Skip to content

जे आपल्याला समजू शकले नाही, त्यांना आपल्या वेदना कळू देऊ नका!

जे आपल्याला समजू शकले नाही, त्यांना आपल्या वेदना कळू देऊ नका!


सौ.मयुरी महेंद्र महाजन

पुणे(चिंतामणी चौक)


“हर कोई तुम्हें नही समझ सकता
यँही तो जिंदगी है””

या ओळी वाचून कदाचित तुम्हाला असे वाटू शकते की आपल्याला कोणी समजू शकत नाही ते आपले जीवन कसे काय असू शकते?? आयुष्य प्रवाही आहे ते कुणासाठी थांबलेले नाही नाही ते थांबणार आहे ….. चँलते रेहने का नाम ही जिंदगी हे मेरे दोस्त ….त्यामुळे चालत राहा….

आयुष्याच्या वाटेवर नानाप्रकारची कितीतरी लोक आपल्याला प्रत्येकाला भेटत असतात मग त्यात तुमचे नातेवाईक असो,किंवा तुमच्या दोन प्रेमळ शब्दांनी माणुसकीतून जुळलेले ऐखादे बंध असो किंवा मैत्री सारख्या रक्ताचं नसलं तरी आपलं असतं असं जिव्हाळ्याचंअसो, अशी कितीतरी की त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्या अनमोल जीवनात त्यांच्या असण्याचा वाटा अमूल्य असतो …

लक्षात घ्या कधीकधी आपली वाटणारी माणसं आपली नसतात…. ते फक्त दाखवण्यासाठी आपली असतात…. मला सांगा सर्वचं लोक आपल्याला समजून घेतात का?? नाही असे होत नाही जी माणसे खरंच आपली असतात ते आपल्याला समजून घेतात आणि समजून सांगत सुद्धा असतात, परंतु जे आपल्याला समजू शकले नाही अशांना आधी ओळखा त्यांची ओळख पटवा आणि अशा व्यक्तींना आपल्या वेदना कळू देऊ नका.

कारण मित्रहो जखम बघून त्यावर औषध लावण्यापेक्षा मीठ लावणार्‍यांची संख्या जास्त आहे …ज्यांना आपण काय आहोत हेच कळले नाही ती आपल्याला समजू शकले नाही त्यांना आपल्या होणाऱ्या वेदना तरी काय कळतील तुम्हाला जर खरंच आपल्या वेदनेवरती विजय मिळवायचा असेल तर ज्या व्यक्ती तुम्हाला समजून घेतात अशा हक्काच्या ठिकाणी जरूर व्यक्त व्हा त्यांची आजच्या घडीला नितांत गरज आहे, त्याच्या सोबत तुम्ही स्वतः कुणाचे हक्काचे ठिकाण होण्याचा जरूर प्रयत्न करा परंतु निरपेक्षपणे बघा या गोष्टीचे खूप जास्त समाधान मिळेल…..

आज-काल आपली जीवनशैली झपाट्याने बदलत आहे आणि या बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या सर्वांवर प्रत्येक वयाच्या जीवन माणसात आपल्याला बघायला मिळतो प्रत्येकाला वाटतं सर्वांनी मला समजून घ्यावे जसे आपल्याला वाटत असतं तसेचं समोरच्या व्यक्तीलाही वाटतं मला समजून घ्यावं बघा आपण कितीही चुका केल्या तरी आपले आई-वडील आपल्याला समजून घेतात आणि वेळप्रसंगी दमदाटी करतात.

कारण आपल्याला चांगले वळण लागावे यासाठी ,कठोर भूमिका घेतात वेळेनुसार प्रत्येकाला समजून सांगताना सुद्धा दिसतात हे का घडते कारण ते आपल्याला समजतात, जाणतात त्यांनी आपल्याला समजून घेतलेलं असतं, म्हणून त्या ठिकाणी बघा शाळेत असताना जेव्हा आपल्या हातून काही चूक झाली असेल तर त्यासाठी आपल्याला शिक्षकांकडून रागाने ओरडणे वेळेप्रसंगी शिक्षा सुद्धा भोगावी लागले असेल मग आपली चूक जरी शुल्लक असेल ,त्यांच्या अर्थाने ती चूक असणारी तुमच्या ठिकाणी एखाद्या खेळाची पद्धत असेल, तरीसुद्धा असे नाही की प्रत्येक शिक्षक असेच असतात परंतु आपण उदाहरणांनी ती गोष्ट चांगल्या पद्धतीने समजू शकतो म्हणून….,

बऱ्याच वेळा आपल्याला असे बघायला मिळते की सांगणाऱ्याच्या शब्दांपेक्षा त्याला होणाऱ्या वेदनांच्या कळांकडे व्यक्तीचे लक्ष नसतं जे आपल्याला समजून घेतात त्यांना आपल्या वेदना सांगायची गरज भासत नाही ते आपल्या आवाजाच्या चढ-उतार यावरुनसुद्धा आपल्या सुखदुःखाचा अंदाज लावू शकतात, जे मला समजू शकले नाही त्यांना हक्क आहे मला वाईट समजण्याचा कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की काही निर्णय घ्यावे लागतात.

आणि आपण घेतलेल्या निर्णयामुळे काही जण आपल्याला चुकीचे समजतात किंवा आपल्यापासून कायमचे दूरावतात परंतु आपल्याला होणाऱ्या वेदना मात्र त्यांना कधीही माहिती नसतात, कारण अशी माणसे आपल्याला समजून घेण्यात कमी पडतात…. मित्रांनो जीवनाच्या वाटेवर या सुवर्ण क्षणांचा आनंद घेत असताना कधी स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका कारण माहितीय आपण प्रत्येकाचा विचार करण्यात वेळ घालवतो परंतु प्रत्येकाला न्याय देता देता आपण स्वतः चं स्वतः वरती कितीदा आणि किती पद्धतीने अन्याय करतो हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.

जे आपल्याला समजू शकत नाहीत त्यांचा विचार करायचा नाही फक्त आपल्या वेदना कळू देऊ नका…. आपण आपल्याला समजून घेतले पाहिजे कारण तेचं समजून घेण्याची पहिली पायरी आहे आणि सगळ्यांनीच आपल्याला समजून घ्यावं हा अट्टाहास तरी कशासाठी काही जणांच्या डोळ्यात खटकण्यातसुद्धा मजा असते, प्रत्येकाजवळ आपले दुःख सांगत बसू नका, कारण प्रत्येकाजवळ औषध नसतं परंतु मीठ मात्र नक्की असतं त्यामुळे दुःख तुमचे आहे, वेदना तुम्हाला होत आहे, त्यासाठी त्या दुःखाशी दोन हात करून लढाईची तयारी सुद्धा तुमचीचं असली पाहिजे…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!