ज्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो, तेच क्षण लवकर का निघून जातात.
सोनाली जे.
अभी ना जाओ छोड कर
के दिल अभी भरा नही l
अभी अभी तो आयी हो l
बहार बन के छाई हो l
हवा जरा महक ने तो दो जरा l
नजर जरा बेहेक तो ले l
ये शांम ढल तो ले जरा l
भेटल्यावर वेळ कसा जातो आणि संपतो हेच समजत नाही. बघा ना की भेटण्याची जी ओढ असते..मनीष आणि मानसी एकमेकांना भेटण्यासाठी किती आतुर असतात. दोघांच्या ही स्पेलिंग मध्ये मन हे कॉमन ..मनीष आणि manasi.. कधी एकदा भेटू असे होते त्यांना. ती भेटी मधली ओढ दोघांना सतत उत्साही ठेवत असते. भेटण्याची आशा खूप सुखद भावना असते. भेटी पूर्वी दोघेही खूप गोष्टी ठरवत असतात.
हे बोलायचे आहे, हे सांगायचे आहे, या गोष्टी करायच्या आहेत. इथे जायचे आहे तिथे जायचे आहे.अगदी एकत्र बसून एखादा आवडता पदार्थ खायचा असतो. किंवा एखादी गोष्ट मग ड्रेस असेल किंवा शर्ट असेल एकमेकांच्या पसंतीन घ्यायचा आहे. किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचे आहे. किंवा एखादे हलके फुलके नाटक , सिनेमा बघायचा आहे. किंवा एखाद्या जॉब विषयी discuss करायचं आहे , नोकरी मधले प्रोब्लेम किंवा शिक्षणातले प्रोब्लेम असतील किंवा नवीन गोष्टी करताना काही अडचणी असतील तर त्या किंवा नवीन गोष्टी केल्या आहेत त्या..किती सांगायचे असते. विचारायचे असते.किती गोष्टी एकत्र करायच्या असतात. किती किती गोष्टी ठरवत असतात भेटण्यापूर्वी.
आतुरतेने त्या भेटण्याची , त्या बोलण्याची मनीष आणि मानसी वाट पाहत असतं .. त्या एका भेटीत एव्हढे सगळे करता करता परत जायची वेळ कधी येते समजतच नसे. .तरीही अजून बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या असतात..बोलायच्या राहिल्या असतात. बऱ्याच ठिकाणी जायचे राहिलेले असते.
मनीष आणि मानसी एकमेकांना भेटल्यावर पहिला वेळ बघण्यात , एकमेकांची आपुलकीने विचारपूस करण्यात आणि सहवासात बऱ्याच गोष्टी नवीन ही बोलल्या जात आणि ज्या बोलायच्या ठरविल्या असत त्या राहूनही जात. म्हणजे एकमेकांना वेळ हा कायम कमीच पडत असे. किती ही वेळ एकत्र असतील तरी तो वेळ खूप आनंदी , उत्साही करत असे एकमेकांना आणि नवचैतन्य देत होता.
भेटण्याची ओढ एवढी असे की ते आतुरतेने वाट बघत केव्हा एकदा ठरलेल्या वेळात भेटतो..थोडा पाच दहा मिनिटांचा उशीर झाला तरी अरे आपला वेळ कमी झाला असे होत असे.. मग ते विसरून प्रत्येक क्षण दोघेही भरभरून जगत असत. प्रत्येक भेट ही पहिल्या भेटी सारखीच असे त्यांची..तेच नावीन्य , तोच उत्साह , तीच ओढ मग दोघेही एकमेकांच्या आवडी निवडी लक्षात ठेवून रंगसंगती असेल, कपड्यांची निवड असेल किंवा मग परफ्यूम असेल तो आवडता लक्षात ठेवून छान आवरून अजून एकमेकांना आवडू अशा रीतीने आणि तेही पहिल्यांदा भेटतो अशा उत्साहाने भेटत.
चार चार दिवस दोघेही कधी भेटायचे , किती वाजता , कुठे हे ठरवत असत आणि ठरल्या वेळी एकमेकांना भेटण्यकरिता आतूर होत आणि सोबतचा , सहवासात ला वेळ इतका भूर्कन जाई , सगळ्या ठरविलेल्या गोष्टी ही पूर्ण होत नाहीत , मग वाटे की किती पटकन हे क्षण निघून जातात.. मग दोघांना ही एकमेकांपासून दूर जावे लागणारी ही खंत, आणि परत कधी भेटणार याची आतुरता लागून राहत असे. भेटीचे हे क्षण एव्हढे कमी का असतात असेच वाटे नेहमी..आणि नेहमी ते कमीच पडत.
आपण ही आयुष्यात खूप वेळा अशा अनेक क्षणांची आतुरतेने वाट बघत असतो.कधी मित्र मैत्रिणी भेटण्यासाठी..कधी खूप वर्षांनी होणारे शाळेचे get ” together ” आपल्या शालेय मित्र मैत्रिणी , शिक्षक यांना भेटण्यकरीता आतूर असतातच शिवाय आपल्या जुन्या आठवणी कधी एकदा शेअर करू असे झाले असते आणि त्यात भेटी मध्ये कोण कोणत्या नवीन गोष्टी करायच्या आणि नवीन आठवणी जमा करायच्या असे होते.
आणि त्या ” get together ” ची आपण सगळे एवढ्या आतुरतेने वाट बघत असतो आणि भेटल्यावर सगळ्यांच्या बरोबर बोलणे , काही करमणुकीचे कार्यक्रम , खाणे पिणे , काही funny games, गाणी , एकमेकांचे अनुभव यात वेळ कसा जातो आणि किती आनंदी करून जात असतो सगळ्यांना.
भेटण्यापुर्वी महिनाभर आधी सगळी तयारी , कार्यक्रम आखणी , नियोजन , contribution , एकमेकांना भेटून ठरविणे परत काही राहिले तर फोना फोनी..एव्हढे उत्साहाने , involve होवून करत असतो आणि प्रत्यक्ष भेटल्यावर सगळ्यांसोबत दिलेला कार्यक्रमाचा वेळ , ते कधी ही संपू नयेत वाटणारे क्षण इतक्या पटकन निघून जातात की निरोपाची वेळ येते. कारण किती ही झाले तरी प्रत्येकाला आपल्या आपल्या जबाबदाऱ्या , नोकरी , व्यवसाय, घरची कामे आणि कर्तव्य ही असतातच. त्यामुळे ही भेट कुठे तरी आवरती घ्यावीच लागते ..हा हा हा हो आणि कार्यक्रम ज्या hall मध्ये किंवा हॉटेल किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी , किंवा जरी कोणाच्या घरी असेल तरी प्रत्येकाला दिलेल्या वेळेत तो संपवून परत जावेच लागते.
आपल्या सगळ्यांना सिंड्रेला ची कहाणी माहितीच आहे. परी ताईने दिलेले सुंदर रूप , ड्रेस , काचेचे बुट , छानशी बग्गी ही जादू रात्री बारा पर्यंत च सिंड्रेला करिता दिलेली वेळ. आणि राजाच्या महालात राजपुत्र आपल्या करिता योग्य मुलगी पाहत असताना सिंड्रेला त्याला खूप आवडते. तिचे रूप , तिची शालीनता तिचे गुण , तिच्या सोबत नृत्य करत असताना बारा वाजयला येतात म्हणून सिंड्रेला आणि राजपुत्र यांना ते क्षण ती सोबत हवीहवीशी वाटत असते.
ती ची सावत्र आई बहीण तिला देणारे सगळे त्रास ती विसरून जाते, तिला करावे लागणारे कष्ट विसरून जाते..आपले कोणी नाही ही एकाकी पणांची भावना विसरून आपल्याला ही आधार आहे ही सुखद भावना अनुभवत असताना ही बारा वाजण्या पूर्वी ते सुंदर क्षण सोडून सिंड्रेला निघून जाते.
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जावू रंग महाल
अशीच प्रत्येकाची अवस्था होते. आपल्या आवडत्या व्यक्तींना , ठिकाणांना भेटण्याची आतुरता वाढत असते..आणि त्यांनी किंवा त्यांना सोडून जाण्याची इच्छा होत नाही.
ज्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो, तेच क्षण लवकर का निघून जातात ??
कारण आपण त्या क्षणाकरिता खूप काही प्लॅन्स केले असतात, ते क्षण आपण खूप आनंदात , उत्साहात , आपल्या मनासारखे रंग भरत जगत असतो..भरभरून प्रत्येक क्षण जगत असतो. एकमेकांचा सहवास मग कोणी असो मित्र , मैत्रिणी, नातेवाईक , मुले , प्रियकर प्रेयसी.
फुलपाखरा सारखे स्वच्छंदी , कधी मनाच्या उंच भराऱ्या मारून तर कधी सुखाच्या परमोच्च बिंदू वर जावून जगतात ते प्रत्येक क्षण, ते अजून हवेहवेसे वाटतात, ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात..आपल्या लोकांच्यात असण्याचा सुखद अनुभव आणि मानसिक आधार देतात.. आपलेपणा असतो त्यात..आपुलकी आणि परत ओढ वाढविणारे च असतात .
याच उलट दुःखाचे , त्रासदायक, संकटाचे क्षण लवकर संपता संपत नाहीत .. नकोस वाटतात. एक क्षण ही वर्ष भरा सारखा वाटतो.
ज्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो, तेच क्षण लवकर का निघून ही जातात आणि पुढच्या भेटीची , क्षणांची ओढ ही वाढवतात..आणि परत ते क्षण यावे म्हणून आतुरतेने वाट ही बघण्याची , भेतीतली हुरहूर ही वाढवतात.. आपल्याला कायम सकारात्मक राहण्यास शिकवतात.
आयुष्य सुंदर आहे. आपल्या आयुष्यातले हे आतुरतेने वाट बघतो ते क्षण भरभरून जगा आणि इतरांना ही त्यात सामील करून घ्या आणि परत त्याच क्षणांची आतुरता ही वाढवा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


