ज्या व्यक्ती अजिबात समजून घेतं नाहीत, त्यांना असं समजून घ्या..!
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
जगणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं, सर्वांनी मला समजून घ्यावं, माझी काळजी करावी, मला प्रेम करावं, पण प्रत्यक्षात असं होतं का? नाही होत. आपण कितीही चांगले असू, प्रत्येकाला प्रत्येक वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करत असू, तरी काही लोकं समजून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नसतात.
एक वाक्य मला खूप आवडतं
“हर कोई तुम्हें नहीं समझ सकता, यँही तो जिंदगी है”
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या जगात वावरतात, एका गोष्टीला एक व्यक्ती चांगलं म्हणत असेल, कशावरून की दुसरा सुद्धा चांगलंचं म्हणणार आहे , हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, म्हणून काही आपण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देत बसायचं नाही.
तसं पाहिलं तर समजून घ्यायला अनुभवाचा कस लागतो, काही लोकं वयाने खूप मोठे असतात ,पण समजून घेण्याची कुवत मात्र खूप कमी असते, याउलट काही वयाने खूप लहान असतात पण अनुभवाचा खजिना मात्र खूप मोठा असतो, प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने, तर्कसंगत विचाराने ,आणि अनुभवाने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आपणच आपल्याला समजून घेत नाही कधीकधी,
आपल्याला कोणी नाही समजून घेतं, आपण मात्र सर्वांना समजून घेतो, पण जेव्हा आपली वेळ येते, आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं ,
असं जेव्हा आपल्याला वाटू लागेलं तेव्हा फक्त हळू स्वतःला सांगायचं …..मी आहे ना स्वतःला समजून घ्यायला…..!
तसं म्हणायला खूप सोपं असतं पण प्रयत्न करत राहिलं की एक वेळ अशी येते की नक्कीचं जमायला लागते,
आता बघूया की ज्या व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही, त्यांना कसं समजून घ्यायचं, खरं म्हणजे माझी जीवलग मैत्रीण तिचं नाव पण मयुरीचं आहे , आणि दुसरी रुचिता यांच्याशी बोलताना माझं नेहमी एक वाक्य असते,
” जी लोक आपल्याला समजून घेतात, त्यांना आपल्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि जी लोकं आपल्याला समजून घेत नाही ,
त्यांना आपल्या कुठल्याचं स्पष्टीकरणावर अजिबात विश्वास नसतो,”
प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या जागी बरोबरच आहोत , पण समजून-उमजून केलेल्या कुठल्याही गोष्टीला जितकी डोकं तितके विचार असतातच……!
1 – व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणून विषय सोडून द्यायचा .
2 – ते त्यांच्या ठिकाणी बरोबर असू शकतात पण मी सुद्धा चुकीचा नाही.
3 – समजून सांगून सुद्धा जी लोक समजून घेत नाही, त्यांना पूर्णपणे समजावणे थांबवा, तुम्ही तुमचे प्राण पणाला लावले तरी त्यांना त्यांची बाजू खरी मांडायचे असते.
4 – नाणे कुठलेही असो
त्याला नेहमीच दोन बाजू असतात.
5 – काही लोक आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे असतात ,आणि त्यांचे अनुभव समज आपल्या पेक्षा नक्कीच मोठी असते ,म्हणून आपल्या आणि त्यांच्या जनरेशन मध्ये जे अंतर निर्माण झालेय ते भरून काढण्याचा प्रयत्न करावा.
जेणेकरून आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला मदत होईल.
आपले कितीही बरोबर असले अगदी तंतोतंत बरोबर असले तरी, समोरच्याला सांगावं….. हो …बाबा …..! तुझंचं बरोबर आहे …. मला तर काहीच कळत नाही, तू म्हणतोय ते अगदी खरे …. असं म्हणून त्याची बाजू खरी करावी .
“”हर कोई मुझे अच्छा समझें,
यें तों नहीं,
पर कोई मुझें गलत ना समझें,
पर किसी के आखों में
खटकनें में भी
मजें की बात है””
कधी कधी आपण सुद्धा खूप जणांना समजून घेण्यात कमी पडतो …… जसे की विद्यार्थ्याला ओरडणारे, मारणारे, शिक्षक रागावणारी आई, यांच्या बाबतीत जरी वाईट वाटत असले , तरी ती आपल्या फायद्यासाठी आपल्याला रागवतात, बोलतात, म्हणून काही ते आपले शत्रू नसतात …..
कधी कधी आपल्याला याची जाणीव नंतर होते…. जसा तो विद्यार्थी मोठा होतो तेव्हा त्याला कळतं जर त्यांनी आपल्याला त्या वेळी घाव घातले नसते, तर आपण चांगले घडलो नसतो….आणि टचकण डोळ्यात पाणी येतं …. चुका करणं माणसाचा स्वभाव असला पाहिजे ….. पण त्यातून शिकत जाणे ….,ही आपली विचारधारा नक्कीच असले पाहिजे …….!
माणूस आहे चुकणारच…..!
पुढे चालत राहा …..आनंद घेतं रहा….. प्रत्येक क्षणाला जीवनाचा आस्वाद घेऊया…. चला काहीतरी नवीन शिकूया……….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


