Skip to content

ज्या गोष्टी आपल्याला ‘चॅलेंज’ करतात, तेच आपलं आयुष्य ‘चेंज’ करतात.

ज्या गोष्टी आपल्याला ‘चॅलेंज’ करतात, तेच आपलं आयुष्य ‘चेंज’ करतात.


सोनाली जे


आपण लहान असताना सगळ्यांनीच ” चॅलेंज उचलेंज ” हा पत्त्यातला डाव खेळला असेलच ना..खोटे पत्ते ही खरे म्हणून लावायचे याचे चॅलेंज असायचे. आणि खरे ही लावायचे. एखाद्याच्या पत्त्यावर शंका आली की तो challenge द्यावे का न द्यावे अशा संभ्रमात असताना ज्याचे पत्ते वर असतील तो खूप निर्धास्त खूप confidently वागत असतो. भले तू चॅलेंज दे रे तुला उचलावे लागतील पत्ते असा कॉन्फिडन्स.

आपल्या ही आयुष्यात पदोपदी अशी चॅलेंज येत असतात आणि ती आपणही तेवढ्याच ताकदीने , उत्साहाने , आहे त्या परिस्थतीत सुधारणा घडवून आपण परिस्थिती मध्ये , आपल्यामध्ये , आयुष्यामध्ये change घडवून आणत असतो. म्हणजे चॅलेंज ही वरकरणी negative दिसली , वाटली तरी आपल्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे .

आपण सध्या कौन बनेगा करोडपती serial बघतो , त्यात सुरुवातीला comparatively सोपे सोपे प्रश्न विचारतात , पण हळूहळू पुढचे प्रश्न अवघड असतात ते आपल्या दृष्टीने चॅलेंज च असते. काही प्रश्नांची उत्तरे confusing असतात त्यामुळे आपल्याला अजूनच अवघड चॅलेंज असते , आणि जस जसे जास्त प्रश्नाची आणि अवघड प्रश्नांची उत्तरे बरोबर येत गेली की मिळणारे पैसे ही जास्त असतात.

आनंद ही जास्त मिळतो . शेवटचा प्रश्न ही जिंकलो तर करोडपती होण्याचा chance मिळतो. म्हणजे चॅलेंज असलेल्या गोष्टींमधून आपलं आयुष्य change होतं.अर्थात त्याकरिता तुम्हाला अभ्यास ही खूप करावा लागतो , general माहिती , विविध गोष्टी जाणून घेण्याकरिता तुमची शिकण्याची वृत्ती आणि जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवली पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग , चॅलेंज येत असतात, कधी शिक्षणामध्ये असेल जसे की शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी , आवडत्या stream करिता असणारी स्पर्धा , चढाओढ त्यात आपल्याला आवडते क्षेत्र निवडायचे असेल तर अभ्यास आणि त्याकरिता मेहनत , devotion , इतर अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष , काही चांगल्या गोष्टी , क्षण यांचा त्याग करावा लागतो आपल्या मनावर कंट्रोल ठेवून ही सगळी चॅलेंज पेलावी , उचलावी लागतात तरच आपल्याला अनेक क्षेत्र उपलब्ध असतील पण त्यातून ही कोणत्या क्षेत्राची निवड करायची हा चॉईस आपल्या हातात राहतो.

तसेच नोकरी बाबत ही आहे तुम्ही जर योग्य शिक्षण आणि स्किल develop केली तुम्ही स्वतः वेगवेगळी चॅलेंज स्वीकारली , गरजेची टूल्स , सॉफ्टवेअर सगळे updated deep knowledge मिळविले तर नोकरीच्या अनेक ऑप्शन मधून चॉईस करणे तुमच्या हातात राहते.

नाती टीकविण्याकरिता असेल किंवा maslow यांच्या नियमानुसार गरजा ..needs पुर्ण करताना basic needs पूर्ण करून अन्न, वस्त्र , शिक्षण पूर्ण करून , सेफ्टी needs पूर्ण करून म्हणजे घर घेवून , मग सोशल needs पूर्ण करणे म्हणजे मित्र मैत्रिणी , त्यातून सेल्फ एस्टिम , self actualization पर्यंत पोहचणे हे change घडत असताना कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्हाला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्या परिस्थितीचा स्वीकार करा. आणि मलाच का नेहमी अशा कठीण प्रसंग तोंड द्यावे लागते , आव्हान स्वीकारावे लागते, चॅलेंज यांना सामोरे जावे लागते हे negative विचार मनातून पूर्णपणे काढून टाकावे आणि हे challange आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घेवून येणार आहेत यावर विश्वास ठेवून पूर्ण विश्वास आणि मेहनत घेवुन ते पूर्ण करावे.

आता टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा ने भाला फेक मध्ये गोल्ड मेडल संपादन केले पण त्याकरिता त्याला आधी स्वतः खूप मेहनत घ्यावी लागली, शारीरिक फिटनेस ठेवून , योग्य आहार शिवाय रोजची practice ही आणि त्यात ही संपूर्ण भारता मधून त्याची निवड होवून त्याची पुढे Olympic स्पर्धे करिता एवढ्या खेळाडू मधून निवड होणे हे challange च होते आणि त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू मधून final मध्ये पोहचणे

आणि त्यात ही गोल्ड मेडल मिळविणे हे मोठे चॅलेंज त्याने जिद्दीने स्वीकारले , त्याकरिता मेहनत घेतली , कष्ट घेतले आणि त्या गोल्ड मेडल जिंकण्यामधून तो जगज्जेता होण्याचा chance मिळाला , त्या सततच्या मेहनती चे , जिद्दीचे फळ म्हणजे तो सामान्य खेळाडू पासून जगज्जेता होण्यापर्यंत त्याचे आयुष्य बदलून गेले.आणि तो च काय तर त्याचे घरचे ,आपला संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला त्याच्या या उत्कृष्ट कामगिरी मधून मिळालेल्या यशाचा गर्व आहे.

हरियाणा सरकारने त्याला अनेक बक्षिसे दिली. तसेच सहा कोटी रुपये रक्कम , class १ ऑफिसर ची नोकरी , जमीन घेण्याकरिता ५० टक्के सवलत ..अशी पैसे असतील , बक्षिसे असतील याची त्याच्यावर बरसात केली. आणि त्याचे आयुष्य च आनंद , उत्कर्ष आणि यशस्वी रित्या change झाले.

आपण आयुष्यात छोटी छोटी चॅलेंज स्वीकारताना ही काही वेळेस नाराज होतो, मला कसे जमेल याची भीती , धास्ती t निर्माण होते. ती पहाडा एवढी मोठी वाटतात. त्यातून यशाच्या शिखरावर पोहचता येईल का याची शंका मनात असते. याउलट छोट्या मधले छोटे असेल किंवा मोठी चॅलेंज कडे मिळालेली संधी म्हणून बघा , त्याकरिता स्वतः मध्ये सकारात्मकता ठेवा , उत्साहाने ते चॅलेंज स्वीकारा बघा तुमचे आयुष्य change होईल.

Corona सारख्या महामारी ने अख्ख्या जगाला वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करण्याकरिता , virus शोधून त्यावर vaccine तयार करण्याचे चॅलेंज च दिले ना ?? हे एव्हढे मोठे चॅलेंज ही सर्व देशांनी स्वीकारून , नवीन research करून , vaccine तयार केली , त्याच्या विविध चाचण्या ..टेस्ट करून , खात्री पटल्यावर च मानव जातीवर याचा यशस्वी रित्या वापर करण्यात आला. म्हणजे हे vaccine चे चॅलेंज आपलं आयुष्य ‘चेंज’ करून गेलं ना!! Corona वर नियंत्रण आणि आपली भीती कमी झाली हा सकारात्मक बदलच घडला ना???

आयुष्य सुंदर आहे. आयुष्यात पुढे जाताना छोट्या , मोठ्या चॅलेंज चा स्वीकार करावा लागणार च , तो सकारात्मक रित्या , आनंदाने करा त्यातून आपल्या आयुष्यात चांगले change होणार या दृष्टीने बघा.

आयुष्य सुंदर आहे .खचून जावू नका तर त्या संकटे , आव्हाने यावर मात करून आयुष्यात सकारात्मक बदल, प्रगती , घडवून आणा. आनंद मिळवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!