उपयोगी पडतात. अपयशातून , निराशेतून बाहेर काढण्यास वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात. आणि मार्ग सुचू लागतात जसे हा smiley selfie तेवढा छान नाही अजून दुसरा काढू. तसे हा मार्ग कसा वाटेल ..मग त्याला पर्यायी हा कसा वाटेल. यातून आपली विचारसरणी बदलत जाते. आपला आत्मविश्वास , एक smiley selfie ही आपल्याला अजून उत्साही आणि प्रेरित करतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


