जे बदलू शकत नाही , त्याबद्दल विचार करणं सोडून द्या…!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आपण माणूस आहोत आणि विचार करणं हा आपला अगदी सहज स्वभाव आहे. एखाद्या छोट्या गोष्टीचा सुद्धा आपण इतका विचार करतो की विचार करून करून कधी कधी दमायला होतं.पण इतक दमूनही आपण विचार करणं मात्र सोडत नाही. सतत त्या गोष्टीभोवती आपण फिरत बसतो.कितीतरी वेळ आपण विचार करण्यातच खर्च करतो.वेळेचही भान अशावेळी राहत नाही. म्हणून विचार करावा पण त्याला काहीतरी एक ठराविक अशी मर्यादा असावी.म्हणजे मन , मेंदू ,शरिर यांनाही थोडासा आराम मिळेल.
बऱ्याचदा आपण अनेक गोष्टी बदलायला पाहतो.पण मुळातच त्या गोष्टी बदलण्यासारख्या मुळीच नसतात.पण तरीही आपल्याला वाटत असत की आपण काहीतरी करून त्या गोष्टी बदलायला हव्या. आपण शर्थीचे प्रयत्न करतो आणि गोष्टी बदलायला पाहतो.गोष्टी बदलतील असा आपल्याला कुठेतरी विश्वास असतो पण काही गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी त्या बदलत नाहीत.आपलं मन मात्र अशावेळी अधिकाधिक हट्टी आणि जिद्दी होतं.
मला ही गोष्ट बदलायची आहे आणि ती मी काहीही करून बदलणारच…..असा आपला स्वभाव केव्हा होतो कळतही नाही. अशा या हट्टी स्वभावाला आवरही घालता येत नाही.जे बदलू शकत नाही त्याचा आपण अगदी खोलात जाऊन विचार करतो . का..?? कशासाठी…?? तर….आपल्याला कुठेतरी वाटत असतं की यात काहीतरी बदलायला हवं , आपण प्रयत्न केला तर नक्कीच आहे त्यात काहीतरी बदल होऊ शकतो..
म्हणून आपण असा विचार करतो.खरं तर बदल करणे काही चुकीच मुळातच नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्यात बदल करणं खरच असं सहजासहजी कदापि शक्य नसतं.त्यामुळे काही गोष्टी आपण बदलायला जाऊ नयेत . आहे तशा त्या स्वीकारायला हव्यात.खोलात शिरून , क्षणाक्षणाला त्याच गोष्टीविषयी विचार करणं म्हणजे मेंदूला आणि मनाला ताण देण्यासारखच आहे.’
आणि कितीतरी वेळ आपण विचार करण्यातच घालवतो.आणि अनेकदा गोष्टी मात्र जशाच्या तशाच राहतात.आपण इतका विचार केला , पण काहीच बदलल नाही याचा मात्र नंतर आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे जे बदलू शकत नाही , त्याबद्दल फारसा विचार करणं सोडून द्या.तोच वेळ कुठेतरी काहीतरी चांगल घडवण्यासाठी खर्च करा.
आता काय बदलू शकत नाही तर———— नैसर्गिक आपत्ती थांबवण किंवा बदलण सहजासहजी खरच शक्य नाही. पण अगदी विचारांच वादळ आल्यासारखी आपली अवस्था होते.एकदा ते घोंघावत राहीलं की ते केव्हा थांबेल काहीच सांगता येत नाही. वादळाला थांबवण आपल्याला शक्य नसतं तरीही विचार करायच आपण सोडून देत नाही. आयुष्याची प्रश्नपत्रिका आपण बदलू शकत नाही. प्रत्येकाला वाटत की आयुष्य एक खडतर परिक्षा आहे. जर आयुष्याची ही प्रश्नपत्रिका बदलता आली तर…..
असा विचार करत करत थेट कुठेतरी लांब पोहोचतो आपण..पण प्रश्न कधीच बदलायला जमत नाही. त्यामुळे असा विचार करणं सोडून द्या. आयुष्याची प्रश्नपत्रिका बदलू शकत नाही पण ती उत्तर मात्र नक्कीच बदलू शकतो हे आपण लक्षात घ्यायला हवे.कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात.त्या वेळेवर सोडून द्यायच्या असतात हे आपण सगळेच ऐकतो.आणि कधी कधी याची नकळतपणे आपल्याला जाणीवही होते.
पण मग तरीही आपण गोष्टी बदलायचा विचार करतो.हे असं होऊ शकतं , तसं होऊ शकतं वगैरे वगैरे विचार आपण करतो. खरतर वेळ अनेकदा निघून गेलेली असते आणि आपण वेळेलाच बदलायाल निघतो.टाईम मशीन जणू काही आत्ता आपल्या हातातच आहे असे आपण वागत असतो.पुढच्या सेकंदाला ही ही गोष्ट बदलली पाहिजे असं म्हणून गोष्टी बदलायचा प्रयत्न करतो खरा…पण तो प्रयत्न किती यशस्वी होतो हे ज्याच त्याला माहीत. पण वेळ मात्र नक्कीच खर्च होत असणार यात काही शंकाच नाही.
मान्य आहे , की आपल्याला सगळं आपल्या मनाप्रमाणे किंवा योग्य घडावं असच वाटत असतं.आणि तसं झालं नसेल किंवा तसं होत नसेल तर आपण त्या गोष्टी बदलायला पाहतो.जरी ते बदलणं शक्य नसलं तरी….!
सांगायच इतकच की , जे बदलणं खरच सहजासहजी अजिबात शक्य नाही ते बदलण्याचा जास्त विचार करणं सोडून दिलं पाहिजे कारण त्याने गोष्टी बदलणार नसतात.उलट आपणच विचार करून दमणार असतो.त्यामुळे विचार करायचा असेल तर विचार त्याला काहीतरी मर्यादा ठेवावी. असं म्हणतात विचारांना काही मर्यादा नसते पण…तरीही… विचार करा पण , एका मर्यादेपर्यंत….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


