Skip to content

जे सत्य आहे, त्याचा स्वीकार करून पुढे जाऊया.

जे सत्य आहे, त्याचा स्वीकार करून पुढे जाऊया.


हेमा यादव-कदम I 7875550789


सत्य आनंदाने स्वीकारले कि ,
आयुष्य सोपे होऊन जाते
भरकटणारे मन मग
एका जागी स्थिर होते ….

जर कोणी आपल्या सोबत खोटे बोलले तर आपल्याला खूप राग येतो ,, आणि कधी कधी तर हा राग इतका वाढतो कि आपण समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकून न घेता त्या व्यक्तीशी संबंध हि तोडून टाकतो ….

जर इतरांनी आपल्याशी खोटे बोलल्यावर आपल्याला इतका राग येत असेल तर स्वतःशी खोटे बोलण्याची आपण स्वतःला कधी शिक्षा देतो का ? कधी कधी आपल्या अपयशाचे, दुःखाचे किंवा एकटेपणाचे कारण आपण स्वतःही असू शकतो याचा आपण कधी विचार करतो का?

आपल्या मनातील शंका किंवा प्रश्न हे तेव्हाच शांत होतात जेव्हा आपण सत्याचा स्वीकार आपल्या जीवनात करू … तुमच्या मनात ज्या विषयावर प्रश्न येतात त्या विषयांचे सत्य समजून घेऊन अंगिकारले नाही.. तर दुःख तुमचा पाठलाग कधीच सोडणार नाही जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहायला शिकले पाहिजे..

गोष्टी अशा का घडल्या याचा अभ्यास करून आपण कुठे चुकलो हे मान्य करणे म्हणजे सत्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे … . तुम्ही जर योग्य त्यावेळी तुम्ही चुकलात हे मान्य केले नाही तर सुधारणा अशक्यच आहे .

घटना चांगली असो वा वाईट असो ती घडल्यानंतर त्याची कारणमीमांसा करून सत्य समजून घेणे अति आवश्यक असते . आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या हातात आणि आपल्या डोळ्यासमोर असते . फक्त आपण ते कसे स्वीकारतो यावर आपले भविष्य ठरते,

मनाचे श्लोक जवळ जवळ सर्वानीच वाचलेले असतील अगदी लहानपणी शाळेत असताना श्री रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक पाठांतराला होते , त्यातील एक श्लोक आठवतोय का?

मना सर्वथा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
मना मिथ्य ते मिथ्य सोडून दयावे ..

हा श्लोक आपण फक्त वाचून पाठ केला आहे पण आचरणात आणला आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला पाहिजे … , कितीतरी असत्य आणि अशाश्वत गोष्टींमध्ये अडकून आपले जीवन आपण दुखी करून घेतले आहे… इतरांनी आपल्याला आपल्या कमतरता सांगितल्या कि आपल्याला खूप वाईट वाटते किंवा कधी कधी रागाच्या भरात आपण कधी चुकणारच नाही या खोट्या भ्रमात आपण जगत असतो … स्वतःशी खोटे बोलून कोणीही कधीही यशस्वी होऊ शकत नाही ..

आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी आपण १००% प्रयत्न करायलाच हवेत. पण हे प्रयत्न करत असताना आपण आधी “कुठे कमी पडतो हे जाणून घ्यायला पाहिजे ” आपल्या मध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत हे सत्य आपण जाणून घेतले आणि स्वीकारले कि , मग त्यावर काम करणे सोपे होते , आणि अपेक्षित यशहि सहजच मिळून जाते …

1. आपल्यामध्ये कमतरता आहेत आधी हे सत्य स्वीकारा ..
2. त्या कमतरता कोणत्या त्याची यादी करा … व त्या कशा दूर करायच्या यासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करा .. त्यावर प्रामाणिक पने काम करा …

3. ज्या दिवसापासून आपण स्वतःसोबत खरे बोलायला सुरवात करू त्यादिवशी आपण स्वविकासाकडे आपले पहिले पाऊल टाकले असे म्हणता येईल .
4. कोणालातरी अपेक्षा आहेत म्हणून मला यशस्वी व्हायचंय कि मला स्वतःसाठी जग जिंकायचे या प्रश्नाचे उत्तर स्वतःला खरे खरे द्या .. मग त्यानंतर योग्य मार्ग हि दिसेल आणि यश हि मिळेल ..

धन्यवाद.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जे सत्य आहे, त्याचा स्वीकार करून पुढे जाऊया.”

  1. वृषाली जगताप

    आपण स्वत:शीच खोटे बोलून समाधान मानतो वस्तुस्थिती पासून दूर पळतो

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!