Skip to content

ज्या दिशेने आपल्याला जायचंच नाहीये, त्या दिशेचा इतका विचार कशासाठी ?

ज्या दिशेने आपल्याला जायचंच नाहीये, त्या दिशेचा इतका विचार कशासाठी ?


मयुरी महेंद्र महाजन

पुणे,


आयुष्य जगत असताना अनेक वळण लागतात, प्रत्येक वळणावरचा आपला प्रवास आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीचं आलेला असतो, परंतु त्या प्रत्येक वळणावरती आपली दिशा आपण ठरवून जातो ,,,,का?????

बघा खूप सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो, समजा आपल्याला कुठेतरी जायचे आहे, आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे ,ते ठिकाण ठरलेले आहे, आणि त्या ठिकाणी जाण्यासाठीची दिशा ,तो रस्ता आपल्याला माहिती आहे, परंतु आपली ती दिशा चुकली, रस्ता चुकला ,आणि आपण भलत्याच ठिकाणी पोहोचलो, तेव्हा आपल्याला कुठे जाणीव होते, की आपली वाट चुकली ,दिशा चुकली, आपण उगाचच शॉर्टकट घेण्याच्या भानगडीत लांब निघून आलो,,,,,,

आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे होते, आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी तेथून परत माघारी येतो, आपल्या जेथे जायचे होते, आपण तेथे पोहचतो देखील, परतु त्यात जितका वेळ आपल्याला येथे येण्यासाठी जाणार होता, त्यापेक्षा जास्तीचा वेळ आपला येथे गेलेला असतो, आयुष्याच्या प्रवासात आपल्या विचारांचा प्रवास सुद्धा असाचं सुरु असतो, तो यापेक्षा काही नवीन नाही…. म्हणून ज्या दिशेने आपल्याला जायचंच नाहीये, त्याचा इतका विचार कशासाठी??????

मान्य आहे,की आपल्या आजूबाजूला स्पर्धा खूप वाढली आहे, येथे आपल्या आजूबाजूलाच नाही, तर गोल असणाऱ्या पृथ्वीला प्रत्येक टप्प्यावरती दिशा झालेल्या आहेत, आपण सर्वांनी घोडा बघितलेला असेल, घोड्याचा मालक त्याला त्याच्या डोळ्यात जवळ फडकी लावत असतो, ते यासाठी की इतरत्र त्याची नजर कुठेही भरकटू नये, आणि तो ज्या दिशेने जाणार आहे, त्या ठिकाणी तो वेगाने जाण्यासाठी म्हणून…. कदाचित घोड्याचा वेग जास्त असतो….. कारण त्याची पट्टी तो कधीचं सोडत नाही, तो एकाचं पट्टीत एकाचं दिशेने असतो,…

ज्या गावाला जायचेचं नाही, त्या गावाला जाणाऱ्या गाडीत बसून उपयोग काय????? तसेच ज्या दिशेने जायचेच नाही त्याचा ईतका विचार कशासाठी,,, आपल्या विचारांवरती आपले प्रभुत्व असणे, आणि ते मिळवणे ही एक साधना आहे, कारण की नाही म्हटलं तरी आपण आपल्या विचारांना मोकाट सोडलेलं आहे, त्याला कुठले बंधन नाही, त्याला कुठल्या मर्यादा नाही, वाटेल तिथे, वाटेल तेव्हा, वाटेल तितके, कुठेही विचार करत सुटतो, मग ते फायद्याचे असो, किंवा नसो..

आपल्या विचारांना आपण शिस्तीतचं बसवलेले नाही, दिवसभरात तर विचार करतोचं, परंतु झोपताना सुद्धा त्या विचारांना शांतता नाही, आणि एखाद्या विचारला विचारासारखं घ्यावं की, तर नाही इतका विचार, ईतका विचार , खोल अगदी तळात ,गाळात ,मळात ,शिरता येईलं तितकेचं…..!!!

परंतु यात आपण आपलेचं नुकसान करून घेतो ,हे आपलेचं आपल्याला कळत नाही, आपण जे करायचे नाही, त्यावर विचार करण्यापेक्षा, ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याकडे जर आपली सर्व शक्ती एकवटली ना…..!!! तर कितीतरी गोष्टी सहज पार होतील…. मगाशी मी प्रथम जे उदाहरण दिले ते अगदी बारकाईने बघा!!!

कारण की जर आपण आपली दिशा भरकटून, ज्या ठिकाणी जायचे नाही, त्याचा विचार करत असाल, तर यामध्ये वेळ आपल्याच जाणार आहे, आणि वेळ ईतके मोल्यवान काहीच नाही, एकदा निघून गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा कधीही येत नाही, आपण आपल्या ठिकाणावरती नक्की पोहोचणार आहोत, आपली जिद्द पणाला लावून…. परंतु फक्त आपण आपली वाट भरकटू नये, ठरलेली दिशा चुकू नये, यासाठी नको त्या गोष्टी आपल्याला आधी बाजूला साराव्या लागतील,…

आपल्या विचारांचा असलेला रस्ता मोकळा असेल, तितक्या लवकर आपण आपल्या दिशेने पोहोचणार आहोत, कारण रस्त्यावर दगड आणि काट्यांची झुडप असतील, तर आपण आधी त्यांनाच मोकळं करायला हवं, नाहीतर दिशा तर दूरच राहिलं, परंतु या समस्यांमध्ये आपण अडकून राहू,…

कारण की काटा रुतल्याशिवाय, वाटा सापडत नाही ,,,,त्यामुळे आधी हे काटे स्वच्छ करावे लागतील, आपली दिशा मोकळी करावी लागेल, धेय्याची पण, आणि आपल्या विचारांची पण, कारण की अयोग्य योग्य दिशेने वेगाने जाण्यापेक्षा ,योग्य दिशेने संयमाने जाणे कधीही योग्यचं…., आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे ज्या दिशेची वाट आपल्याला धरायची नाही, त्यासाठी विचार करून आपली शक्ती खर्ची घालू नका… त्यातच आपले कल्याण आहे ….!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!