जेव्हा एखादा नको ,ते सल्ले देत बसतो,तेव्हा ईग्नोर कसे करावे…
मयुरी महेंद्र महाजन
जगाच्या पाठीवर सल्ला ऐकला नसेलं, असे कोणी नाही, असतीलं तर अपवादचं… कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, कधी ना कधी आपण सल्ला ऐकला असेलचं, मग कधी आपल्याला त्याची गरज असेलं, किंवा नसेलही, कदाचित …..व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत, कुणीही कुणासारखे होऊ शकत नाही, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे,
प्रत्येक व्यक्ती एका पेक्षा दुसरा भिन्न आहे, त्यामुळे काहींचा हा जन्मजात स्वभावही असू शकतो, काही जण अशा गोष्टी करत करत सवय करून घेतात, बऱ्याचदा आपण अशा परिस्थितीमध्ये अडकून पडतो ,की आपल्याच आपल्यालाचं त्यातून बाहेर कसे पडायचे, हे सुचत नाही, त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीत असताना, आपले असे काही हावभाव की, ज्यातून समोरच्या व्यक्तीला नकळत असे संदेश पोहोचतात, की आता नक्की मी पुढे काय करायचं…
आणि मग सल्ले देणारी माणसं ,अश्या प्रश्न चिन्हांच्या शोधात असतात, आणि ज्या ठिकाणी कोणी आपल्याला सल्ला मागितला नाही, त्या ठिकाणी ही माणसे सल्ले देत असतात ,आणि त्यात त्यांची गफलत होते, ती म्हणजे ज्याला सल्ला देतो, त्याची परिस्थिती व त्या परिस्थितीच्या दृष्टीने सल्लामसलत न होता, नको ते सल्ले देत असल्यामुळे, समोरची व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये आधीच गोंधळलेली असते ,
आणि त्यामध्ये अजून पडलेली भर त्यातून सुटका होण्या ऐवजी, माणूस त्यात अजून गुंतत जातो, आणि तो गुंता असा होतो, की सोडवतांना नुसती ताणा ताण होत असते, सल्ला घेऊ नका ,असे अजिबात नाही, परंतु सल्ला घेत असताना, जरा काळजी घ्यावी, कारण आपण कोणाचा सल्ला घेत आहोत ,हे खूप महत्त्वपूर्ण ठरते, आणि विशेष म्हणजे सल्ल्याची गरज नसताना ,जर कोणी विनाकारण नको ते सल्ले देत असेल ,तर अशा व्यक्तींना इग्नोर कसे करावे????
बघा बर्याचदा आपण अनुभव घेतला असेल ,की जेव्हा दोन व्यक्ती मध्ये संभाषण सुरू असते, तेव्हा बोलणारा आणि ऐकणारा, या दोघांमध्ये जेव्हा ऐकणारा, लक्षपूर्वक किंवा काळजीने ऐकत नसेल ,तर बोलणारा आपलं बोलणं थांबवतो, का???? कारण की त्याला हे कळून चुकतं की तो जे काही सांगत आहे ,हे त्याच्या दृष्टीने काही कामाचे नाही, किंवा उगाच आपण आपली एनर्जी वेस्ट करतोय ,जर आपण इतके सांगूनही समोरची व्यक्ती ऐकत नसेल ,तर आपल्या सांगायला अर्थच नाही ,असे वाटू शकते,
सल्ले देणाऱ्यांमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वपूर्ण ठरते ,ती म्हणजे सल्ला देणारी जी व्यक्ती आहे, ती त्याची नीतिमत्ता कशी आहे, कारण सल्ले देणारी प्रत्येक व्यक्ती तुमचं भलंचं चिंतेलं, याची शाश्वती नाही, कारण बऱ्याच वेळेला आपली दिशा चुकवण्यासाठी किंवा आपली वाट चुकून आपण भरकटण्यासाठी, सुद्धा हे केले गेलेले प्रयत्न असू शकतात, सगळीच माणसं अशी असतीलं, असे नाही,
परंतु वास्तव नाकारूनही चालत नाही, त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करण्याच्या आधी, त्यांचे सल्ले आपल्या हिताचे आहेत, किंवा नाही यामध्ये आपल्याला फरक करता यायला हवा, अन्यथा आपणच आपल्या झालेल्या नुकसानाला जबाबदार असतो,
आपण हे नक्की ऐकले असेल, की तिकडून ऐकूण तिकडून सोडून द्यावे , ते यासाठी की आपले हित कशात आहे ,हे आपल्यापेक्षा जास्त आपल्याला कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे कोणी कितीही नको ते सल्ला देत गेले, तर त्यातून काय घ्यावे, आणि काय सोडावे, हे तर आपण करूकं शकतो, आणि हे जर जमत असेलं, तर इग्नोर करणे तर आपल्याला जमूचं शकतं,
आणि अजून एक सल्ला देणारा हा खरोखरचं, आपल्या प्रामाणिक बाजूने सल्ला देत आहे, की फक्त त्याचे काम त्यातून काढण्यासाठी त्याचा हेतू ठेवून, तो आपल्याला सांगतो आहे, आणि सांगत असेल , तरी त्यात आपण आपण तग धरू शकतो का ?????हे तपासायला हवे, कारण सल्ले देणारा सल्ला देत देत आपल्याकडून कधी त्याचे काम काढून घेतो, हे आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही ….,
एक लक्षात घ्यायचं की आपल्याला त्या व्यक्तीला इग्नोर करायचे नाही, त्याच्या वर्तनात असलेल्या त्या गोष्टीला आपल्याला इग्नोर करायचे आहे, कारण नको ते सल्ले देणे या त्याच्या वागणुकीला इग्नोर करायचे आहे, त्यामुळे त्याला त्याची चुकी समजेल, किंवा त्याच्या लक्षात येईल, आणि तो तिथून त्यात सुधारणा करेलं, या दृष्टीने आपण काम करणे गरजेचे आहे,
अन्यथा इग्नोर करत असताना माणूस दुखावला जाऊ जाऊन, त्या व्यक्तीच्या आणि आपल्या नात्यावरती त्याचा प्रभाव उमटलेला दिसून येऊ शकतो, त्यामुळे लटका राग धरून आपण व्यक्तीवर नाही तर त्याच्या वर्तणुकीत बदल व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहोत, हे लक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा…..!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


