Skip to content

जेव्हा विश्वास मोडलेला असतो, तेव्हा सॉरी सुद्धा काहीच करू शकत नाही.

जेव्हा विश्वास मोडलेला असतो, तेव्हा सॉरी सुद्धा काहीच करू शकत नाही.


सोनाली जे.


विश्वास हा कोणावर ठेवतो आपण?? विचार केला होतात का कधी?? 😊विश्वास हा आपण आपल्याच लोकांवर ठेवत असतो…आणि काही वेळेस बाहेरचे लोक आपले वाटू लागतात तेव्हाच…,👍

अनेक वेळा एखाद्या व्यक्तीवर..मित्र..मैत्रिणी , नातेवाईक , ऑफिस मधले सहचारी , किंवा अगदी नवरा ..बायको..बहीण भावू ..किंवा आपल्या मुलांवर प्रमाणापेक्षा आपण जास्त विश्वास ठेवतो कारण आपण त्यांना आपलेच मानलेले असते…परंतु आयुष्यात कधी तरी अशी वेळ येतेच की या विश्वासाला तडा जातो …आणि तेव्हा जे expectation पूर्ण होत नाही त्या गोष्टी accept करणे जमत नाही…आणि तेव्हा कोणी ही काही ही सांगितले किंवा अगदी त्याच व्यक्तीने sorry म्हणले तर त्याचा त्या क्षणी फायदा होत नाही किंवा फरक पडत नाही..कारण काय तर विश्वासाला तडा गेल्याने , Freud यांच्या theory नुसार sorrow , anger, loneliness, या भावना तेव्हा strong असतात ..

असेच एक छोटीशी गोष्ट आठविली ती मांडते..एक नवरा बायको असतात तसे गरीब कुटुंब म्हणले तरी चालेल…त्यांची एक गाय असते…त्या गाईचे दूध विकून ते त्यांची गुजराण करीत असतात .ते त्यांच्या गायीची जास्ती च काळजी घेत..त्यांची गाय आता भरपूर दूध देवू लागली..त्यावरून दोघांची चर्चा सुरू झाली…नवरा बायको म्हणतात आता दूध भरपूर निघते आपण त्याचे या मातीच्या हंड्यात खूप सारे विरजण लावूयात..त्या दह्याचे ताक करुयात आणि भरपूर लोणी काढून…

ते लोणी निघेल त्याचे तूप करुयात हो आणि ते विकून आपण पैसे पण कमवूयात…हे बोलताना बायको म्हणते हो पण हा मातीचा हंडा माझा आहे मी त्यातले थोडे दूध, दही , ताक, लोणी आणि तूप माझ्या माहेरच्यांना ही देणार…नवरा चिडतो तो म्हणतो पण गाय तर माझी आहे मग मीच ते सगळे विकून पैसे मिळविणार…दोघांचे भांडण विकोपाला जाते..रस्त्यावरून येणारे जाणारे लोकं ही ऐकून पुढे जात असतात…अचानक एक सद्गृहस्थ त्यांचे वाद ऐकून थांबतो…तो बघत असतो त्यांचे भांडणं…खूप वादावादी नंतर बायको चिडून सगळे मातीचे हांडे रागा रागात फोडते..

तेव्हा तो सद्गृहस्थ एकदम ओरडत येतो आणि म्हणतो तुमच्या गायी नी माझ्या शेतातलं सगळे पीक खाल्ले…माझे नुकसान झाले…ते नवरा बायको भांडणं थांबवून बघतात तर गाय तर तिथेच गोठ्यात बांधलेली..मग तो सद्गृहस्थ असतो त्याला म्हणतात कसे शक्य आहे तुझ्या शेतात कधी गाय आली ती तर इथेच बांधली ..दाखव तुझे शेत कुठे आहे ते…

तेव्हा तो सद्गृहस्थ म्हणतो की अजून कुठे घेतले मी शेत..त्यावर हे नवरा बायको अजूनच आश्चर्य चकित होतात आणि म्हणतात शेतच नाही तर काही काय आरोप करता…तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार?? तेव्हा तो सद्गृहस्थ म्हणतो माझे जसे शेत नाही तसे तुमच्या तर गाईने अजून कुठे भरभरून दूध दिले?? आणि तुम्ही त्याच्या पुढचे विचार करत बसलात..दूध .. दही..ताक..लोणी..तूप..आणि ते कोणाला देणार..विकणार यावरून दोघात वाद..

नवरा भांडला कारण त्याची गाय आणि ही बायको तिच्या माहेरी सगळे देणार…म्हणजे खरेच देईल ती मग माझे मिळणारे पैसे कमी होतील , आपल्याला न सांगता ..नकळत देईल ..त्याचा बायकोवर असलेला विश्वास कमी होतो…जवळपास उडतोच…ह्या उलट बायको म्हणते हांडे माझे आहेत त्यात दूध..दही .. ताक ..लोणी काढणार आणि तूप करणार मग नवरा च एकटा का त्याचा मोबदला घेणार ..आपल्याला न सांगता हा विकेल ..पैसे मिळवेल विश्वासघात करील म्हणून ती मातीचे हांडे भांडणात ..रागात फोडते…

तेव्हा हा सद्गृहस्थ मध्ये पडत नाही कारण त्याने दोघांना त्या क्षणी काही ही सांगितले असते तरी ते दोघे एव्हढे रागात भांडत होते की दोघांनी ऐकले नसते..त्यामुळे हांडे फुटले तेव्हा वातावरण अधिकच गंभीर आणि शांत ही झाले होते…तेव्हा या सद्गृहस्थ येवून खोटेच बोलतो की शेत खाल्ले गायीने तुमच्या तेव्हा या दोघांना परिस्थिती ची जाणीव झाली..ते भांडणं , राग , वाद , अविश्वास सोडून त्या तिसऱ्या व्यक्ती ला विरोध करू लागले..

पण तोपर्यंत वाद , अविश्वास , राग या गोष्टी नी त्यांचे हांडे फोडले होते आणि त्यात साठवून पुढचे सगळी होणारी प्रक्रिया ही थांबली होती…
थोडक्यात काय त्या नवरा बायकोच्या भांडणात दोघे एव्हढे अविचारी झाले होते किंवा मानसिक संतुलन बिघडवून गेले होते की दोघेही माघार घेण्यास तयार नव्हते किंवा कोणी ही दोघांपैकी विश्वास ठेवण्यास तयार नव्हते…त्याक्षणी sorry म्हणले असते तर अजून जास्त भावना किंवा राग उफाळून आला असता ..त्यामुळे जेव्हा विश्वास उडतो तेव्हा शांत राहून थोडे वातावरण निवळण्याची वाट बघावी..

जसे तो सद्गृहस्थ येवून बोलल्यावर त्यांना वास्तवाचे भान आले..आणि ते दोघे परत एकत्र झाले ..त्यांच्या वागण्यात बोलण्यात बदल झाला जणू काही त्यांना त्यांच्या वादाचे..रागाचे…अविश्वास दाखविल्याचा पश्चात्ताप झाला आणि ते दोघे एक होवून त्यांच्या गाईला वाचविण्याचा प्रयत्न करू लागले..

आपल्याही आयुष्यात असे अनेक क्षण येतात ..आपण राग..चिडचिड करतो अविश्वास दाखवित असतो..अशा वेळी अगदी गरजेचे काय तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे… माणूस आहोत..मन, भावना, राग , लोभ , विश्वास , या गोष्टी होणारच पण त्यावर आपण कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला तर Balanced life जगता येईल…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!