जॉब करणाऱ्या महिलांच्या नजरेतून कुटुंब
अपर्णा अशोक कुलकर्णी
करिअर ही आयुष्याला नवीन वळण देणारी गोष्ट आहे. करिअर हा जसा मुलांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तसाच तो मुलीसाठी ही आहे.पण आपल्याकडे अजूनही मुलींच्या करिअर कडे फारसं महत्त्व दिले जात नाही.
कारण आपल्याकडे पुरुष हाच कर्ता,कमावता आहे असा मानलं जातं.मुलींकडे त्या नजरेने पाहिले जात नाही. त्यातल्या त्यात लग्न झालेल्या महीलंसाठी करिअर हा विषय तिच्या सासरच्या लोकांवरच अवलंबून असतो.ही खूप दुर्दैवी गोष्टआहे.
असो पण आजकालच्या महिलांसाठी घर जितके महत्त्वाचे आहे तितकेच करिअर ही. यासाठी तारेवरची कसरत तिला एकटीलाच करावी लागणार आहे हे माहीत असूनही ती करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असते. या दोन्ही गोष्टी सांभाळताना तिची किती घुसमट होते हे फक्त तिलाच माहीत.लग्न झालेल्या मुलींनी जर करिअर करायचं ठरवलं तर तिला कुटुंब आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच समर्थ पणे पेलाव्या लागतात.
नवऱ्याच,सासुच, मुलांची मने सांभाळणं आणि नोकरी च्य ठिकाणी बॉस च काम सांभाळणं हे वाटत तितकं सोपं काम नाही. सणवार,नातेवाईक, मुलांच्या जबाबदाऱ्या,कामाचा ताण हे सगळं सांभाळून स्वतःच अस्तित्व निर्माण करते नोकरी करणारी स्त्री. आई, सून, बायको अशा सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे सांभाळून तक्रारीचा सूर कोणाकडूनही येऊ देत नाही.
नोकरी करणाऱ्या महिला स्वतः आर्थिक दृष्टीने सक्षम तर होतातच पण आपल्या कुटुंबाला ही सक्षम बनवतात.आपल्या मुलांना घडवतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात , नवऱ्याला आर्थिक मदत करतात , समाजामध्ये मानाने उभ्या राहतात आणि स्वतः च अस्तित्व, नवं विश्व निर्माण करतात.अस म्हणतात ना एक स्त्री ही प्रत्येक यशस्वी पुरुषामागे असते.
तशा प्रकारे त्या त्यांच्या नवऱ्यामागे उभ्या राहतात प्रसंगी द्रौपदी , राधा ,हिरकणी प्रमाणे उभ्या राहतात तर प्रसंगी देवी दुर्गा चे रौद्र रुप धारण करून कुटुंबासाठी संकटाना सामोरे जातात . स्त्रिया मध्ये कमालीची टाकत असते.स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकलाची माता असते,भगिनी असते,दुर्गा असते.
या सगळ्या मते ती स्वतः साठी कधीच काहीच करत नाही .प्रत्येक वेळी स्वतःच मन मारून दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करते.स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून फामिलीचा अवडी निवडी ला प्राधान्य देते.जेवणाच्या सवईपासून ते कपड्याच्या आवडी निवडी पण ती सहज नवऱ्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी बदलून स्वतःच आयुष्य वेचून कुटुंबासाठी जगते.
अशा वेळी त्यांना हवा असतो त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा.त्या दमून आल्यावर फक्त एक गोड हसू आणि थोडी विचारपूस.त्यांनाही आरामाची गरज असते.नोकरी करणाऱ्या स्त्रिया जे काही मिळवतात ते त्यांच्या कुटुंबासाठी च ना.मग थोडी मदत आणि समंजस पणा सगळ्यांनीच दाखवला तर त्यांच्या वरचा किती तरी ताण कमी होईल आणि त्या रोज नव्या उमेदीने कामाला लागतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


