Skip to content

जे जाते ते परत येते, आपल्यात फक्त गुरुत्वाकर्षण पाहिजे!

जे जाते ते परत येते, आपल्यात फक्त गुरुत्वाकर्षण पाहिजे!


टीम आपलं मानसशास्त्र


वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात.

न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला माहिती आहेच. झाडावरचे सफरचंद पक्व झाल्यावर खाली पृथ्वीवर पडते. म्हणजे ज्या जमिनीतून झाड वरती उगवते . त्यावर फांद्या फुटतात. आकाशातल्या फांदीला वरती फळ आले तरी ही ते पिकल्यावर खालीच पडते.
वर फेकलेले किंवा आधार नसलेले पदार्थ नेहमी खाली जमिनीवरच पडतात, हा आदिमानवापासून आजतागायत पहाण्यात येत असलेला आविष्कार आहे. कारण अशा पदार्थांना पृथ्वी आकर्षित करीत असते किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तुकण दुसऱ्या वस्तुकणाला आकर्षित करीत असतो,

मानसशास्त्र Psychology, सायकॉलॉजी 😉 हे मन व मानवी वर्तन यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा इंग्रजी शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाज्याने मांडली. psyche साईक'(मन)’ व logus लोगस(शास्त्र) या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ.

मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती मनाला होत असते.

थोडक्यात आकाशात टाकली वस्तू तरी खाली पडणार , पृथ्वीवर , या गुरुत्वाकर्षण नियमा प्रमाणे , आपण ही काय करत असतो , तर मन जसा विचार करत असते तसे वर्तन घडत असते. , इतरांच्या बरोबर जसे बोलतो तसे ते आपल्याशी बोलतात. तशीच देवाणघेवाण होते. तुम्ही वाद घातले तर समोरची व्यक्ती शब्दाला शब्द वाढवत जावून वाद च घालणार.

तुम्ही जर चांगले विचार समोरच्याकडे पाठविले तर ते समोरून ही चांगलेच विचार येतील. हे विचार , वर्तन यांचे आकर्षण होत राहणार.
उदाहरणार्थ : निशा आणि समीर हे प्रेमात आकंठ बुडले असतात. काही दिवसांनी समीरच्या मित्राकडून निशा ला समीर चे आधीचे प्रेम आणि ब्रेकअप विषयी समजते . तरी ही ती आधीची समीरची प्रेयसी सपना आणि समीर बोलत असतं. फोन असे.

जेव्हा पासून निशा ला त्यांच्या विषयी समजले तेव्हापासून ती समीर वर त्याच्या प्रेमावर शंका घेवू लागली. भरीत भर सपना आणि समीर बोलू लागले की त्यांच्यात अजून काही आहे हीच शंका मनात वाढत असे.

अर्थात हे नकारात्मक विचार वाढीला लागले त्यातून मन विचार करत असे तसे वर्तन घडते. मग उगीच समीर मध्ये आणि निशा मध्ये अंतर वाढू लागले, वाद होवू लागले. तसे ते एकमेकांपासून दूर राहू लागले. दोघांच्यात जे प्रेम होते त्याची जागा शंका आणि दुरावा यात आले. म्हणजे एक नकारात्मक विचार तुमच्याकडे अनेक नकारात्मक गोष्टींचं घेवून येत असतात. संकटे आली घाबरून राहिलात तर संकटातून मार्ग सापडण्या ऐवजी अजून त्यात अडकत जाता.

तसेच आहे सकारात्मक गोष्टी बाबत ही.
जे जाते ते परत येते, आपल्यात फक्त गुरुत्वाकर्षण पाहिजे!

आपण जर सकारात्मक विचार , कृती केली तर तशीच आपल्याला ही अनुभवायला मिळते. परीक्षेचा चांगला अभ्यास केला आणि आत्मविश्वास , सातत्य , पाठांतर , मेहनत या जिद्दिवर पेपर लिहिले आणि ठाम विश्वास असला की माझा अभ्यास चांगलाच झाला आहे आणि पेपर ही चांगले गेले आहेत . मला यश मिळणारच , तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. म्हणजे काय अभ्यासाच्या जोरावर , आत्मविश्वास , सातत्य आणि सकारात्मक विचार आणि वर्तन या जोरावर मी यश खेचून आणते.

पण बरेचदा अभ्यास करूनही मनात नकारात्मक विचार असतील , आत्मविश्वास डळमळीत असेल , मला येईल का , मी जो अभ्यास केला त्यातले येईल का याची शंका येत गेली तर मात्र तुम्हाला परीक्षेत जो अभ्यास केला ते ही विसरायला होते, प्रश्न थोडेसे फिरवून आले की गांगरून जायला होते. पेपर अवघड जातात आणि अपयश येते म्हणजे काय होते की माझ्यातल्या नकारात्मक विचार आणि वर्तन यातून मी तयारी करून ही अपयशी ठरते.

आपण जे विचार करतो तसेच वर्तन घडते. Positive विचार आपल्याकडे positive गोष्टीचं घेवून येतात. आणि त्यातून आपण अजून चांगले करण्याची प्रेरणा घेतो Motivation घेतो.

एका गावातल्या एका हॉटेल मध्ये एक परदेशी पर्यटक येतो . तो त्या हॉटेल मालकाला म्हणतो मला राहण्यासाठी एक रूम पाहिजे. ठीक आहे मालक म्हणतो . पाचशे रुपये होतील . तो पर्यटक ते पाचशे रुपये देतो आणि मालकाला म्हणतो मला रूम आवडली तरच मी राहणार नाही तर मला माझे पैसे परत पाहिजे आहेत. मालक बरं म्हणतो. तो पर्यटक रूम बघायला जातो.

तेवढ्यात मालक विचार करतो की आपल्याकडे हे ५०० रुपये आहेत त्यातून आपले देणे देवून टाकू. एकदा मनात हा विचार पण येतो की पर्यटकाला रूम आवडली नाही तर पैसे परत द्यावे लागतील . पण क्षण भर च तो विचार येतो आणि दुसऱ्या क्षणी हा हॉटेल मालक हे नकारात्मक विचार मनातून काढून टाकतो. तो दूधवाला असतो त्याला त्याचे देणे देतो. आणि आपले कर्ज फेडतो. तो दूधवाला ते ५०० रुपये चारावाला असतो त्याला देतो.

कारण त्याचे बाकी असतात. हा चारावांला हे ५०० रुपये शेतकऱ्याला देतो. कारण शेतकऱ्या कडून तो चारा घेत असतो पण त्याचे देणे बाकी असते. शेतकरी धावत पळत त्या हॉटेल मध्ये येतो त्या हॉटेल मालकाला देतो आणि म्हणतो एकदा मी खूप भुकेजला होतो आणि माझ्याकडे पैसे नव्हते तरी तुम्ही मला पोटभर खाण्यास दिले होते.

अशारीतीने ते पैसे हॉटेल मालकाकडून सुरू होवून परत हॉटेल मालकाकडे च आले. पण ठेवढ्यात दूधवाला , चारावाला, शेतकरी या सगळ्यांचे कर्ज ही भागवून झाले होत आणि तरी ही ते पैसे परत हॉटेल मालकाकडे आले होते. तो परदेशी पर्यटक त्याला रूम पसंत नाही हे सांगून त्याचे पाचशे रुपये परत घेवून जातो.

या कथेत आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो की ,जे जाते ते परत येते, आपल्यात फक्त गुरुत्वाकर्षण पाहिजे! हॉटेल मालक अतिशय चांगले विचार करून , सकारात्मक विचार करून , आपल्याला जसे पैशाची गरज तसे इतरांनाही असते हा विचार करून आलेले पैसे पहिले देणी देण्यासाठी वापरतो . जे पैसे जातात त्याच्याकडून तेच शेवटी फिरून येतात. त्याकरिता आपल्यात नक्कीच आकर्षण पाहिजे.

तुम्ही विचार केले की हे पैसे साठवून ठेवू , नको कोणाला द्यायला असा स्वार्थी विचार करून तसेच ठेवले असते तर इतरांचे देणे ही झाले नसते आणि परत ती रूम पसंत पडली नाही म्हणून हे पैसे त्या परदेशी पर्यटकाला परत द्यावे लागल्यावर याचे कर्ज , देणं तसेच राहिले असते. आणि या हॉटेल मलकाचेच नाही तर त्यावर चारावाला, शेतकरी यांचे ही कर्ज अवलंबून होते तेही अडकून राहिले असते.

पण केवळ वेळीच घेतला गेलेला सकारात्मक निर्णय , गुरुत्वाकर्षण यातून चांगले विचार, दुसऱ्याला मदत करण्याची प्रबळ इच्छाशक्ती ही त्या हॉटेल मालकाचे ऋण ही फेडून , सगळ्यांचे ऋण फेडून ही कोणाच्याच खिशातले पैसे खर्च झाले नाहीत.

मानसशास्त्र आणि मन , वर्तन यात गुरुत्वाकर्षण नियम हेच तर सांगतो तुम्ही जे चांगले विचार कराल ते समोरच्याला तुमच्या बोलण्यातून , वर्तनातून जाणवू द्याल तसेच विचार आणि वर्तन तुम्ही तुमच्याकडे समोरच्याकडे खेचून घेता.

राकेश झुनझुनवाला हे पण आपल्याला सध्या हेच सांगतात की तुम्ही शेअर्स मध्ये पैसे invest केले तर त्यातून प्रॉफिट मिळेल , आपल्याला प्रॉफिट होणार या विचाराने शेअर्स घेवून जर ते योग्य वेळी विकले तर आपण आपल्याकडे जास्त प्रॉफिट खेचून आणणार. जर ते shares तसेच ठेवले तर प्रॉफिट नाही मिळणार. जे जाते ते परत येते, आपल्यात फक्त गुरुत्वाकर्षण पाहिजे!

मग इतरांच्या विषयी तुम्ही चांगले विचार केले तर चांगले विचार तुम्ही तुमच्यापर्यंत खेचून आणणार. इतरांच्या विषयी तुम्ही वाईट विचार केले तर त्यात अजून भर घालून तुम्ही जे विचार मांडले ही नाहीत तेच तुम्हाला जवळपास हुंन ऐकावयास मिळतात. हेच खेचून येतात तुमच्याजवळ. शिवाय असे तुम्ही बोलत होता असेही त्यामुळे दोन्ही कडून , तुमच्या स्वतः कडून आणि इतर लोकांकडून परत तुमच्याकडे असे तुमचेच विचार खेचून परत येणार.

आयुष्य सुंदर आहे. सकारात्मक विचार , वर्तन करून तसे वागला , तसे विचार केले तर सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक परिणाम , गोष्टीचं तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करून घेणार.

झाडावरचे फळ खाली पडते. जमिनीवरून हवेत फेकलेला चेंडू हवेतून परत जमिनीवरच पडतो. तसे तुमच्या डोक्यातून दुसऱ्याच्या डोक्यात गेलेले , पाठविलेले विचार , एखाद्या विषयी वाईट बोलणे असेल किंवा एखाद्या विषयी तुम्ही चांगले बोललात तर परत तुमच्याकडे येत असतात.
एखाद्या खेळाडू चे तुम्ही कौतुक केले किती छान खेळतो तर त्या खेळाडू ला आनंद होतो की तुम्ही त्याचे कौतुक केले म्हणून तो तुमच्या विषयी खूप चांगले विचार , गोष्टी , वर्तन करतो , म्हणेच काय जे जसे जाते ते तसेच तर किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही आकर्षण नियमानुसार तुमच्याकडे परत खेचून घेता.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!