Skip to content

‘जे होतं ते चांगल्यासाठीच’ या वाक्यावर प्रचंड विश्वास ठेवायला हवा….

‘जे होतं ते चांगल्यासाठीच’ या वाक्यावर प्रचंड विश्वास ठेवायला हवा….


मयुरी महेंद्र महाजन

पुणे.


“जो भी होता है,
अच्छे के लिये होता है”

हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असेल, परंतु आपण त्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो, किंबहुना आपल्या मनात जर आपण या वाक्यावर विश्वास ठेवायचा विचार केलात ,तर कितीतरी प्रश्‍न नव्याने तयार होतात, की जर का जे होतं ते चांगल्यासाठीच असेलं…. तर मग ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात, ते चांगल्यासाठीचं कशा असू शकतात ?????कधी कधी काही प्रसंग खूप वाईट असतात, आणि मग ते घडले ते, चांगल्यासाठीच कसे साहजिकच या प्रश्नांनी आपल्या मनामध्ये गोंधळ उडतो,

खरंतर प्रसंग किंवा घटना चांगली की वाईट हा भाग नंतरचा ,कारण एकाच्या अर्थी वाईट असणारी गोष्ट, दुसऱ्याच्या अर्थी चांगली असते ,हे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जगात वावरतात ,त्यामुळे या गोष्टीचा आपण लोड घ्यायचा नाही, प्रत्येक घटना प्रसंगात एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते, त्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन, लहान असताना छोट्या बाळाला जेव्हा आई सांगते, अरे !

दिव्या जवळ जाऊ नकोस, तुला चटका बसेलं, तरी बाळ जातोचं, आणि जेव्हा हाताला चटका बसतो ,तेव्हा नंतर पुन्हा ते दुरूनच त्या दिव्याला घाबरतो, त्याला चटका बसेल, हे दुःख आहे त्याचे, पण त्यातून तो शिकला हे त्या घटनेचे यश आहे, जे झालं ते चांगल्यासाठीचं, तसच आपल्यालाही आपल्या आयुष्यात चटके बसत असतील, तर नक्कीच आपण त्यातून शिकणारं, आणि पुढे जाणार…

परिस्थिती कधीकधी खूप मोठ्या परीक्षा घेते, दुष्काळात तेरावा महिना अशी वेळ येते, परंतु त्याच वेळेला आपल्यात असणाऱ्या, लपलेल्या क्षमता त्या माध्यमातून बाहेर येतात, आणि प्राणपणाला लावून आपण अजून मेहनत, कष्ट घेतो, जोपर्यंत खांद्यावरती जबाबदारीचे ओझे पडत नाही, तोपर्यंत कुठल्या गोष्टीची पाहिजे तितकी किंमत वाटत नाही ,

कोरोनाचा प्रसंग कोणी विसरू शकत नाही, बऱ्याच जणांनी त्यात आपली जवळची माणसं गमावली, ज्यांचे हातावर पोट होते, त्यांनी खूप यातना सहन करत दिवस काढलेत, परंतु या सर्वात आपल्या सर्वांना काय धडे मिळाले….., त्यातून आपण त्यातून काय शिकलो ,हे महत्वाचे आहे,

जीवन हे क्षणभंगुर आहे, आजच आपल्या जीवनाला आपल्या वर्तमानात आपण जगले पाहिजे, हे स्वास्थ, आरोग्य किती महत्त्वाचे आहे ,आणि सर्वात महत्वाचे आपले जीवन चक्र ज्यावरती सुरू आहे, तो श्वास किती महत्त्वपूर्ण आहे, खर तर ती नैसर्गिक क्रिया आहे, कुठली अतिरिक्त क्रियेशिवाय श्वास आत आणि बाहेर जातो, आपले लक्ष असो वा नसो.

आपण जागृत अवस्थेत असू किंवा झोपलेल्या, त्याचे काम पूर्ण करतो ,दिवसातून आपण किमान पाच मिनिटे तरी वेळ काढून आपल्या श्वासांवरती आपले लक्ष नियंत्रित करून दीर्घ श्वास घ्यायला हवेतं, कारण धकाधकीच्या जीवनात आपले त्याकडे लक्षच नाही….. त्यासाठी…..

माणूस भविष्याच्या कल्पनांमध्ये कितीतरी गोष्टींचे नियोजन करतो, हे असे, ते तसे, करायलाही हवेत… कारण नियोजनबद्ध गोष्ट नेहमी पूर्णत्वा जायला सोपी असते, परंतु जीवन काय आहे, हे जर आपल्याला समजले, तर नियोजन करणे सोपे होईल, कारण प्लॅनिंग करून आयुष्य नाही जगता येतं ….आपली पुढची वेळ काय आहे, याची चिंता न करता आपली आजची वेळ कशी सुंदरपणे जगता येईल, यावर जर आपण लक्ष देऊ शकलो, तर सुंदर आठवणींचा साठा आपल्याकडे जमा होईल,..

कधी कधी घटना प्रसंगाच्या मागचे नियोजन आपल्या तेव्हा लक्षात येत नसते, जेव्हा आपण त्याला सामोरे जातो ,परंतु जेव्हा ते आपल्या लक्षात येते, तेव्हा आपण सहाजिकच म्हणतो जे होते ते खरंच चांगल्यासाठीच,… असते ,कारण तसे नसते तर अनुभव म्हणजे काय याची प्रचिती आपल्याला आली नसती, एखाद्या वेळेस आपली चुकलेली वाट आपल्याला योग्य दिशेने जाण्यासाठी भाग पाडते ,म्हणून दुसर्‍यांदा पण शॉर्टकट घेताना विचार करूनच जातो…,

जर न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडला नसता ,तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध आपल्या लक्षात आला नसता, आणि यामध्ये त्या घटनेकडे त्या प्रसंगाकडे न्यूटनने ज्या दृष्टिकोनातून बघितले, ते जास्त महत्वाचे आहे ,समजा जर त्यांनी असा विचार केला असता कि या सफरचंदाच्या फळांना पिकण्या आधीच झाडावरून काढले, तर कोणाच्या डोक्यात पडण्याचा प्रश्नचं सुटेल ,परंतु वरून पडलेली वस्तू जमिनीकडेचं कशी येते????????? हा प्रश्न हा दृष्टिकोन होता,,,,,,, म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला….. तसेच आपल्या सोबत घडणाऱ्या घटना, प्रसंग यामागे काय तथ्य आहे ,आपण त्यातून काही धडा घेतोय,,,, का ?????जे काही होते ते चांगल्यासाठीच …

कारण कधी कधी आपल्या दुःखात सुद्धा ,आपले हित सामावलेले असते, त्यामुळे विश्वास ठेवा जे काही होते ते चांगल्यासाठीच, परिस्थिती माणसाला मजबूत करत असते, घडवत असते, आकार देते, आयुष्य कसे जगावे हे शिकवते, जाणीव देते, त्यामुळे माझ्या सोबतचं असे का ???????देव नेहमी माझ्या पाठीचं का लागतो,,,,

ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ,त्या आपण व्यवस्थितपणे सांभाळायला हव्यात ,संकट आणि दुःखाचा काळ, चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, फक्त आपण त्याकडे कसे बघतो, त्यामुळेच आपल्यात आणि इतरांमध्ये फरक काय कळतो, त्यामुळे आपल्या दृष्टी सोबत, आपला दृष्टिकोन सुद्धा वृद्धिंगत करायला हवा…!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “‘जे होतं ते चांगल्यासाठीच’ या वाक्यावर प्रचंड विश्वास ठेवायला हवा….”

  1. Shrikant Mahajan

    पडोसन सिनेमात काही संवाद/वाक्य फार फिलॉसफीकल आहेत. सायरा बानू चे वडील कायम म्हणताना दाखवलं आहे की जब जब जो होना हैं तब तब हो जायेगा. याच प्रमाणे मेहंमुद सुनील दत्तला दमात घेत म्हणतो की तुम आगे मत बढना, त्यावर सुनील दत्तला काही वाटत नाही हे पाहिल्यावर मेहंमुद परत म्हणतो हम पहले ही बोल देता की तुम आगे मत बढो अच्छा नाही होयेगा तुम आगे मत बढो त्यावर सुनील दत्त म्हणतो लो मैं आगे बाढ रहा हुं, बोलो तुम क्या करोगे त्यावर मेहंमुद उत्तरतो तो मैं पीछे जाऊंगा. प्रत्येकाने आपल्याला कधी माघारी जावं लागेल हे ताडलं पाहिजे व तसे त्यानं वेळेवर केलं पाहिजे. घडते ते घडू द्यावं असे ही गाद्धे पंचविशी या सदरातून मुलाखत देताना मराठी चित्रपट अभिनेता …कुलकर्णीने छान सोदाहरण विवेचीत केलं होतं लोकसत्ता पुरवणीत. कर्म करायचं पण त्याच्या फला कडे लक्ष नको ते राहील तर फल त्याग न झाल्याने गीतेतून शिकण्यास आपण कमी पडलो असेच म्हणावं लागेल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!