झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध??
सोनाली जे.
बरेचवेळा आपल्याला रात्री एका पाठोपाठ एक स्वप्न पडत जातात किंवा एकच मोठे स्वप्न continue होत राहते ..जसे गाढ झोपेत स्वप्न बघत असताना अचानक जाग आली, किंवा बाथरूम ला जाण्याकरिता उठलो तरी ही परत झोपल्यावर तेच किंवा तीच स्वप्न continue होतात..सकाळपर्यंत हे चालूच राहते पण सकाळी उठल्यावर रात्री कोणती किंवा कोणते स्वप्ने बघितले ते आठवतच नाही..काही स्वप्ने मात्र कायम ची लक्षात राहतात..आठवतात..
काही अंशी विज्ञान हे ही सांगते की शरीराची जी प्रकृती किंवा प्रवृत्ती असते त्यानुसार स्वप्ने पडतात..
१..कफ प्रकृती असेल तर पाण्यात पोहणे, पाऊस, पावसात भिजताना अशी स्वप्ने पडतात..
२. वात प्रकृती असेल तर हवेत तरंगतो, उडतो अशा प्रकारची स्वप्न पडतात.
३. पित्त ..स्वप्नात आग दिसते…
खरे तर तसे स्वप्नाचा खरा उलगडा तसा झालाच नाही.. मानसशास्त्र हे मानवी मन व वर्तन म्हणजे वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्त्र..मन म्हणले की भावना आल्या..विचार आले …आणि वर्तन ..
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांच्या मते स्वप्नांचे नाते हे मानवी मनातील सुप्त भावना ..hidden emotions, anxiety.. म्हणजे चिंता किंवा desires .. इच्छा किंवा cognitive state म्हणजे विचार..thinking..reasoning , remembering… आठवण , स्मृती , प्रोब्लेम solving याच्याशी संलग्न आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर भूक लागली असेल आणि गाढ झोपेत असू तर स्वप्नात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ दिसतील..किंवा अगदी शारीरिक भूक भागवण्याची सुप्त भावना असेल तर स्वप्नात एखादी सुंदर तरुणी दिसेल किंवा आवडती स्त्री..
अगदी झोपेत बाथरूम ला जायचे असेल तरी स्वप्नात ही तसे जाणवेल…
काही मानसशास्त्रज्ञ सांगतात की आपण झोपलो तरी आपला ब्रेन..मेंदू हा कार्यरत असतोच..मेंदू मधला frontal lobe हा आपल्या memory शी related असतो..त्यामुळे आपल्या चांगल्या किंवा वाईट , किंवा उत्सुकता, चिंता , भीती , ताण, unconscious desires..wish fullfillment ..personal conflict जसे की कोणाशी वाद झाले असतील तर कोणी आपला पाठलाग करीत आहे, आपल्यावर कोणी हल्ला केला अशी स्वप्ने पडतात.. अशा अनुभवांची memory आपल्या मेंदूत साठलेली असते…थोडक्यात memory स्वप्नाच्या रुपात आपल्या समोर येते..
प्रोब्लेम solving चे उदाहरण द्यायचे झाले तर एखादे किचकट गणित आपल्याला काही केल्या सुटत नसते…पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हाही आपला मेंदू कार्यरत असतो आणि आपल्या subconscious mind मध्ये गणित आपण स्वप्नात सोडवितो..
काही वेळेस काही medications मूळे स्वप्ने पडतात.. काही वेळेस external stimuli याचा प्रभाव ही स्वप्नावर पडतो..उदाहरण द्यायचे झाले तर good smell आणि bad smell हे आपल्या positive किंवा negative स्वप्नाशी related असतात..
काही वेळेस आपण एखाद्या जागेवर स्वप्नात जातो आणि काही वर्षांनी खरेच त्याच जागी आपण जातो तेव्हा आपल्याला आठवते की आपण इथे आलो होतो..
तसेच एखादी घटना घडते तेव्हा ती आधी तशीच घडली असे जानविते पण ते असे का वाटते तर थोडेसे त्याला deja – vu म्हणता येईल का??
लहान मुले झोपेत हसतात कारण कोणता तरी चांगला अनुभव त्यांना स्वप्नात दिसत असतो .याउलट झोपेत लहान मुले ओरडत उठतात कारण की मोठ्या कोणी रागावलेले असते..मारलेले असते..कोणाबरोबर भांडणं झाले असते..तो अनुभव झोपेत स्वप्नात येतो आणि मुले झोपेत किंचाळत उठतात किंवा रडतात..
पण म्हणजे झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा खरेच कुठे ना कुठे तरी आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी कुठे ना कुठे संबंध असतोच…आपले अनुभव चांगले ठेवा…आनंद , उत्साह ..नावीन्य यांचा सतत समावेश ठेवा…निराशा, ताण स्ट्रेस चिंता anxiety यापासून दूर राहा तर स्वप्नातही positive किंवा सकारात्मक अनुभव येतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


छान लेख आहे