Skip to content

‘ टेन्शन ‘ ही एक गोष्ट आयुष्यभर आपली साथ सोडत नाही.

‘ टेन्शन ‘ ही एक गोष्ट आयुष्यभर आपली साथ सोडत नाही.


गीतांजली जगदाळे


एक काळ असा होता जेव्हा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. आणि त्या पूर्ण करता-करता त्याच्या नाकी-नऊ यायचे. अजून ही त्याच आपल्या मूलभूत गरज आहेत पण तरी त्या भागून सुद्धा माणूस सुखी-समाधानी दिसत नाही. या गरजा पूर्ण होऊन सुद्धा त्याला कितीतरी अशा गोष्टी हव्या असतात ज्याची त्याला खरंच गरज आहे का, याचा तो विचार न करताच त्यामागे पळताना दिसतो.

पण प्रत्येक हवी असलेली गोष्ट प्रत्येकाला मिळतेच असं होत नाही. शेवटी आयुष्य आहे , सुखामागून दुःख , दुःखामागून सुख ही तर त्याची रीत च आहे. जिथे हव्या असलेल्या गोष्टी मिळून सुद्धा माणूस खुश नसतो तिथे न मिळालेल्या गोष्टींसाठी तो किती त्रास करून घेताना दिसतो.

प्रयत्न हे दर वेळी नक्कीच केले गेले पाहिजेत. पण आपण कशासाठी एवढा जीवाचा आटापिटा करतोय, ते खरंच आणि कितपत गरजेचं आहे हा विचार करणं ही आवश्यक आहे. हा विचार करून ही ती गोष्ट तेवढी महत्वाची वाटली तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवावेत. पण खूप गोष्टी आपण गरज नसताना हौस म्हणून सुद्धा करत असतो त्यांची प्रत्येक वेळी गरज असतेच असं नाही.

हौस म्हणून ही कराव्यात गोष्टी नाही असं नाही, पण त्या हौसेपोटी ते पूर्ण करताना आपलं टेन्शन जर वाढत असेल तर त्याला काय अर्थ आहे मग? आयुष्य म्हटलं की टेन्शन हे आलंच आलं. आयुष्य हा एक संघर्ष आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, काही गोष्टी मिळवताना, काही गमावताना टेन्शन आपण सगळेच अनुभवत असतो.

पण आपलं आयुष्य आपण जेवढं सरळ आणि सोप्प करू स्वतःसाठी, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण टेन्शन हाताळू शकतो. त्याचा सगळ्यात कमीत कमी त्रास आपल्याला कसा होईल किंवा त्याचा उपयोग आपल्याला पुढे जाण्यात कसा करून घेता येईल हे आपण बघू शकतो.

टेन्शन येणार नाही असे क्षण किंवा अशा गोष्टी आयुष्यात असतात पण आपण त्यांना ही आपण जेव्हा स्पर्धेचं रूप देतो तेव्हा तिथे टेन्शन यायला सुरुवात होते. लहान असताना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मनसोक्त खेळत असतो. कधी हरतो तर कधी जिंकतो. पण त्याच जे वाईट वाटत किंवा चांगलं वाटत ते तेवढ्या पुरतच असत.

पुढे खूप दिवस ते मनात ठेवून आपण झुरत बसत नाही. हारण्या-जिंकण्यापेक्षा आपण तो खेळ जास्त enjoy करत असतो. आणि आयुष्यात काही गोष्टी अगदी त्याच spirit ने हाताळायच्या असतात. प्रत्येक गोष्टीत काहीतरी फायदा, कसलीतरी achievement या गोष्टी डोक्यात यायला लागतात तिथे टेन्शन सुरु होत.

सामान्य जीवन म्हणजे अगदीच बेसिक गरजांसाठी किंवा संकटांमुळे जे टेन्शन येत त्याला आपल्याला सामोरं जाण्याशिवाय पर्यायच नसतो. पण आपण आपल्या हाताने जे टेन्शन वाढवतो त्याबाबतीत तरी आपण काहीतरी पाऊल उचलणं, त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. ‘टेन्शन’ आयुष्यभर साथ सोडणार नाही हे जरी खरं असलं तरी ते enjoy करणं, त्याला नियंत्रणात ठेवणं हे नेहमी नाही तरी कधीतरी का होईना आपल्याला जमूच शकत.

एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असत, पण ती गोष्ट तरी सुद्धा कधी-कधी आपल्याला मिळत नाही. म्हणजेच काय तर ‘प्रयत्न करणं’ एवढंच आपल्याला हातात असत. मग जी गोष्ट आपल्या हाताबाहेर आहे किंवा नियंत्रणाबाहेर आहे अशा गोष्टीसाठी आपण रडत का बसतो, एवढा त्रागा करून का घेतो? आणि आपले पूर्ण प्रयत्न आणि कष्ट करून सुद्धा त्या गोष्टीच टेन्शन का घेतो? नक्कीच ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असते त्यात काहीच वाद नाही.

पण आपण रडून, त्रास करून घेऊन सुद्धा ती आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपलं काम आपले पूर्ण प्रयत्न, कष्ट करून पूर्ण करावं आणि जस भगवान श्रीकृष्ण भगवतगीतेत सांगतात की कर्म करत रहा फळाची चिंता करू नका, त्याचप्रमाणे आपण सर्वजण प्रयत्न आणि कष्ट यात सातत्य ठेवुयात आणि फळाचं टेन्शन किंवा चिंता ही भगवंतावर सोडूयात. म्हणजे हे आयुष्यभर साथ न सोडणार टेन्शन कमीतकमी अधे-मध्ये का होईना आपल्याला थोडासा ब्रेक तरी देईल आणि तेवढा काळ आपण टेन्शन फ्री राहू शकू.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!